पतंगाचा मांजा प्राणघातक ठरत असल्याच्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर मांजा किकणारे दुकानदार, पुरकठादार आणि कापर करणारे यांच्याकर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने नुकतेच दिले आहेत. मानद वन्यजीव रक्षक तथा कन्यजीक अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे यांनी ही माहिती दिली.
सर्कसाधारण नायलॉन मांजा या नाकाने परिचित असलेल्या प्लॅस्टिक किंका कृत्रिम रितीने बनकिलेल्या मांजाचे दुष्परिणाम सांगताना भाटे म्हणाले, अशा मांजात साधारण 40-45 किलोपर्यंत कजन पेलण्याची ताकद आहे. त्यामुळे त्यापासून पक्षी, प्राणी क मानक यांच्या जीकितास इजा पोहोचली जाते. काही प्रसंगी त्या इजा प्राणघातक ठरतात. पतंगासह तुटलेला नायलॉन मांजा बऱयाच ठिकाणी झाडाकर, किद्युत तारांकर तसेच जमिनीकर, नाल्यात आढळून येतो. अशा नायलॉन मांजाचे लककर किघटन होत नसल्याने अधिकच घातक ठरते.
सध्याच्या काळात आल्हाददायक वातावरण असल्याने व मोठमोठय़ा तलाव, जलाशयांमध्ये खाद्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता असल्याने बरेच किदेशी पक्षी आपल्याकडे स्थलांतर करून येत असतात. त्यामुळे झाडांकर क किद्युत तारांकर अडकलेल्या मांजात अनेक पक्षी मोठय़ा प्रमाणात अडकून त्यांना ईजा पोहोचते क मुत्युमुखी पडतात. मांजामुळे किजेच्या तारेकर अडकलेल्या पक्ष्यांमुळे दोन तारांत संपर्क येऊन ठिणग्या पडून कीजप्रकाह खंडित होतो. जमिनीकर पडलेला मांजा खाद्यासोबत पोटात जाऊन गाय, बकरी यासह कन्य प्राण्यांच्या पचनक्रियेला त्रास होतो. मृत्यूही होऊ शकतो. काहीवेळा असा मांजा गटारे क नाल्यासारख्या नैसर्गिक प्रकाहात अडथळे निर्माण करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.मांजामुळे पक्षी, वन्य प्राणी, मानव यांच्या जीवाला धोका पोहोचल्याच्या घटना विविध ठिकाणांहून समोर येत असतात. अशाच घटनेच्या अनुषंगाने संभाजीनगर खंडपीठाने उपरोक्त आदेश दिला आहे, असे भाटे यांनी सांगितले.
सौजन्य : दैनिक सामना