• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

नियमित घेऊ ‘कॉमेडीचा डोस’

- राजेश कोळंबकर (टेन्शन काय को लेने का?)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 24, 2023
in भाष्य
0

एक विनोद सांगतो, एका छोट्या चहाच्या हॉटेलमध्ये डोकावत गण्याने वेटरला विचारलं, कॉपी किती रूपये?
वेटर म्हणाला, वीस रुपये.
गण्या आश्चर्याने म्हणाला, वीस रूपये? खूप महाग आहे. बाजूच्या दुकानात तर दोन रुपये आहे.
वेटर चिडला. म्हणाला, पळ इथून.
गण्या म्हणाला, अहो, खरोखर बाजूच्या दुकानात कॉपी दोन रुपये आहे.
वेटर अधिक वैतागत म्हणाला, चल पळ इथून.
गण्या म्हणाला, अरे पण काय झालं एवढं चिडायला?
वेटर खेकसत म्हणाला. बाजूचं दुकान झेरॉक्सचं आहे. दोन रुपयाला झेरॉक्स कॉपी आहे.
हाऽऽ हाऽऽ हाऽऽ
कसा वाटला विनोद? नाही आवडला?
मंडळी, रामदास स्वामींनी ‘टवाळा आवडे विनोद’ असं म्हटलं आहे. ते म्हणतात, टवाळा आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामस्यास अप्रमाद, गोड वाटे. काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की ‘टवाळा आवडे विनोद’ हे समर्थांनी सतत दर्जाहीन विनोद करून इतरांना नाहक पिडणार्‍यांबद्दल, टवाळक्या करून विकृत आनंद घेणार्‍यांबद्दल म्हटलं आहे. विनोद करणे वाईट आहे असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही.
असो. पण समोरच्याला उबग येईल इतक्या फालतू कोट्या वगैरे करत रहाणे, फालतू विनोद करून इतरांना पिडत राहणे, लोकांच्या डोक्यात जाणे, इतरांच्या शारीरिक व्यंगावर विनोद करणे हे तसं वाईटच. हसत खेळत जगावे, थट्टा मस्करी विनोद करत जगावे हे खरं असलं तरी इतरांची मस्करी करताना भान राखायला हवं. तारतम्य बाळगायला हवं. नाहीतर मस्करीची कुस्करी होऊ शकते. करायला गेलो एक आणि झालं भलतचं अस होऊ शकतं. आपण अडचणीत येऊ शकतो. प्रकरण अंगाशी येऊ शकतं. अंगाशी म्हणजे अक्षरश: अंगाशी येऊ शकतं.आपल्याला चांगला चोप मिळू शकतो.
एखाद्या व्यक्तीवर टीका करणारा, पण चांगला दर्जेदार असा विनोद करता येतो. त्यासाठी आवश्यक दृष्टिकोन आणि प्रतिभा आपल्या ठाई असेल तर ते जमू शकतं. विनोद चांगला असेल तर ती टीका त्या व्यक्तीवर असूनही ती व्यक्ती स्वत: ती टीका, ती नक्कल एन्जॉय करू शकते. आपल्याकडच्या अनेक नकलाकारांना (मिमिक्री आर्टिस्टना) ते साधलं आहे. त्यांचंच कशाला, शाळा कॉलेजपासूनचे अनेक मित्रमैत्रिणी आठवत असतील जे आपली खूप टर खेचत होते अन् त्यांचं ते खेचणं पण आपण एन्जॉय करत होतो. आजही मित्रमंडळीमध्ये आपली अशी थट्टामस्करी, विनोद चालतो ना?
मंडळी, आपल्याला हसायला केव्हा येतं तर जेव्हा दुसर्‍या कुणाची तरी फजिती होते तेव्हा. एखादा तरुण रस्त्यावरून ऐटीत चालला आहे. एखादी सुंदर मुलगी रस्त्याच्या कडेला उभी आहे म्हणून तो अधिकच ऐटीत चालला आहे. तिचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय. ती सुद्धा त्याच्याकडे बघतेय. अन अचानक तो तरुण केळ्याच्या सालीवरून सुळ्ळकन घसरतो आणि त्याचं ढुंगण जोरदार आदळतं… आता हसायला येणार नाही तर काय होईल? असं कोणाला हसायचं नसतं असं आपण कितीही म्हटलं तरी विनोद असाच निर्माण होतो. कुणाची तरी ट्रॅजिडी होते आणि त्यातून कॉमेडी होते.
