सेंदरी हेंदरी दैवते।
कोण पूजी भुतेखेते।
आपुल्या पोटा जी रडते।
मागती शिते अवदान।।१।।
आपुले इच्छी आणिका पिडी।
काय ते देईल बराडी।
कळो ही आली तयाची जोडी।
अल्प रोकडी बुद्धी अधिरा।।२।।
दासीचा पाहुणेरउखिते।
धनी देईल आपुल्या हाते।
हे तो रिते सतत शक्तीहिन ।।३।।
काय ते थिल्लरीचे पाणी।
न भिजे ओठ न पुरे धणी।
क्षोभे पुरश्चरणी दिले फळ।।४।।
विलेपने बुजविती तोंड।
भार खोळ वाहती उदंड।
करविती आपणया दंड।
ऐसियास भांड म्हणे देव तो।।५।।
तैसा नव्हे नारायण।
जगव्यापक जनार्दन।
तुका म्हणे त्याचे करा चिंतन।
वंदू चरण येती सकळे।।६।।
साधारणपणे १२५ वर्षांपूर्वीचा काळ होता. भीमाण्णा हुंडेकरी नावाचे एक वारकरी होते. वारकरी परंपरेतील आजरेकर फडावर ते विणेकर्याची सेवा करायचे. कर्नाटकातल्या विजापूरला राहणारे. संतांच्या अभंगाचं पाठांतर करण्यात ते तरबेज होते. जवळपास १६ वर्षे त्यांनी आजरेकर फडावर विणेकरी म्हणून सेवा केली. दादासाहेब आजरेकर, नानासाहेब आजरेकर, नामदेव आण्णा माळी आणि विठोबाण्णा भुरे या चार फडप्रमुखांच्या काळात तेच विणेकरी होते. आजरेकर फडावर आजही भीमाण्णा हुंडेकरी यांची पुण्यतिथी साजरी होते. याच भीमाण्णा हुंडेकरी यांची एक गोष्ट आहे. त्यांची वारकरी संतवचनांवर फारच श्रद्धा होती. काटेकोरपणे संतवचनांचं पालन करण्यावर त्यांचा भर होता. संतांनी विठ्ठल या एकाच देवाची उपासना करायला सांगितली आहे. भीमाण्णांना संतवचनातला हा एकविधभाव भावला. त्यांनी विठ्ठल सोडून इतर देवाची उपासना करायची नाही असं ठरवलं. त्यांच्या घरातल्या देव्हार्यात मात्र अनेक देव होते. आपल्याकडे पिढ्यानपिढ्या असे अनेक देव देव्हार्यात विराजमान असतातच. त्या देवांच्या प्रतिमांना ‘टाक’ म्हणतात. टाक म्हणजे चांदीचे देव. चांदीवर देवाच्या प्रतिमा कोरलेल्या असतात. ग्रामदैवत, कुलदैवत आणि इतरही देवांच्या पंचकोनी आकारात प्रतिमा असतात. त्याची दररोज पूजा केली जाते. भीमाण्णांच्या घरातल्या देव्हार्यातही असेच टाक होते. त्यांनी ते टाक घेतले आणि सोनाराकडे गेले. त्यांनी सोनाराकडे जाऊन ते टाक मोडले. त्याच चांदीचे त्यांनी जोडवे बनवले. त्यानंतर त्यांनी ते जोडवे त्यांच्या बायकोच्या पायांच्या बोटात घातले. तेव्हापासून त्यांच्या घरातील या देवांची उपासना थांबली.
