• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

लोककलाकारांचा अप्रतिम जागर!

- संजय डहाळे (तिसरी घंटा) (नाटक : ओक्के हाय एकदम!)

Nitin Phanse by Nitin Phanse
October 6, 2023
in मनोरंजन
0

‘पन्नास खोके एकदम ओक्के!’ हा नवा वाक्प्रचार अलीकडच्या काळात राजकीय भ्रष्टाचाराचा कळस म्हणून ओळखला जातो. बंडखोर आमदारांसाठी हे एक नेमकं विशेषण ठरलंय. ‘मतदारांना धोके अन् पुढारी एकदम ओके,’ असा हा फसवाफसवीचा प्रकार! नुकत्याच झालेल्या बैलपोळा या शेतकर्‍यांच्या सणात बैलांना सजविले गेले. यंदा त्यात वेगळेपण नजरेत भरले ते म्हणजे बैलांच्या अंगावर ‘५० खोके, एकदम ओक्के!’ ही अक्षरे ठळकपणे रंगविली होती. गोविंदा आणि गणेशोत्सवातही काही पथकांच्या अंगावर त्याच प्रकारचे ‘टीशर्ट’ झळकले. थोडक्यात हे टायटल ‘कॅची’ ठरलंय, चर्चेत आहे आणि तेच शीर्षक ‘ओक्के हाय एकदम!’ या नव्या अस्सल वगनाट्यासाठी वापरलं आहे जे एकदम लयभारी ‘ओक्के’ जमलंय!
वगसम्राट दादू इंदुरीकर यांनी ‘गाढवाचं लग्न’ हे वगनाट्य सर्वप्रथम रंगभूमीवर आणले. गावरान ढंगातला तमाशा रंगभूमीवर पहिल्यांदाच आणून एक वेगळा शुभारंभ त्यांनी केला. अगदी सातासमुद्रापार ही मर्‍हाठमोळी पताका त्यावेळी पोहचली. ‘महाराष्ट्राचा चार्ली चॅप्लीन’ ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया अमेरिका-जपानी कलाकारांनी त्यांना बहाल केली. पुढे वगनाट्य, लोकनाट्य याचा प्रवाह सुरू राहिला. मराठी रंगभूमीला नवे दालन खुले केले. शाहीर दादा कोंडके यांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्यामुळे दादांना सिनेसृष्टीची दारे उघडली गेली. त्यात त्यांनी महाविक्रम केले. शाहीर साबळे यांचे ‘आंधळ दळतंय’, ‘आबुरावाचं लगीन’, ‘एक तमाशा सुंदरसा’अशा अनेक वगनाट्यांनी त्यांना ‘महाराष्ट्र शाहीर’ हा किताब मिळवून दिला. पुलंनीही या शैलीतलं ‘पुढारी पाहिजे’ रंगभूमीला दिले. अण्णाभाऊ साठे यांचे अकलेची गोष्ट हेही नोंद घेण्याजोगं. एकूणच एक तेजस्वी परंपरा आणि स्वतंत्र रंगवाट रंगभूमीवर उघडली गेलीय. नव्या पिढीला ही शैली कायम खुणावत राहिली. आजही वगनाट्याचे कुतूहल दिसून येतेय.
लोककलाकारांच्या पडद्यामागच्या भीषण जीवनावरले नाट्य हे यातल्या संहितेत खच्चून भरलेय. त्यांचे जिणे हृदय हेलावून टाकणारे. अशिक्षित, खेडवळ, कष्टकरी रसिकांचे रंजन करणारी ही मंडळी खेडोपाड्यात विखुरलेली. या कलाकारांना जगापुढे मानाचे पान मिळत असले तरी वैयक्तिक जीवनात मात्र दारिद्र्याचे भोग संपता संपत नाहीत. तरीही एका जबरदस्त जिद्दीने कलेसाठीचा हा वसा व वारसा ते निष्ठेने चालवत आहेत. ‘जावे त्यांच्या वंशा’ हेच खरे. अवहेलना, बदनामी, आर्थिक कोंडी या लोककलाकारांचा कायमच पाठलाग करतेय. जगाला