• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

पावसाचा निबंध

- सई लळीत (विचारवंतीण)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 23, 2022
in मी बाई विचारवंतीण
0

नेमेचि येतो मग पावसाळा या सुप्रसिद्ध वाक्यात पावसाबद्दल फारसं कौतुक दिसत नाहीये… म्हणजे रागही नाही, कौतुकही नाही; सपशेल म्हणतात तसं गृहित धरलेलं आहे. कोणी बरं लिहिलं असेल? कुठल्या गावाच्या माणसांनी? म्हणजे रोज दूधवाला किंवा पेपरवाला येतो, महिन्यातून एकदा सिलिंडर येतो; तसा आपला पाऊस वर्षभराचा पाण्याचा रतीब घालायला आलाय असं वाटतं. पण त्याने जरा ओढ दिली की लगेच तो चीफ गेस्ट वाटतो. (इथे ओढ शब्द कसा वेगळ्याच रुपात आलाय पहा… म्हणजे ताण अशा अर्थी आलाय… मराठी भाषा वळवावी तशी वळते म्हणतात ते काही खोटं नाही.)
परवा चार दिवसांपूर्वी आमच्याकडे पहिला पाऊस पडला, जोरात नाही.. पण अगदीच मरतुकडाही नाही आणि दणदणीतही नाही. असा मध्यम स्वरुपाचा पडला. मी खूश होते. अरे, असं पडणं सोपं असतं का, तुम्हीच बघा!
आमच्या शेजारची म्हातारी लगेच त्याला आल्या आल्या पटकन म्हणाली, ‘काय पडायचा तो पटकन पड.. पिरपिरत राहू नकोस.’ पहिल्या अर्धा तासात हे असलं घालून पाडून जिव्हारी बोलणं शोभतं का?
मी अविश्वासाने काय म्हटलं, म्हणून परत विचारलं. तर तिने हसत हसत तेच उत्तर दिलं! मला असा संताप आला… की हिला ताबडतोब स्वखर्चाने मोहीम काढून मंगळावर पाठवावं. तिथे गेल्यावर तुला कळेल की पाऊस म्हणजे काय असतं ते… आयुष्यात! तो काय तुमचा गडी माणूस आहे का…? पहिल्या दिवसापासून शिस्त लावायला की बापडा काहीच बोलत नाही म्हणून वाट्टेल ते पचकायचं? तुझ्या आयुष्यातला हा सत्याऐशीव्वा पावसाळा.. जरा प्रेमाने, कौतुकाने बघ त्याच्याकडे! तुझ्या आयुष्यातल्या कित्येक बर्‍या-वाईट क्षणांचा साक्षीदार आहे तो.. जरा उत्सव साजरा कर. पेन्शनीतले थोडे पैसे संपव. दोन झाडं आणून लाव निदान कुंडीत तरी…! मनी प्लांट नको…! हळद, कोरफड लावलीस तरी चालेल…! जरा शेजार्‍यापाजार्‍यांना कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी, गुळ्याची भजी अशी पार्टी दे. पोराबाळांना खोबर्‍याच्या आंब्याच्या वड्या वाट. माझा सल्ला विचार की बाये अमुकअमुक माझ्या मनात आहे, मी काय करु? मी दिले असते बरेचसे सल्ले फुकटमधे..!
असो. मग पुढे ती काही बोलली नाही. फणसाच्या पोटावर टिमकी वाजवत तो पिकलाय का बघत राहिली…! फणस काय करवादायचा नाही. तूर्तास मी म्हातारीकडे असा कटाक्ष भिरकावून दिलाय की ती पावसाला मनातल्या मनातही नावं ठेवूच शकत नाही. केलंन् तर कौतुकच करील. अरे, पृथ्वी फुकटात राहायला मिळालीय म्हणून काय वाट्टेल ते बोलाल की काय?
दुसर्‍या ग्रहावर जराशी ओल दिसली तरी शास्त्रज्ञ खुळे होतात. (अर्थात आनंदाने) आणि आपण असे वागतो…! पावसाला कचर्‍याच्या ढिगातून, गलिच्छ वस्त्यांमधून, माणसाच्या अति हव्यासातून वाहताना काय बरं वाटत असेल? पण बिनातक्रार पडतोय सहृदयतेने, तर त्याला उठसुठ नावं ठेवू नका. तो पडतोय हा मोठा चमत्कार आहे चमत्कार…!