आपल्याकडे अनेक पिढ्यांपासून घरातल्या देव्हार्यातले टाक पुजले जातात. त्या टाकातल्या देवांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांची काटेकोरपणे पूजा केली जाते. त्यात थोडीशीही चूक चालत नाही. चूक झाली तर लगेच देवाचा कोप होतो अशी समजूत असते. देवाचा कोप न होण्यासाठी त्याचे सोपस्कार नीटपणे पार पाडणं महत्त्वाचं असतं असं मानलं जातं. या पार्श्वभूमीवर भीमाण्णा हुंडेकरी यांची गोष्ट फारच महत्त्वाची वाटते. भीमाण्णांनी १२५ वर्षांपूर्वी देव्हार्यातून टाकांची अशी उचलबांगडी करण्याचं धाडस दाखवलं. ते धाडस त्यांना दाखवता आलं ते वारकरी संतवचनांच्या प्रेरणेतूनच. त्यांनी पिढ्यानपिढ्या अत्यंत श्रद्धेने पूजलेल्या टाकांची अशी विल्हेवाट लावली त्याचं कारण संतवचनातला एकविधभाव. वारकरी परंपरा एकविधभाव मानते. एका विठ्ठलाशिवाय इतर देवांची उपासना संतांनी नामंजूर केलेली आहे. संतांनी एकविधभावाची ही भूमिका घेण्याचं कारण म्हणजे देवाविषयीचा त्यांचा तात्विक दृष्टिकोन. संतांच्या काळात अनेक शेंदूर फासलेल्या दैवतांच्या उपासना समाजात रुढ होत्या. ही दैवते अत्यंत क्रोधिष्ट असल्याची समजूत होती. पूजाविधानात थोडीफार चूक झाली की लगेच अशा दैवतांचा कोप झाला असं मानलं जायचं. त्यामुळे त्या दैवतांची मर्जी सांभाळण्यासाठी वारंवार कोंबड्या-बकर्याचा बळी द्यावा लागायचा. अमावस्येला पूजा करावी लागायची. कुळधर्म कुळाचार सांभाळावे लागायचे. लग्नासारख्या कौटुंबिक उत्सवात या देवतांचे पूजाविधी करावे लागत होते. त्यामुळे या कोपिष्ट दैवतांना लोक घाबरत होते. मांत्रिक भगतांच्या आहारी गेले होते. या शेंदूर फासलेल्या दैवतांच्या कल्पनेने जनता सैरभर झाली होती. देवाच्या चुकीच्या कल्पना समाजात रुजल्या होत्या. भक्तांना त्रास देणार्या, भीती घालणार्या, कोंबड्या-बकर्याचा बळी मागणार्या, पूजाविधीत चूक झाली की अवकृपा करणार्या अशा दैवतांच्या कल्पना संतांनी धुडकावल्या. मुळात संतांनी त्यांना ‘देव’ मानलंच नाही. संतांच्या लेखी देव हा भक्तांना प्रेम देणारा, पूजाविधीत चूक झाली तरी त्याची चूक न पाहता त्याचा भाव पाहणारा, भक्तांकडून काहीही न मागता फक्त प्रेम मागणारा असा असायला हवा. संतकल्पनेतला हा देव म्हणजे विठ्ठल. संतांनी विठ्ठलाचं जे स्वरूप सांगितलं ते स्वरूप तोवरच्या दैवतांच्या रूढ स्वरूपापेक्षा फार वेगळं होतं. संतांचा देव कोपणारा नव्हता. संतांचा देव काहीही मागणारा नव्हता. संतांचा देव भावाचा भुकेला होता. त्याला फक्त प्रेम हवं होतं.
