अशी आहे ग्रहस्थिती : राहू-हर्षल (वक्री) मेषेत, मंगळ (वक्री) वृषभ राशीत, केतू तुळेत, रवि-बुध (वक्री) धनु राशीत, शनि-शुक्र मकरेत, नेपच्युन कुंभेत, गुरु मीनेत. दिनविशेष – २ जानेवारी, पुत्रदा एकादशी, ६ जानेवारी शाकंभरी पौर्णिमा.
मेष – येत्या काळात कुटुंब, धनस्थिती याबद्दल समस्या निर्माण होऊ शकते. आगामी काळात ग्रहस्थिती बदलल्याने काही सकारात्मक बदल घडतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. दशम भावातील शनीबरोबर होणार्या भ्रमणामुळे कार्यक्षमतेमध्ये चांगली वाढ होईल. आर्थिक कामांचे ठोकताळे बॅलन्स होतील. सरत्या वर्षात अडकलेली कामे मार्गी लागतील. राहू-चंद्र युती योग मानसिक स्थिती चिंताग्रस्त ठेवेल. तीन आणि चार तारखांना कुटुंबातील वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. चिडचिड टाळा. सुखद अनुभव येतील.
वृषभ – भाग्याचे दरवाजे आता उघडतील. नवा व्यवसाय, नव्या नोकरीची संधी चालून येईल. योगकारक शनि-लग्नेश शुक्राच्या भ्रमणामुळे भाग्य चांगली साथ देईल. वक्री मंगळाची दृष्टी वक्री बुधावर राहिल्याने मानसिक संतुलन कायम ठेवा. किरकोळ कारणावरून वादंग टाळा. मनोविकारग्रस्तांसाठी त्रासदायक काळ आहे. मनशांती, ध्यानधारणेसाठी उत्तम काळ आहे. गुरूच्या माध्यमातून अनपेक्षित लाभ मिळेल. संततीकडून शुभवार्ता समजेल.
मिथुन – घाईघाईत निर्णय घेणे टाळा. अन्यथा मन:स्ताप सहन करावा लागेल. राहू-हर्षल-चंद्राच्या भ्रमणामुळे काही काळ चक्रावून टाकणारी स्थिती राहील. काही मंडळींना नव्या संकल्पना सापडतील. त्याचा उत्तम रिझल्ट मिळेल. सल्लागारांसाठी उत्तम काळ आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील. दशम भावातील गुरुमुळे घरात शुभकार्ये जमून येतील. आर्थिक गणिते उत्तम साथ देतील. कौटुंबिक स्थिरता मिळेल. नातेवाईक, मित्रमंडळींच्या भेटी होतील.
कर्क – ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहणे महागात पडेल. वक्री मंगळाची षष्ठम भावावर दृष्टी, षष्ठात बुध असल्याने येत्या आठवड्यात किंवा पुढल्या महिन्यात करायच्या नव्या कामात किंवा कामासाठीच्या मुलाखतीत अडचणीचे प्रसंग निर्माण होतील. पूर्वतयारी करूनच जा. कोर्ट केस, मेडिकल अडचण याबाबत निर्णय घेताना ताणामुळे प्रकृती बिघडणार नाही, याची काळजी घ्या. चंद्राच्या राहू-हर्षलबरोबर ग्रहणयोगातील युतीमुळे ३१ डिसेंबर, १ आणि २ जानेवारी हा काळ तणावमुक्त राहील. आप्तांची नाराजी ओढवून घ्याल.
सिंह – पंचम भावात वक्री बुध, पंचमेश गुरु अष्टम भावात, मंगळाची वक्रदृष्टी चतुर्थ आणि पंचम भावावर असल्यामुळे गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी धावपळ होईल. थकवा जाणवेल. अशी कामे शक्यतो टाळा. संततीबरोबर विसंवाद होईल. शिक्षणात समस्या निर्माण होतील. शनि अष्टम भावात असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. मानसिक स्थिती शाबूत ठेवा. धार्मिक कार्यात मन रमवा. पर्यटनासाठी बाहेर जाणे होईल.