आपण पाहतो की विनोदी अभिनेते, अभिनेत्री यांना आवड आणि त्याच्या कामाचा भाग म्हणून विनोदाचं व्यसन लागतं. सतत विनोद जगणारी ही मंडळी इतरांच्या मानाने अधिक आनंदी जगतात. आजारपण त्यांच्यापासून दूर राहातं.
विनोदी लेखक, कलावंतच विनोद करतात असं नाही. सामाजिक राजकीय नेतेही अनेकदा भाषणात विनोदाची पेरणी करतात. विनोदाची उत्तम समज असलेल्या राजकीय नेत्यांच्या सभेत हमखास गर्दी होते. आजही विनोदाची जाण असलेले राजकीय नेते राजकारणात दिसत आहेत. त्यांची नावं मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण एक जुनं प्रसिद्ध उदाहरण सांगायचं तर आचार्य प्र. के. अत्रे एका भाषणात म्हणाले होते की गांधी गेले, नेहरू गेले… माझीही तब्येत हल्ली बरी नसते.
फार पूर्वी मी मुलुंडला एका सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकलं होतं. त्यांच्या हस्ते शिवसेनेच्या नव्या कोर्‍या रुग्णवाहिनीचं उद्घाटन होतं. बाळासाहेब त्या प्रसंगी म्हणाले की ‘मला इथे आल्यावर कळलं आहे की ही नवी रुग्णवाहिनी घेतल्यामुळे जी जुनी रुग्णवाहिनी होती ती आता शववाहिनी केली आहे. एक बरं आहे की आता जिची शववाहिनी केली आहे, तिचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं नव्हतं. बाळासाहेबांना विनोदाची खूप चांगली जाण होती. त्यामुळे विरोधकही त्यांच्या भाषणाला गर्दी करत. असो. तर मंडळी आपण आपल्या जीवनात विनोदाचा आनंद घेणे आवश्यक आहे.
प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर म्हणतात, सतत तणावग्रस्त राहिल्याने हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या धमन्यांवर परिणाम होतो आणि त्या नीट काम करत नाहीत. सतत तणावग्रस्त राहणे हे हृदयविकाराला निमंत्रण ठरू शकतं. नैराश्य, दु:ख, राग, ताणतणाव ही सारी मंडळी हृदयावर जोरदार हल्ले चढवत असतात. सतत वैतागत राहिलात तर हार्टअटॅक येईल आणि शांत राहिलात तर आनंदाने जगता येईल. डॉ. पाटकर म्हणतात, ‘हास्यविनोद करत जगणारे लोक तणावग्रस्त लोकांपेक्षा अधिक निरोगी राहतात. निरोगी जगतात.
तर मंडळी, एकूण लाफ्टर इज बेस्ट मेडीसीन असं म्हणतात ते काही खोटं नाही. आरोग्याच्या क्षेत्रातले तज्ज्ञही हे मान्य करतात. आपल्या आजूबाजूला पाहिले तर ही गोष्ट खरी असल्याचं लक्षात येतं. उदा. लोकल ट्रेन ही मुंबईसारख्या शहरांची लाईफलाईन आहे. या ट्रेन प्रवासात मित्र मंडळीचे ग्रुप असतात. काहीजण नेहमीच्या प्रवासात एकमेकांचे मित्र होतात. लोकलच्या त्या जनरल कंपार्टमेंटमध्ये पुरुषांची एकमेकात खूप हेल्दी थट्टामस्करी चाललेली असते. या बोलण्यात इतकी गंमत जंमत आणि इतका विनोद असतो की तो करणार्‍या त्या व्यक्तींचं स्वत:चं मनोरंजन होत असतंच, पण त्याचबरोबर ओळखीच्या आणि अनोळखी सहप्रवाशांच्या गालीही हसू येत असतं. त्यांचाही प्रवास सुखकर आणि छान होत असतो. क्वचित कोणी भांडू लागलं तर हे दिलखुलास प्रवासी नर्मविनोद करून त्यांचा राग शांत करतात.
म्हणजे एखादा म्हणत असेल, ‘दाखवू काय तुला?’ ‘हो चल दाखव’ असा काही संवाद सुरू असेल तर गंमत करत कोणीतरी म्हणतो ‘अरे बाबांनो, इथे जागा नाहीये. दाखवलंत तरी इथे काही दिसणारही नाही. स्टेशन आलं की खाली उतरून एकमेकांना काय दाखवायचं ते दाखवा. प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत. त्यातही दिसेल. ताबडतोब रेल्वे पोलीसही येतील आणि तुम्हाला मदत करतील.’ या संवादामुळे सगळ्यांच्याच ओठी हसू येतं आणि ते भांडणारे दोघेही भानावर येतात.