विठ्ठलासारखा प्रेमदेव सोडून लोक मात्र परंपरागत रुढ दैवतांच्या उपासनेतच अडकून पडले होते. कुलदेव, ग्रामदेव आणि इतर देव यांच्या उपासना ठरलेल्या होत्या. या दैवतांच्या कल्पनेच्या भीतीतून बाजूला काढण्यासाठी संतांनी अशा शेंदर्या दैवतांचा अनेक अभंगातून निषेध केला. तसाच हा एक अभंग. नाटाचे अभंग म्हणून तुकोबारायांचे जे अभंग प्रसिद्ध आहेत त्यापैकीच एक असलेला हा अभंग. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात अशा दैवतांवर हल्ला चढवतात. शेंदरी हेंदरी दैवते आणि भुतेखेते कोण पुजणार, असा प्रश्न तुकोबाराय विचारतात. ही दैवते आणि भुतेखेते त्यांच्या पोटासाठी रडतात. खायला शिते मागतात. वेळेवर खायला मिळालं नाही तर लगेच भक्तांवर कोपतात. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांना पिडणारी ही ‘बराडी’ दैवते आपल्याला काय देणार, असा तुकोबारायांचा सवाल आहे. बराडी म्हणजे खादाड. तुकोबाराय भक्तांकडून खायला मागणार्या देवांना ‘बराडी’ म्हणतात. त्यांच्यापासून कोणता लाभ होतो हे आम्हाला चांगलं कळलंय असं म्हणत त्यांच्यापासून कोणताच लाभ होत नाही हे तुकोबाराय सुचवून देतात. ‘कळो ही आली तयांची जोडी’ असं तुकोबाराय म्हणतात. यातला जोडी हा शब्द लाभ या अर्थाने आलेला आहे. पुढे तुकोबाराय अशा दैवतांच्या भक्तांचा समाचार घेतात. ‘अल्प रोकडी बुद्धी अधिरा।।’ असे तुकोबारायांचे शब्द आहेत. इथे येणारा ‘रोकडी’ हा शब्द ‘वर्तमानात आलेली प्रचिती’ या अर्थाने आलेला आहे. रोकडा आणि रोकडे असे दोन शब्द तुकोबारायांच्या इतर अभंगात आलेले आहेत. ‘देव रोकडा सज्जनी।।’ आणि ‘खळा पाझर रोकडे।।’ अशा दोन अभंगात रोकडा हा शब्द आलेला आहे. त्या अभंगातही या शब्दाचा अर्थ ‘वर्तमानातला अनुभव’ अशा अर्थानेच आलेला आहे. या अभंगात तुकोबाराय या दैवतांच्या लाभाची वर्तमानातली प्रचिती ‘अल्प’ असल्याचं सांगतात. त्या दैवतांच्या पूजनातून लाभ झाल्याचा जो अल्प अनुभव येतो तो भास आणि भ्रम असतो असं तुकोबारायांना म्हणायचं आहे. या अल्प लाभाचा जो भास भक्तांना होतो ते भक्त अधीर बुद्धीचे असतात. अधीर म्हणजे धीर नसलेले. संयम नसलेले. या दैवतांच्या भक्तांना संयम नसतो. त्यांना अल्प लाभाची चटक लागते. तो अल्प लाभ हा भास आहे हे त्यांना समजत नाही. त्यामुळेच ते या दैवतांच्या उपासनेत अडकतात. लाभ मिळत नाही असं दिसलं की हे भक्त लोक लगेच देव बदलतात. ज्ञानेश्वर माऊलींनी अशा देवबदलू भक्तांचं कठोर शब्दात वर्णन केलं आहे. ते म्हणतात, ‘कुणबट कुळवाडी। आन आन देव मांडी। आदीलाची परवडी। करी तेया।।’ म्हणजे जसा शेतकरी आलटून पालटून पीक घेतो त्याप्रमाणे हे लोक वारंवार देव बदलत असतात. ‘परवडेबल’ देव शोधत असतात. देवांकडून त्यांना संसारात काही क्षुल्लक लाभ हवा असतो. एखादा नवस देवाकडून पूर्ण झाला नाही की हे लोक लगेच देव बदलतात. ज्ञानेश्वर माऊलींनी देव बदलण्याच्या भक्तांच्या कृतीला शेतकर्याच्या दरवर्षी पीक बदलण्याच्या कृतीची उपमा दिलेली आहे. माऊली आजच्या काळात असते तर त्यांनी देवबदलू भक्तांना पक्षबदलू राजकारण्यांची उपमा दिली असती. लाभ बघून देव बदलणारे हे देवबदलू भक्त लाभ बघून पक्ष बदलणार्या आजच्या राजकारण्यांसारखेच आहेत. माऊलींनी अशा देवबदलू भक्तांना आणखी एक कठोर उपमा दिली आहे. ती उपमा आहे वेश्येची. माऊली म्हणतात जशी वेश्या अखंड सौभाग्यवती असते त्याप्रमाणे हे देवबदलू लोक आहेत. माऊली म्हणतात, ‘अखंड भजन करी। उगा नसे क्षणभरी। आघवेन गावद्वारी। अहेव जैसी।।’ ज्याप्रमाणे वेश्या अखंड सौभाग्यवती असते त्याप्रमाणे हे देवबदलू भक्त वेगवेगळ्या देवांचं अखंड भजन करत असतात.
