ग्रहस्थिती : रवि मेष राशीत, हर्षल वृषभ राशीत, बुध, शुक्र, शनि, राहू, नेपच्युन मीन राशीत, प्लूटो मकर राशीत, मंगळ कर्क राशीत, केतू कन्या राशीत. दिनविशेष : २६ एप्रिल शिवरात्री, अमावस्या. सुरुवात रात्री ४.५० वा., २७ एप्रिल अमावस्या समाप्ती उत्तररात्री १.०१ वा., २९ एप्रिल श्री परशुराम जयंती, ३० एप्रिल अक्षयतृतीया, १ मे महाराष्ट्र दिन, श्री विनायक चतुर्थी.
– – –
मेष : काळजी घ्या, प्रतिष्ठेला तडा जाऊ देऊ नका. नोकरीत झटपट कामे करू नका. व्यवसायात आश्वासने देऊ नका. आर्थिक व्यवहारांत खबरदारी घ्या. घरात आनंद राहील. नातेवाईकांच्या भेटी होतील. तीर्थयात्रा होतील. दानधर्म होईल. मुलांना यश मिळेल. तरुणांना नव्या संधी मिळतील. आर्थिक बाजू चांगली राहील. कलेमधून पैसे मिळतील. उकाड्यात त्वचाविकारांची काळजी घ्या. मनस्वास्थ्य जपा. उच्चशिक्षणाचे प्रश्न पुढे जातील. शिक्षक, कलाकार, ब्रोकर यांच्यासाठी चांगला काळ.
वृषभ : मनासारखी कामे होतील. आत्मविश्वास वाढेल. लेखक, कलाकार यांना पुरस्कार मिळेल. सामाजिक कार्यातून प्रतिष्ठा वाढेल. किरकोळ वादाकडे दुर्लक्ष करा. योगा, ध्यानातून मनस्वास्थ्य जपा. कुटुंबासोबत वेळ घालवाल. नोकरी-व्यवसायात दमाने काम करा. त्वचाविकार होतील. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा. आर्थिक नियोजन करा. महिलांना यश मिळेल. जवळच्या मित्रावरही विश्वासू नका. मौजमजा टाळा. येणे वसूल होईल. इस्टेट एजंट, पत्रकार, प्रकाशक, कवी, लेखक यांना यशदायी काळ.
मिथुन : कामाचा ओघ वाढेल, कर्तबगारी दाखवाल. नोकरी, व्यवसायात कामे पुढे ढकलू नका. तरुणांना अपेक्षित यश मिळणार नाही. काही कामे शांततेत करा. पैसे अकारण खर्चू नका. नव्या गुंतवणुकीतून फायदा होईल. ज्येष्ठांचा सल्ला माना. राग व्यक्त करू नका. काही गोष्टी सोडून द्या. व्यवसायात तणाव वाढेल. मनस्वास्थ्य बिघडेल. नवी नोकरी मिळवाल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. शुभघटना कानी पडेल. नव्या व्यक्तीची ओळख होईल. नातेवाईक, मित्रांचे सहकार्य मिळेल. चेष्टामस्करी टाळा.
कर्क : विनम्रता कामी येईल. घरात आपणच बरोबर हे दाखवू नका. तरुणांना प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील, नियोजन करा. घाई टाळा. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम होईल. नव्या ऑर्डर मिळतील. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत सबुरीने घ्या. भूमिकेवर ठाम राहिल्याने वाद होतील. घरात जपून बोला. नवीन गुंतवणूक होईल. सबुरीने निर्णय घ्या. मित्रांच्या बाबतीत भावनेच्या आहारी जाऊ नका. कामानिमित्त विदेशात जावे लागेल. प्रवासात काळजी घ्या. वाहन चालवताना जपून.
सिंह : अहंकाराची झालर अडचणीत आणू शकते. बोलताना काळजी घ्या. इतरांवर मते लादू नका. नोकरीत मनासारखी कामे होतील. प्रमोशन, पगारवाढ होईल. व्यवसायात कामाचा ओघ वाढेल. बचत करा. काम नियमात राहूनच करा. जुने आजार डोके वर काढतील. अनपेक्षित बातमी कळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. मुलांना यश मिळेल. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. विचार करून निर्णय घ्या. पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक घ्या. कामानिमित्त प्रवास कराल. घरातले वातावरण उत्तम राहील. एखादा समारंभ होईल.
कन्या : मनासारखी गोष्ट न झाल्याने टोकाचे निर्णय घेऊ नका. नोकरीत आवाका ओळखून पुढे पाऊल टाका. व्यवसायात कसोटीचे क्षण येतील. मनस्वास्थ्य बिघडू देऊ नका. किरकोळ अपमानाकडे दुर्लक्ष करा. लॉटरी, सट्टा, शेअरच्या प्रेमात पडू नका. नोकरीत वरिष्ठ खुश होतील. आर्थिक व्यवहार जपून. महिलांनी प्रकृतीकडे लक्ष द्यावे. चुकीच्या मार्गाने पैसे कमावू नका. नोकरीत बदली होईल. घरात बंधू वर्गाचे सहकार्य मिळेल. खेळाडूंना यश मिळेल. शिक्षक, संशोधक यांच्यासाठी चांगला काळ.