जनरल कंपार्टमेंटमध्ये प्रवासात पुरुष एकमेकांची थट्टामस्करी करतात, विनोद करत रहातात म्हणूनच कदाचित तिथे कमी भांडणे असतील का? स्त्रियांच्या कंपार्टमेंटमध्ये त्या मानाने विनोद, थट्टा मस्करी कमी होत असावी आणि म्हणूनच एकमेकींशी जास्त भांडणं होत असावीत का? तुम्हाला काय वाटतं? (मुली, स्त्रिया यांच्यामध्ये आपसात एकमेकींची थट्टामस्करी करणे, विनोद करणे याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने कमी आहे. अर्थात त्या रोजच्या जगण्यातल्या प्रश्नावर गंभीरपणे अधिक बोलतात. (चला, कव्हर केलं मी. उगीच बायका जास्त भांडतात असं म्हणालो म्हणून बायका मुलींनी माझ्याशी भांडू नये.)
मंडळी, एखाद्या घटनेने, एखाद्या परिस्थितीने, एखाद्या व्यक्तीमुळे आपण स्वत:ला सतत त्रस्त करून घेण्यापेक्षा विनोदासोबत मस्त रहाणं कधीही चांगलंच नाही का? इतरांवर विनोद करता येतात तसंच स्वत:वर विनोद करण्याचंही एक महत्व आहे. अनेक विनोदी लेखक, अभिनेते, हास्य व्यंगकवी स्वत:वर विनोद करताना दिसतात. सुरेंद्र शर्मांच्या ओळी साधारण आठवतात त्या इथे मराठीत देतो. (सुरेंद्र शर्मांची मूळ भाषा माझ्याकडून चुकायला नको म्हणून मराठीत देतो.)
ते म्हणतात, होळी (रंगपंचमी) खेळल्यानंतर मी सासुरवाडीला घरात येऊन मेहुणीला विचारलं की, हे घरात माकडाचं चित्र का लावलं आहे?
मेहुणी म्हणाली, हे माकडाचं चित्र नाही. तुम्ही आरशासमोर आला आहात.
आमच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या जिज्ञासा या कुमारवयीन मुलामुलींच्या उपक्रमातील एक संवादक बाईंची मुलगी कविता करायची. तिला त्या कविता मला दाखवायच्या होत्या. ती मुलगी आणि मी कधी भेटलो नव्हतो, त्यामुळे तिने मला बघितलं नव्हतं. आमचं दादरला एका मॉलच्या गेटकडे भेटायचं ठरलं. मी वेळेवर पोहोचलो. तेवढ्यात तिचाही फोन आला. सर मी पोहोचले. तुम्ही कुठे आहात? तिला शोधायला कठीण जाऊ नये म्हणून मी तिला खूण सांगितली. म्हटलं, तुला गेटजवळच्या त्या वँâटीनजवळ उजवीकडे एक बटबटीत डोळ्यांचा कळकट मळकट माणूस दिसतोय? ती म्हणाली, हो, त्याच्या कुठे? मी म्हटलं त्याच्या कुठे नाही. तो मीच आहे.
असाध्य आजारांशी लढताना माणसं आपली वेदना विसरली, टीव्हीवर विनोदी कार्यक्रम पाहण्यात रमली. आजाराशी लढताना त्यांना विनोदी कार्यक्रमांचा खूप उपयोग झाला. तो उपचार ठरला. औषध ठरलं हे आपण अनेक रुग्णांकडून ऐकलं आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी विनोदी मालिका, सिनेमे वगैरे पाहून तो काळ सुसह्य करून घेतला हे आपण जाणतोच. तेव्हा विनोदी पुस्तके वाचूया, विनोदी कार्यक्रम बघूया, ऐकूया. चांगल्या आरोग्यासाठी आपण चांगला आहार घेतो. काहीवेळ व्यायामासाठी राखून ठेवतो तसं दिवसाकाठी विनोद अनुभवण्यासाठी आपण वेळ राखून ठेवला तर नक्कीच आपल्याला चागलं आरोग्य आणि आयुष्य लाभेल.

Previous Post

‘ऑपरेशन – आवा दे, आवा दे’

Next Post

जेजू बेट

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

जेजू बेट

हरवलेल्या मूल्यांचा शोध!!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.