लाभासाठी देव बदलणार्या लोकांना तुकोबाराय देवांपासून होणार्या लाभातला फोलपणा सांगतात. त्यासाठी ते दासीच्या पाहुणचाराचं उदाहरण देतात. एखाद्या दासीकडून आपला पाहुणचार नीटपणे होणार नाही. त्या दासीला तिच्या मालकाकडे करुणा भाकून त्याच्याकडून काहीतरी मिळवावं लागणार. मालकाने जे काही दिलेलं आहे त्याचा वापर करून ती आपला पाहुणचार करणार. त्याचप्रमाणे इतरांना बळी मागून जगणार्या दैवतांचे हात सतत रिकामेच असणार असं तुकोबाराय सांगत आहेत. शक्तिहीन असणारी ही दैवते पुजण्याच्या लायकीची नाहीत असं तुकोबाराय म्हणतात. वास्तविक एखाद्या दैवतापासून काही लाभ झाल्याचा जो भास भक्ताला अल्पकाळ होतो तो दासीच्या पाहुणचारासारखा असतो. तुकोबाराय अभंगाच्या पुढच्या चरणात त्या लाभाला थिल्लरीच्या पाण्याची उपमा देतात. थिल्लरीचं पाणी म्हणजे डबक्यातलं पाणी. डबक्यातल्या पाण्याने साधे ओठही भिजत नाहीत. तहान भागणं तर लांबची गोष्ट. डबक्यातल्या पाण्याचा जसा तहान भागवण्यासाठी उपयोग होत नाही त्याप्रमाणे या दैवतांकडून भक्तिप्रेमाची तहान भागवली जाऊ शकत नाही. डबक्यातलं पाणी असून नसल्यासारखं आहे त्याप्रमाणे या दैवतांपासून होणारा लाभ हा असून नसल्यासारखा आहेत.
तुकोबाराय याला जोडून आणखी एक उदाहरण देतात ते पुरश्चरणाचं. पुरश्चरण म्हणजे ठराविक वेदमंत्रांचं उच्चारण. हे उच्चार स्वरांसहित असतात. या उच्चारातील शब्द आणि स्वर यात थोडा जरी बदल झाला तरी त्याचा अपायच घडतो. कृपा होण्याऐवजी अवकृपाच घडते. वास्तविक पाहता पुरश्चरणातील जटीलता पाहता ते यथासांग पार पडतच नाही. त्यात थोडीतरी चूक घडतेच. ती चूक झाली की फळ मिळण्याऐवजी क्षोभ घडतो. तुकोबाराय म्हणतात की क्षोभ हेच पुरश्चरणाचं फळ आहे. ‘क्षोभे पुरश्चरणी दिले फळ।’ असं ते म्हणतात. ज्ञानोबारायांनीही याच पद्धतीने वेदमंत्राचा फोलपणा सांगितला आहे. ‘अशौचाचिये जपो नये। आणिकाते ऐको नये। ऐशिया मंत्राते जग बिहे। याचे फळणे थोडे परि क्षोभणे बहु।।’ असं माऊली म्हणत्ाात. वेदमंत्राच्या उच्चारणाचं फळ थोडं आहे पण क्षोभ जास्त आहे असं माऊली म्हणतात. वेदमंत्रातल्या देवता आणि त्या देवतांची उपासना ज्याप्रमाणे लाभदायक तर नाहीच, पण क्षोभकारक आहे, त्याप्रमाणेच या सेंदर्या दैवतांच्या उपासनाही लाभदायी नाहीत तर त्रासदायी आहेत. ही दैवते जी कृपा करतात ती कृपा नसून अवकृपा आहे असं तुकाराम महाराजांना सुचवायचं आहे.