हसविणारे, प्रसंगी शिकविणारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरते कोसळले. नव्याच भयानक परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागले. कार्यक्रमच पूर्णपणे बंद. त्यामुळे जगण्यासाठी दोन वेळचं अन्न मिळणंही मुश्कील होतं. अस्तित्वच संकटात. कोरोना संपला तरी त्याचे दूरगामी परिणामांचे फटके यांना आजही सहन करावे लागत आहेत. नेमका हाच विषय याच्या सादरीकरणातून प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न गणेश पंडित आणि सुधाकर पोटे यांनी संहितेतून केलाय. त्याला असलेली सत्याची झालर सुन्न करते. सावित्री मेधातुल यांच्या संकल्पनेवर हा प्रयोग उभा करण्यात आलाय.
या निर्मितीमागे एक कलाकारांबद्दलची आणि दुसरी तालमींची दोन ठळक वैशिष्ट्ये आहेत. एखादी निवासी नाट्य कार्यशाळा महिनाभर चालावी त्याच प्रकारे या नाटकाची कार्यशाळा कम् तालीम पार पडली. निर्मात्यांच्या घरातच जणू ‘तंबू’ उभारला होता. तमाशाच्या फडासारखा हा अनोखा प्रकार. त्यात वीसएक रंगकर्मी दिवसरात्र एकत्र मुंबईपासून दूर मुक्कामाला होते. त्यात सार्‍यांचं ट्युनिंग जमत गेलं. यातच प्रत्यक्ष तमाशात भूमिका करणार्‍या दोन पिढयांचे अस्सल वारसदार आणि मुंबई-पुण्यातला व्यावसायिक नाटकातील अनुभवी कलाकार अशा दोन धारांचा यात मेळ जमला. संवादातून सादरीकरणापर्यंत नाट्य पोहचले. महिनाभर पूर्ण वेळ वीस जणांच्या तालमी हा आज काहीसा अशक्य कोटीचा प्रकार वाटला तरी ही या निर्मितीमागली जमेची बाजू ठरली आणि हे वगनाट्य त्यातूनच आकाराला आलं. हे एक पडद्यामागलं वेगळेपण आहे. तमाशा आणि नाटक या दोघांची सांगड ही संहितेत आणि दिग्दर्शनात कल्पकतेने घातलीय. त्यामुळे नाट्य पकड घेणारे ठरत आहे.
पडदा उघडतो आणि प्रथेप्रमाणे गणेशवंदना होते. शाहीर प्रगटतात. ते थेट संवाद साधतात. यात कोरोना काळातल्या महासंकटाची पार्श्वभूमी आहे. या दोन राज्यांचे दर्शन होते, जी एकाच राज्यात नांदताहेत. एक वास्तवातले राज्य. जिथे प्रजेचा राजा आहे आणि राजकारण सुरू आहे. दुसरे राज्य हे त्याच राज्यातले. चंद्राबाई नारायणगांवकर हिच्या फडातले राज्य. ती कलाकारांची अन् कलेची राणीच! राजदरबाराचा प्रसंग उभा राहतो. राजा-प्रधान यांच्यातील नेहमीचा सवाल जवाब रंगतो. कोरोनाच्या बिकट स्थितीत ‘निगेटिव्ह’ आणि ‘पॉझिटिव्ह’ या शब्दांचेही अर्थ परस्परविरुद्ध बनलेले. राजदरबारी लावणी होते. राजे खूष! भर कोरोनात लोकरंजन करणार्‍या लोककलाकारांना सरकारी तिजोरीतून ‘महामानधन’ सुरू करण्याचे आदेश निघतात. प्रशासन मात्र त्यात कलाकारांचा अ-ब-क-ड असा दर्जा ठरविण्याचा प्रयत्न करतं. अडथळा उभा होतो. अखेर महाराज वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी फडावर राहण्याचा निर्णय