तूळ : नोकरीत कामाचा ताण घेऊ नका. स्पष्ट राहा.व्यवसायात ध्येय गाठाल. महिलांना यशासाठी अधिक काम करावे लागेल. घरात वागताना काळजी घ्या. नोकरीत सकारात्मक विचार करा. जुन्या वादाला फोडणी देऊन मित्रांशी संबध बिघडवू नका. सरकारी नियम पाळा. तरुणांना यश मिळेल. प्रेमप्रकरणात काही गोष्टी माफ करा. कुटुंबासाठी अधिक पैसे खर्च कराल. व्यवसायात काम लांबणीवर पडेल. आर्थिक नुकसान टाळा. नव्या व्यवसायाच्या संकल्पना पुढे नेऊ नका. धार्मिक कार्यात मन रमेल.
वृश्चिक : नोकरीत काळजी घ्या. चुका टाळा. मर्यादा ओळखून पुढे जा. कुटुंबासह तीर्थयात्रेतून आनंद मिळेल. व्यवसायात गोड बोलून काम पुढे न्या. तरुणांनी घाई टाळावी. राग व्यक्त करू नका. मिष्टान्नभोजनाचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. नियोजनपूर्वक खर्च करा. सरकारी कामे मार्गी लावताना कष्ट पडतील. वेळापत्रक बिघडेल. उन्हाळ्यात मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. नवीन वास्तू घेण्याच्या दिशेने वाटचाल होईल. बँकेतून नवीन कर्ज मिळेल. नवीन गुंतवणूक करताना नियोजन करा.
धनु : सगळ्या गोष्टी बोलू नका. नोकरी, व्यवसायात भान ठेवून काम करा. वास्तू, मालमत्ता, जमीनजुमल्याचे व्यवहार काळजीपूर्वक करा. कामाचा ताण घेऊ नका. मित्रमंडळी, नातेवाईकांच्या हो ला हो करा. आर्थिक देवाणघेवाणीत कागदपत्रांची तपासणी करून सही करा. नोकरीत अति आत्मविश्वास टाळा. तरुणांची परीक्षा घेणारा काळ Dााहे. व्यवसायात चढउताराचा सामना करावा लागेल. आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. व्यवसायाचा विदेशात विस्तार अडकेल.
मकर : कामाचे नियोजन करा. सल्ले विचारपूर्वक द्या. नोकरीत नव्या आव्हानांचा सामना कराल. विचारपूर्वक निर्णय घ्या. बौद्धिक खेळात यश मिळेल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल, हुरळून जाऊ नका. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. पैशाची उधळपट्टी टाळा. सामाजिक क्षेत्रात नव्या संधी येतील. समाजसेवेला वेळ द्याल. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा. लेखक, प्रकाशकांना सन्मान लाभेल. माहिती तंत्रज्ञानात उत्कर्षाचा काळ. अचानक धनलाभ होईल. तरुणांना यश मिळेल. थकीत येणी वसूल होतील.
कुंभ : तोंडात साखर ठेवा, अर्धी कामे हलकी होतील. मित्र, नातेवाईकांना मदत कराल. किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष नको. घरात किरकोळ कुरबुरी होतील. नोकरीत काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. व्यवसायात मोठ्या रकमेचे आर्थिक व्यवहार जपून करा. सार्वजनिक जीवनात काळजी घ्या. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. लेखाजोखा तपासून गुंतवणूक करा. झटपट पैसे मिळवताना फसगत होऊ शकते. धार्मिक कार्याला वेळ द्याल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल. कवी, लेखक, खेळाडू, राजकारणी यांच्यासाठी चांगला काळ. शुभ घटना कानी येईल. घरातले वातावरण उत्तम राहील.
मीन : नोकरी व्यवसायात चुका टाळा. मित्रमंडळींना विचारपूर्वक मदत करा. वेळेचे नियोजन करा. अनोळखी व्यक्तीवर विश्वासून व्यवहार करू नका. कोणाचे बोलणे मनावर घेऊ नका. नोकरीत दूरचे प्रवास घडतील. शिक्षक, प्राध्यापकांना सुखद बातमी मिळेल. संशोधनक्षेत्रात विदेशात जाण्याची संधी मिळेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. कलाकारांसाठी यशदायक काळ. देवदर्शनाला जाल. दानधर्म होईल. सार्वजनिक जीवनात गोडी गुलाबी दाखवा. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.