सेंदरी हेंदरी दैवते।
कोण पूजी भुतेखेते।
आपुल्या पोटा जी रडते।
मागती शिते अवदान।।१।।
आपुले इच्छी आणिका पिडी।
काय ते देईल बराडी।
कळो ही आली तयाची जोडी।
अल्प रोकडी बुद्धी अधिरा।।२।।
दासीचा पाहुणेरउखिते।
धनी देईल आपुल्या हाते।
हे तो रिते सतत शक्तीहिन ।।३।।
काय ते थिल्लरीचे पाणी।
न भिजे ओठ न पुरे धणी।
क्षोभे पुरश्चरणी दिले फळ।।४।।
विलेपने बुजविती तोंड।
भार खोळ वाहती उदंड।
करविती आपणया दंड।
ऐसियास भांड म्हणे देव तो।।५।।
तैसा नव्हे नारायण।
जगव्यापक जनार्दन।
तुका म्हणे त्याचे करा चिंतन।
वंदू चरण येती सकळे।।६।।
साधारणपणे १२५ वर्षांपूर्वीचा काळ होता. भीमाण्णा हुंडेकरी नावाचे एक वारकरी होते. वारकरी परंपरेतील आजरेकर फडावर ते विणेकर्याची सेवा करायचे. कर्नाटकातल्या विजापूरला राहणारे. संतांच्या अभंगाचं पाठांतर करण्यात ते तरबेज होते. जवळपास १६ वर्षे त्यांनी आजरेकर फडावर विणेकरी म्हणून सेवा केली. दादासाहेब आजरेकर, नानासाहेब आजरेकर, नामदेव आण्णा माळी आणि विठोबाण्णा भुरे या चार फडप्रमुखांच्या काळात तेच विणेकरी होते. आजरेकर फडावर आजही भीमाण्णा हुंडेकरी यांची पुण्यतिथी साजरी होते. याच भीमाण्णा हुंडेकरी यांची एक गोष्ट आहे. त्यांची वारकरी संतवचनांवर फारच श्रद्धा होती. काटेकोरपणे संतवचनांचं पालन करण्यावर त्यांचा भर होता. संतांनी विठ्ठल या एकाच देवाची उपासना करायला सांगितली आहे. भीमाण्णांना संतवचनातला हा एकविधभाव भावला. त्यांनी विठ्ठल सोडून इतर देवाची उपासना करायची नाही असं ठरवलं. त्यांच्या घरातल्या देव्हार्यात मात्र अनेक देव होते. आपल्याकडे पिढ्यानपिढ्या असे अनेक देव देव्हार्यात विराजमान असतातच. त्या देवांच्या प्रतिमांना ‘टाक’ म्हणतात. टाक म्हणजे चांदीचे देव. चांदीवर देवाच्या प्रतिमा कोरलेल्या असतात. ग्रामदैवत, कुलदैवत आणि इतरही देवांच्या पंचकोनी आकारात प्रतिमा असतात. त्याची दररोज पूजा केली जाते. भीमाण्णांच्या घरातल्या देव्हार्यातही असेच टाक होते. त्यांनी ते टाक घेतले आणि सोनाराकडे गेले. त्यांनी सोनाराकडे जाऊन ते टाक मोडले. त्याच चांदीचे त्यांनी जोडवे बनवले. त्यानंतर त्यांनी ते जोडवे त्यांच्या बायकोच्या पायांच्या बोटात घातले. तेव्हापासून त्यांच्या घरातील या देवांची उपासना थांबली.