घेतात. आचारी बनतात. तिथल्या समस्या त्यांना पुरेपूर कळतात. फड आणि कलाकारांना वाचविण्यासाठी, जगविण्यासाठी मालकीण चंद्राबाई स्वत:च्या मालकीचा एकेक ट्रक विकते. कर्जबाजारी होते. सहकार्‍यांसाठी हक्काची राणी बनते. प्रधानजीरूपी प्रशासन हे कायम नकारघंटा वाजवितात. मदतीत अडथळे निर्माण करतात. पुढे काय होते ते नाटकात पाहायला हवं. चंद्रा फड मालकीणीसारख्या अनेक लोककलाकारांना आश्रय देणार्‍यांना अखेर उपेक्षाच पदरी पडते. त्यांची संकटांची मालिका संपत नाही. राजा असो वा प्रशासन ते फक्त कागदी घोडे नाचवितात. तोच त्यांचा धंदा. ‘धनाश्रय किंवा राजाश्रय यापेक्षा रसिकाश्रयच कलाकारांना लाखमोलाचा असतो. त्या बळावर ते मजबुतीने कुठल्याही संकटांशी सामना करण्याची त्यांची कायम तयारी असते,’ यावर हे नाट्य उभारले आहे. अर्थात त्यात जागोजागी सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक भाष्य आहे. लावणीचा ठसका, नृत्याचा दणका, व्यंगाचा चिमटा गच्च भरलेला. विद्यमान स्वार्थी, मतलबी, मिंध्या राजकारण्यांवरही उत्स्फूर्त शेरेबाजी आहे. एकूणच कथेपेक्षा सादरीकरण लाजवाब ठरते.
रंगमंचावर फडाची मालकीण चंद्राबाई ही भूमिका साकारणार्‍या आणि रंगमंचामागे संकल्पना व निर्माती म्हणून मालकीणच असलेल्या सावित्री मेघातुल यांनी हा रंगखेळ मांडला आहे. चंद्राबाईचा फडमालकीण म्हणून रुबाब तसेच परिस्थितीशी खंबीरपणे लढा देणारी नायिका म्हणून शोभून दिसतात. यापूर्वीही त्यांचे संगीतबारी, लावण्यवती हे दोन कार्यक्रम आले आहेत. चंद्राबाईचे शेवटचे काही प्रसंग हृदय हेलावून सोडणारे. विनोदवीर वैभव सातपुते यांनी महाराज मस्त उभा केलाय. हक्काचे हशे वसूल केलेत. चेहर्‍यावरला भोळेपणा नजरेत भरणारा. लावण्यवती सीमा पोटे या लावणी गाऊन नृत्य करण्यात तरबेज. ‘हात नका लावू माझ्या गुलछडीला’ ही लावणी वन्समोअरची दाद मिळविते. त्यांच्या बहारदार लावण्यांनी दोन्ही अंकात ताल-सुरांची मैफलच सजते. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात त्यांचे एक छायाचत्रि झळकले आहे. त्यांनी यात ‘शीतल’ची भूमिका केलीय. मूळ संहिता लेखक सुधाकर पोटे यांचा प्रधानजी हा संवादफेकीत बाजी मारतो. ‘कोरोनाचा तमाशा’ या नावाने पहिली संहिता होती. त्याचे व्यावसायिक रंगमंचावर नामांतर हे ‘ओक्के हाय एकदम!’ झालेय. प्रधानजीची देहबोली शोभून दिसते. राजा व प्रधान यातील संवाद चांगले जमलेत. पंचू गायकवाड (शाहीर), विक्रम सोनावणे (मुसा), प्रज्ञा पोटे (सविता), भालचंद्र पोटे व चंद्रकांत बारशिंगे (हवालदार), विनोद अवसरीकर, अभिजीत जाधव (सेवक) यांची साथसोबत नाट्याची रंगत वाढविते. नाटक आणि तमाशा करणार्‍यांची युती अशी प्रथमच रंगभूमीवर आलीय. त्यातला उत्स्फूर्तपणा भारावून सोडतो.
