ग्रहस्थिती : मंगळ मिथुनेत, प्लूटो मकर राशीत, केतू तुळेत, रवि, बुध, हर्षल, राहू मेष राशीत, शुक्र वृषभेत, गुरु आणि नेपच्युन मीन राशीत, शनि कुंभेत. विशेष दिवस : २२ एप्रिल रोजी अक्षय तृतीया, श्री परशुराम जयंती आणि रमजान ईद, २३ एप्रिल रोजी विनायकी चतुर्थी, २७ एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग.
मेष – उन्हाचा कडाका वाढणार आहे, त्यामुळे त्वचेच्या आजारांना निमंत्रण मिळू शकते, सांभाळून राहा. नोकरी-व्यवसायात अधिकची जबाबदारी असेल तर जपूनच काम करा. अति आत्मविश्वास घात करू शकतो. घरात-भागीदाराबरोबर किरकोळ कुरबुरी होतील, त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जा. आर्थिक बाजू भक्कम ठेवण्यासाठी योग्य प्रकारचे नियोजन आवश्यक आहे. कुणाला पैसे देऊ नका आणि कुणाकडून घेऊ नका. नातेवाईकांच्या भेटी होतील, एखादे गेट टूगेदर, सहल होईल.
वृषभ – व्यवसायात जुनी थकीत येणी वसूल झाल्याने खिशात पैसे राहतील. नोकरीत वरिष्ठ खूश असल्याने भविष्यात लाभ मिळेल. शेअर, लॉटरीतून पैसे मिळतील, अनपेक्षित लाभ होतील. एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचे नियोजन बिनसेल. रिअल इस्टेट व्यावसायिक, लेखक, कवी यांच्यासाठी उत्तम काळ आहे. लेखकांना पुरस्कार मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन – नव्या व्यक्तीच्या ओळखीतून नव्या व्यवसायाचा मार्ग सापडेल. नातेवाईक, मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. जनसंपर्क उत्तम असेल तर त्यातून चांगला लाभ मिळेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. चेष्टामस्करी टाळा. वादाचे प्रसंग टाळा. नवीन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. अडकलेली सरकारी कामे मार्गी लागतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
कर्क – नोकरीच्या ठिकाणी वादाचे प्रसंग घडतील. वाद वाढवू नका. नवीन गुंतवणुकीच्या विचाराला चालना मिळेल. कोणताही निर्णय घाई न करता घ्या. एखादी चूक खूप महागात पडेल. व्यावसायिकांसाठी चांगला काळ आहे. नव्या ऑर्डर मिळतील. आर्थिक आवक चांगली राहील. कुटुंबात उत्साही वातावरण राहील, पण वाद टाळा. कामानिमित्ताने विदेशात जाण्याचे नियोजन होईल. विदेशात जाण्याचे स्वप्नही पूर्ण होईल.
सिंह – शुभ घटना कानावर पडतील. संततीकडून उल्लेखनीय कामगिरी झाल्याने घरातले वातावरण उत्तम राहील. एखाद्या समारंभात जुनी मित्रमंडळी भेटतील. अनपेक्षित बातमी कानावर पडेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायवृद्धीसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील. धार्मिक कार्याला वेळ द्याल. सहलीत खवैयेगिरी केल्याने पोटाच्या तक्रारी निर्माण होतील, सांभाळून राहा. नव्या नोकरीची संधी चालून येईल. विचाराने निर्णय घ्या.
कन्या – नोकरीत अवघड काम सहज पूर्ण कराल, त्यामुळे कौतुकाचा वर्षाव होईल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. आरोग्याची विशेष काळजी घ्या. महिलांनी प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे. गैरमार्गाने पैसे कमावण्याचे धाडस अंगाशी येईल. सरकारी नोकरदारांसाठी चांगला काळ आहे. बदलीच्या प्रयत्नांना यश मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. घरात बंधूवर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल.
तूळ – थोडी खुशी थोडे गम देणारे अनुभव येतील. एखादे अडलेले काम पुरे करण्याचा हट्ट धरू नका. अडचणी येतील. व्यवसायात चांगली प्रगती होईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. मानसिक ताणतणावांकडे फार लक्ष देऊ नका. धार्मिक पुस्तकाचे वाचन करा. मन शांत ठेवा. कामासाठी धावपळ करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक – घरात किंवा नोकरी, व्यवसायात बोलण्यातून गैरसमज व त्यातून टोकाचे वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. सबुरीने घ्या. नवीन वास्तू घेण्याच्या विचाराला चालना मिळेल. बँकेतून कर्ज मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत पगारवाढ, प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करणार असाल तर सावधपणे पण न घाबरता बिनधास्त पुढे जा.
धनू – कामात अति आत्मविश्वास दाखवू नका. एखादा निर्णय चुकू शकतो. तरुणांसाठी परीक्षा घेणारा काळ आहे. मन:स्वास्थ्य ठीक ठेवून पावले टाका. शत्रूकडून त्रास होईल. व्यवसायात चढउताराची स्थिती राहील. आर्थिक नियोजन योग्यपणे करा. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ राहील. व्यवसायात चांगली संधी चालून येईल. विदेशात विस्ताराचे प्रयत्न केल्यास त्यात यश मिळेल. कोणताही मोठा निर्णय घेताना सावधगिरीचा उपाय म्हणून आधी कागदपत्रांची तपासणी करा. फसगत टाळा.
मकर – पैशाची उधळपट्टी करू नका. व्यवसायात उत्कर्षाचा काळ अनुभवायला मिळेल. अचानक धनलाभ होईल. तरुणांना यश मिळेल. खेळाडूंसाठी उत्तम काळ आहे. थकीत येणी वसूल होतील. वाहन घेण्याचा विचार अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मार्गी लागेल. समाजसेवेसाठी भरपूर वेळ द्याल. घरात ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्या. आरोग्याच्या छोट्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ – नोकरी-व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल. पत्रकार, कवी, लेखक, खेळाडू, राजकारणी यांच्यासाठी चांगला काळ आहे. शुभ घटना कानावर पडेल. घरातले वातावरण उत्तम राहील. पती-पत्नी दोघांनी सामंजस्य दाखवणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना लेखाजोखा तपासा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. अन्यथा झटपट पैसे मिळवण्याच्या नादात फसगत होईल. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. तरुणांसाठी चांगला काळ आहे. व्यवसायवृद्धी होईल.
मीन – शिक्षक, प्राध्यापकांसाठी उत्तम काळ आहे. संशोधन क्षेत्रात भन्नाट संधी चालून येईल, तिचे सोने करा. घरात शुभकार्ये झाल्यामुळे मिष्टान्नभोजनाचा योग आहे. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. कलाकारांना उत्तम यश मिळेल. देवदर्शनासाठी जाणे होईल. समाजकार्यासाठी दानधर्म होईल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे त्वचेच्या विकारापासून काळजी घ्या. नवी वास्तू घेण्याचा विचार मार्गी लागेल.