आपल्याकडे अनेक पिढ्यांपासून घरातल्या देव्हार्यातले टाक पुजले जातात. त्या टाकातल्या देवांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांची काटेकोरपणे पूजा केली जाते. त्यात थोडीशीही चूक चालत नाही. चूक झाली तर लगेच देवाचा कोप होतो अशी समजूत असते. देवाचा कोप न होण्यासाठी त्याचे सोपस्कार नीटपणे पार पाडणं महत्त्वाचं असतं असं मानलं जातं. या पार्श्वभूमीवर भीमाण्णा हुंडेकरी यांची गोष्ट फारच महत्त्वाची वाटते. भीमाण्णांनी १२५ वर्षांपूर्वी देव्हार्यातून टाकांची अशी उचलबांगडी करण्याचं धाडस दाखवलं. ते धाडस त्यांना दाखवता आलं ते वारकरी संतवचनांच्या प्रेरणेतूनच. त्यांनी पिढ्यानपिढ्या अत्यंत श्रद्धेने पूजलेल्या टाकांची अशी विल्हेवाट लावली त्याचं कारण संतवचनातला एकविधभाव. वारकरी परंपरा एकविधभाव मानते. एका विठ्ठलाशिवाय इतर देवांची उपासना संतांनी नामंजूर केलेली आहे. संतांनी एकविधभावाची ही भूमिका घेण्याचं कारण म्हणजे देवाविषयीचा त्यांचा तात्विक दृष्टिकोन. संतांच्या काळात अनेक शेंदूर फासलेल्या दैवतांच्या उपासना समाजात रुढ होत्या. ही दैवते अत्यंत क्रोधिष्ट असल्याची समजूत होती. पूजाविधानात थोडीफार चूक झाली की लगेच अशा दैवतांचा कोप झाला असं मानलं जायचं. त्यामुळे त्या दैवतांची मर्जी सांभाळण्यासाठी वारंवार कोंबड्या-बकर्याचा बळी द्यावा लागायचा. अमावस्येला पूजा करावी लागायची. कुळधर्म कुळाचार सांभाळावे लागायचे. लग्नासारख्या कौटुंबिक उत्सवात या देवतांचे पूजाविधी करावे लागत होते. त्यामुळे या कोपिष्ट दैवतांना लोक घाबरत होते. मांत्रिक भगतांच्या आहारी गेले होते. या शेंदूर फासलेल्या दैवतांच्या कल्पनेने जनता सैरभर झाली होती. देवाच्या चुकीच्या कल्पना समाजात रुजल्या होत्या. भक्तांना त्रास देणार्या, भीती घालणार्या, कोंबड्या-बकर्याचा बळी मागणार्या, पूजाविधीत चूक झाली की अवकृपा करणार्या अशा दैवतांच्या कल्पना संतांनी धुडकावल्या. मुळात संतांनी त्यांना ‘देव’ मानलंच नाही. संतांच्या लेखी देव हा भक्तांना प्रेम देणारा, पूजाविधीत चूक झाली तरी त्याची चूक न पाहता त्याचा भाव पाहणारा, भक्तांकडून काहीही न मागता फक्त प्रेम मागणारा असा असायला हवा. संतकल्पनेतला हा देव म्हणजे विठ्ठल. संतांनी विठ्ठलाचं जे स्वरूप सांगितलं ते स्वरूप तोवरच्या दैवतांच्या रूढ स्वरूपापेक्षा फार वेगळं होतं. संतांचा देव कोपणारा नव्हता. संतांचा देव काहीही मागणारा नव्हता. संतांचा देव भावाचा भुकेला होता. त्याला फक्त प्रेम हवं होतं.