प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, नाट्यस्पर्धा, बालनाट्ये, चित्रपट, मालिका, असा अनुभव गाठीशी असलेला कल्पक रंगकर्मी गणेश पंडित याने या नाटकाचे दिग्दर्शन करताना नाट्य कुठेही रेंगाळू दिलेले नाही, तसेच गंभीर विषयाला हात घालताना विनोदाची फोडणी तयारीत दिलीय. संहितेवरही त्याने शेवटचा हात फिरवल्याने नेमकेपणा आलाय. सातेक वर्षाच्या मध्यंतरानंतर या नाटकाच्या निमित्ताने गणेश याने पदार्पण केलंय. ते कौतुकास्पद म्हणावे लागेल. दत्ता महाडिक-पुणेकर आणि चंदन कांबळे यांच्या लावण्या व गाणी सहजसुंदर असून त्याच्या चालीही ठेका धरायला भाग पाडणार्‍या आहेत. सुमीत पाटील यांनी रंगविलेल्या पडद्यांचा वापर योग्य केलाय. वातावरणनिर्मिती नेमकी होते. अनिकेत जाधव, आकांक्षा कदम यांनी रंगभूषा, वेशभूषाची जबाबदारी सांभाळली आहे. अन्य तांत्रिक बाजू शैलीला जुळून येणार्‍या आहेत.
एका फ्रेंच फेस्टिव्हलसाठी या नाटकाचे लेखन करण्यात आले होते. त्याचा ऑनलाइन प्रयोगही सादर करण्यात आला. हेच नाट्य काही बदल करून व्यावसायिकसाठी सज्ज करण्यात आला. आज रसिकांची विनोदाची अभिरुची लक्षात घेता यात अनेक गाळलेल्या जागा आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रयोग हा अधिकाधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. विशेषत: सद्य राजकारणावर असणारे चिमटे हशे-टाळ्या वसूल करतात. दुसर्‍या अंकातही काही प्रमाणातली रडारड आणि रिपिटेशन टाळता आले तर नाट्य अधिकच उंचीवर पोहचेल, ही सूचना या निमित्ताने करावीशी वाटते. सावित्री मेधातुल आणि श्रीकांत तटकरे या दोघा निर्मात्यांनी निर्मितीमूल्यात कुठेही कसूर केलेली नाही. निवडक प्रयोग व प्रदर्शनापुरते हे नाट्य न राहता ते नव्या व्यावसायिक गणितांचा विचार करून सादर व्हावे, ही अपेक्षा!

ओक्के हाय एकदम!

संकल्पना / संशोधन : सावित्री मेधातुल
लेखन : गणेश पंडित / सुधाकर पोटे
दिग्दर्शन : गणेश पंडित
नेपथ्य : सुमित पाटील
संगीत : पोटे / सानप / फोंडके
प्रकाश : विलास हुमणे
निर्मिती : सावित्री मेधातुल / श्रीकांत तटकरे
व्यवस्थापक : विलास कुंडकर
निर्मिती संस्था : काली बिल्ली प्रॉडक्शन / भूमिका थिएटर्स

[email protected]

Previous Post

ये मोह मोह के धागे…

Next Post

आधीच थोडे, त्यात नातेवाईकांचे घोडे!

Related Posts

मनोरंजन

दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

May 15, 2025
पडद्यावरचा खरा नायक
मनोरंजन

पडद्यावरचा खरा नायक

May 15, 2025
मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
Next Post

आधीच थोडे, त्यात नातेवाईकांचे घोडे!

स्किमरने बँक खाते साफ केले...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.