कन्या – अनेक दिवसांपासून रेंगाळलेल्या महत्वाच्या कामासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल. विवाहाबाबतची बोलणी मार्गी लागण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. ललित कला, पेंटिंग, पर्यटन या क्षेत्रात चांगले लाभ मिळतील. घरात मतभेद होतील. नव्या गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे. महागडी वस्तू खरेदी कराल.
तूळ – योगकारक शनीच्या सुखस्थानातील भ्रमणामुळे आयुष्यात अनपेक्षितपणे सकारात्मक बदल होतील. काही ठिकाणी बघ्याची भूमिका घ्यावी लागेल. प्लुटोमुळे काम बिघडू शकते. नोकरीत प्रमोशनबाबत निर्णय होऊ शकतो. व्यावसायिक, उद्योजकांसाठी उत्तम आठवडा राहील. उत्पन्नात चांगली वाढ होईल. वक्री बुधामुळे मोठा प्रवास होईल. संवाद साधताना काळजी घ्या.
वृश्चिक – वक्री मंगळाचे सप्तमातील भ्रमण, शुक्र पराक्रम भावात, त्यामुळे विवाह जमवताना चमत्कारिक अनुभव येतील. आईच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. शिक्षण क्षेत्रात नवी जबाबदारी मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादातून भांडणे होतील. विनाकारण भटकंती होईल. संततीसाठी उत्तम काळ आहे. रवि-बुधादित्य योगामुळे वाव्âचातुर्याच्या जोरावर मोठे काम मार्गी लागू शकते. चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते.
धनु – नोकरीत महत्वाचे काम करताना कौशल्य पणाला लावावे लागेल. सहकारी कुरघोडी करतील. व्यवसायात गुरुची चांगली साथ मिळेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांत आजारपण येईल. काळजी घ्या. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. मानसिक चिंताजनक कृत्य करू नका. संततीकडे लक्ष द्या.
मकर – कलागुणांना शुक्राची चांगली साथ मिळेल. त्रासदायक वाटणारा काळ सुखकारक होईल. पंचमभावातला वक्री मंगळ प्रेमी युगुलांमध्ये गैरसमज घडवून आणेल. ‘सोळावे वरीस धोक्याचे’ हे लक्षात ठेवा. राजकारणी, समाजसेवकांनी विशेष लक्ष द्यावे. वादाचे प्रसंग निर्माण होतील. साडेसाती सुरु आहे याचे भान ठेवा.
कुंभ – नव्या वर्षात शनीचे राश्यांतर होणार असल्याने आगामी काळात काही चांगल्या घटनांचा अनुभव येईल. व्यवसायातील उलाढाल वाढेल. परदेशगमनाचे योग जुळून येतील. वक्री मंगळामुळे घरातील वातावरण विस्कळीत राहील. मानसिक त्रास होईल. कामानिमित्ताने प्रवास घडेल, पण त्यात महत्वाच्या वस्तू सांभाळा. पैसे कमावण्याच्या नादात खिशातील पैसे घ्ाालवू नका. अनोळखी क्षेत्रात लक्ष घालू नका.
मीन – रवि-बुधादित्य योग, लाभातील शुक्र, लग्नी हंसयोगात गुरु त्यामुळे अनेकांना विविध क्षेत्रांत यश मिळेल. नोकरीत अधिकारपदाची जबाबदारी कौशल्य पणाला लावेल आणि ध्येयापर्यंत पोहोचवेल. मंगळाकडून चांगले सहकार्य मिळेल. कानाचे दुखणे उद्भवू शकते. वाहन सावकाश चालवा. वार्तालापात गैरसमजूत आणि वादाचे प्रसंग निर्माण होतील. विद्यार्थ्यांना उत्तम काळ राहील. दाम्पत्यजीवनात चांगले अनुभव येतील. एक ते तीन तारखांना अनपेक्षितपणे पैशाची चणचण भासेल. पण शनिमुळे ऐनवेळी निर्माण झालेली अडचण मार्गी लागायला मदत होईल.