विठ्ठलासारखा प्रेमदेव सोडून लोक मात्र परंपरागत रुढ दैवतांच्या उपासनेतच अडकून पडले होते. कुलदेव, ग्रामदेव आणि इतर देव यांच्या उपासना ठरलेल्या होत्या. या दैवतांच्या कल्पनेच्या भीतीतून बाजूला काढण्यासाठी संतांनी अशा शेंदर्या दैवतांचा अनेक अभंगातून निषेध केला. तसाच हा एक अभंग. नाटाचे अभंग म्हणून तुकोबारायांचे जे अभंग प्रसिद्ध आहेत त्यापैकीच एक असलेला हा अभंग. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात अशा दैवतांवर हल्ला चढवतात. शेंदरी हेंदरी दैवते आणि भुतेखेते कोण पुजणार, असा प्रश्न तुकोबाराय विचारतात. ही दैवते आणि भुतेखेते त्यांच्या पोटासाठी रडतात. खायला शिते मागतात. वेळेवर खायला मिळालं नाही तर लगेच भक्तांवर कोपतात. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांना पिडणारी ही ‘बराडी’ दैवते आपल्याला काय देणार, असा तुकोबारायांचा सवाल आहे. बराडी म्हणजे खादाड. तुकोबाराय भक्तांकडून खायला मागणार्या देवांना ‘बराडी’ म्हणतात. त्यांच्यापासून कोणता लाभ होतो हे आम्हाला चांगलं कळलंय असं म्हणत त्यांच्यापासून कोणताच लाभ होत नाही हे तुकोबाराय सुचवून देतात. ‘कळो ही आली तयांची जोडी’ असं तुकोबाराय म्हणतात. यातला जोडी हा शब्द लाभ या अर्थाने आलेला आहे. पुढे तुकोबाराय अशा दैवतांच्या भक्तांचा समाचार घेतात. ‘अल्प रोकडी बुद्धी अधिरा।।’ असे तुकोबारायांचे शब्द आहेत. इथे येणारा ‘रोकडी’ हा शब्द ‘वर्तमानात आलेली प्रचिती’ या अर्थाने आलेला आहे. रोकडा आणि रोकडे असे दोन शब्द तुकोबारायांच्या इतर अभंगात आलेले आहेत. ‘देव रोकडा सज्जनी।।’ आणि ‘खळा पाझर रोकडे।।’ अशा दोन अभंगात रोकडा हा शब्द आलेला आहे. त्या अभंगातही या शब्दाचा अर्थ ‘वर्तमानातला अनुभव’ अशा अर्थानेच आलेला आहे. या अभंगात तुकोबाराय या दैवतांच्या लाभाची वर्तमानातली प्रचिती ‘अल्प’ असल्याचं सांगतात. त्या दैवतांच्या पूजनातून लाभ झाल्याचा जो अल्प अनुभव येतो तो भास आणि भ्रम असतो असं तुकोबारायांना म्हणायचं आहे. या अल्प लाभाचा जो भास भक्तांना होतो ते भक्त अधीर बुद्धीचे असतात. अधीर म्हणजे धीर नसलेले. संयम नसलेले. या दैवतांच्या भक्तांना संयम नसतो. त्यांना अल्प लाभाची चटक लागते. तो अल्प लाभ हा भास आहे हे त्यांना समजत नाही. त्यामुळेच ते या दैवतांच्या उपासनेत अडकतात. लाभ मिळत नाही असं दिसलं की हे भक्त लोक लगेच देव बदलतात. ज्ञानेश्वर माऊलींनी अशा देवबदलू भक्तांचं कठोर शब्दात वर्णन केलं आहे. ते म्हणतात, ‘कुणबट कुळवाडी। आन आन देव मांडी। आदीलाची परवडी। करी तेया।।’ म्हणजे जसा शेतकरी आलटून पालटून पीक घेतो त्याप्रमाणे हे लोक वारंवार देव बदलत असतात. ‘परवडेबल’ देव शोधत असतात. देवांकडून त्यांना संसारात काही क्षुल्लक लाभ हवा असतो. एखादा नवस देवाकडून पूर्ण झाला नाही की हे लोक लगेच देव बदलतात. ज्ञानेश्वर माऊलींनी देव बदलण्याच्या भक्तांच्या कृतीला शेतकर्याच्या दरवर्षी पीक बदलण्याच्या कृतीची उपमा दिलेली आहे. माऊली आजच्या काळात असते तर त्यांनी देवबदलू भक्तांना पक्षबदलू राजकारण्यांची उपमा दिली असती. लाभ बघून देव बदलणारे हे देवबदलू भक्त लाभ बघून पक्ष बदलणार्या आजच्या राजकारण्यांसारखेच आहेत. माऊलींनी अशा देवबदलू भक्तांना आणखी एक कठोर उपमा दिली आहे. ती उपमा आहे वेश्येची. माऊली म्हणतात जशी वेश्या अखंड सौभाग्यवती असते त्याप्रमाणे हे देवबदलू लोक आहेत. माऊली म्हणतात, ‘अखंड भजन करी। उगा नसे क्षणभरी। आघवेन गावद्वारी। अहेव जैसी।।’ ज्याप्रमाणे वेश्या अखंड सौभाग्यवती असते त्याप्रमाणे हे देवबदलू भक्त वेगवेगळ्या देवांचं अखंड भजन करत असतात.
लाभासाठी देव बदलणार्या लोकांना तुकोबाराय देवांपासून होणार्या लाभातला फोलपणा सांगतात. त्यासाठी ते दासीच्या पाहुणचाराचं उदाहरण देतात. एखाद्या दासीकडून आपला पाहुणचार नीटपणे होणार नाही. त्या दासीला तिच्या मालकाकडे करुणा भाकून त्याच्याकडून काहीतरी मिळवावं लागणार. मालकाने जे काही दिलेलं आहे त्याचा वापर करून ती आपला पाहुणचार करणार. त्याचप्रमाणे इतरांना बळी मागून जगणार्या दैवतांचे हात सतत रिकामेच असणार असं तुकोबाराय सांगत आहेत. शक्तिहीन असणारी ही दैवते पुजण्याच्या लायकीची नाहीत असं तुकोबाराय म्हणतात. वास्तविक एखाद्या दैवतापासून काही लाभ झाल्याचा जो भास भक्ताला अल्पकाळ होतो तो दासीच्या पाहुणचारासारखा असतो. तुकोबाराय अभंगाच्या पुढच्या चरणात त्या लाभाला थिल्लरीच्या पाण्याची उपमा देतात. थिल्लरीचं पाणी म्हणजे डबक्यातलं पाणी. डबक्यातल्या पाण्याने साधे ओठही भिजत नाहीत. तहान भागणं तर लांबची गोष्ट. डबक्यातल्या पाण्याचा जसा तहान भागवण्यासाठी उपयोग होत नाही त्याप्रमाणे या दैवतांकडून भक्तिप्रेमाची तहान भागवली जाऊ शकत नाही. डबक्यातलं पाणी असून नसल्यासारखं आहे त्याप्रमाणे या दैवतांपासून होणारा लाभ हा असून नसल्यासारखा आहेत.
तुकोबाराय याला जोडून आणखी एक उदाहरण देतात ते पुरश्चरणाचं. पुरश्चरण म्हणजे ठराविक वेदमंत्रांचं उच्चारण. हे उच्चार स्वरांसहित असतात. या उच्चारातील शब्द आणि स्वर यात थोडा जरी बदल झाला तरी त्याचा अपायच घडतो. कृपा होण्याऐवजी अवकृपाच घडते. वास्तविक पाहता पुरश्चरणातील जटीलता पाहता ते यथासांग पार पडतच नाही. त्यात थोडीतरी चूक घडतेच. ती चूक झाली की फळ मिळण्याऐवजी क्षोभ घडतो. तुकोबाराय म्हणतात की क्षोभ हेच पुरश्चरणाचं फळ आहे. ‘क्षोभे पुरश्चरणी दिले फळ।’ असं ते म्हणतात. ज्ञानोबारायांनीही याच पद्धतीने वेदमंत्राचा फोलपणा सांगितला आहे. ‘अशौचाचिये जपो नये। आणिकाते ऐको नये। ऐशिया मंत्राते जग बिहे। याचे फळणे थोडे परि क्षोभणे बहु।।’ असं माऊली म्हणतात. वेदमंत्राच्या उच्चारणाचं फळ थोडं आहे पण क्षोभ जास्त आहे असं माऊली म्हणतात. वेदमंत्रातल्या देवता आणि त्या देवतांची उपासना ज्याप्रमाणे लाभदायक तर नाहीच, पण क्षोभकारक आहे, त्याप्रमाणेच या सेंदर्या दैवतांच्या उपासनाही लाभदायी नाहीत तर त्रासदायी आहेत. ही दैवते जी कृपा करतात ती कृपा नसून अवकृपा आहे असं तुकाराम महाराजांना सुचवायचं आहे.