शाळेत असताना पहिली ते चौथी, माझा आवडता ऋतु पावसाळा, हा निबंधासाठी विषय असायचा आणि पाचवी ते दहावी… नेमिची येतो मग पावसाळा. पाऊस नेहमीचाच असला तरी तो दरवर्षी कसा नाविन्यपूर्ण वाटतो हे जीव तोडून सिद्ध करणे हे आमचं काम असायचं. या दहाही वर्षांत शालू, तिने घातलेले खळखळणारे हिर्‍यामोत्याचे दागिने, देवाचा चहाचा कप सांडलाय की काय असं वाटणारं गढूळ पाणी.. कागदी होड्या, गरम गरम कांदा भजी आणि चहाची वर्णनं थोड्याफार फरकाने कायम राहिली. कधी त्याच्या जोडीला चुलीत भाजलेल्या काजी असायच्या तर कधी तव्यात भाजलेल्या फणसाच्या आठीळ्या. कधी काळ्या वाटाण्याचा सांबारा तर कधी निखार्‍यावर अलगद भाजलेले आणि वरुन थोडसं खोबरेल लावलेले उडदाचे पापड…! बाकी जीवनविषयक तत्त्वज्ञान वगैरे मधेच गुंफायची तेव्हा फॅशन नव्हती. (फॅशन कसली होती बरं मी शाळेत असताना? होड्या जुन्या वहीच्या कागदाच्या असत आणि छत्र्या काळ्याच असायच्या. माझी दहावी संपली तेव्हा साध्या रिबनऐवजी सिल्कच्या रिबन आल्या. आणखी एक, तेव्हा नुक्ते पंजाबी ड्रेस आले होते. माझा आठवीत असताना एक नुरी ड्रेस होता फुग्या हातांचा तो एक आठवतोय.(कोलापूरसुन आणला होता.)
तेव्हाच्या निसर्गचित्राइतकेच पावसाचे निबंध निरागस गोडुस असायचे. निसर्गचित्रात सरळ नीट त्रिकोणी हिरवेगार डोंगर असायचे. निळ्या पट्ट्याची नीटस नदी… पानभर पावसाच्या थेंबांची नक्षी… डोक्यावर घोंगडी घेतलेले पाठमोरे शेतकरी. एक हिवरा पिवळा बेडूक, पाण्यात कल्लेवाले चार मासे. आकाशात लखलखणारी एक वीज. छत्री घेतलेली दोन शाळकरी मुलं… आणि हिरवंगार गवत. संपला विषय.
आता नागराजने ‘पावसाचा निबंध’ नावाची शॉर्ट फिल्म केली… ती गाजलीही भरपूर. मी बघितली नाही अजून, पण नावच एवढं छान आहे की ती चांगलीच असणार याची खात्री वाटतेय.
पावसाचे वेध कधी लागतात बरं.. साधारण मार्च संपला की एप्रिलनंतर कुठेतरी लांब दूरवर असलेला पाऊस जवळ येत चाललाय असा भास होतो (जसं की पन्नाशीनंतर कुठेतरी लांब असणारा मृत्यु ब-यापैकी जाणवायला लागतो) आणि मग पापड, चिकवड्या, कुरड्या, मसाले यांच्याबरोबरच अंथरुणं पांघरुणं स्वच्छ धुवून कडकडीत उन्हात वाळवून घड्या मारुन नीट बंदोबस्तात ठेवली जातात. मग पावसात पांघरूण अंगावर घेतलं की त्याला आतून उन्हाचं अस्तर आहे असं वाटतं. विलक्षण अनुभव असतो तो…! माझं निम्म्याहून अधिक आयुष्य फ्लॅटमधे न जाता घरात गेलंय, त्यामुळे कपडे उन्हात खरपूस वाळल्याशिवाय ते निरोगी वाटत नाहीत. नुसत्या सुकलेल्या कपड्यांना उन्हाचा मंद वास येत नाही. ते जरा खंगलेले वाटतात.
कधीकधी गंमत होते… रात्रीची वेळ असते. लाइट गेलेली असते… बाहेर धुवांधार पाऊस पडत असतो… झाडं पाणी अंगण आपलं घर, कॉलनी, गाव, शहर सगळं एकजीव होत चाललेलं असतं. फक्त पावसाचं दणदणीत म्युझिक बँड पथकासारखं सुरु असतं. घरात रॉकेलचे दिवे, मेणबत्त्या, निरांजनं, समया पेटायला लागतात. घरात अचानक दिवाळीसारखी आरास दिसायला लागते.
का कोसळतोय हा एवढा? आठ दिवसांचा अभ्यास एखाद्या शाळकरी मुलाने एका दिवसात ओढून काढावा, तसा दणकून पडतोय. याला आपला सिझनल कोटा पूर्ण करायचा आहे की काय? असं आपल्या मनात येतं. एक वेगळाच आदिम काळात गेल्यासारखा अनुभव येत असतो. आता याला कसं साकडं घालावं या विचारात असतानाच लाइट येते. एकदम युग बदलल्याचा भास होतो. टीव्ही सुरु होतो. टीव्हीवर वार, पलटवार, टोमणे, टोले, कुरघोड्या सुरु होतात. टीव्ही बघत जेवण सुरु होतं… आणि अचानक आपलं बाहेर लक्ष जातं… पाऊस काढा घेतल्यावर गेलेल्या तापासारखा हळूच निघून गेलेला असतो. अलगद… एकदम चुकचुकायला होतं!
पाऊस आला की पूर्वीच्या काळी इकडेतिकडे भिजून साधीसुधी दोन वेण्यावाली रिबीन लावलेली सरदी बिरदी व्हायची. मग आई छानसा काढा करुन द्यायची. कांदा, गूळ, तुळशीची पानं, मिरी, अडुळशाचं पान, ज्येष्ठमध वगैरे मंडळी त्याच्यात आवर्जून हजेरी लावायची. तो काढा घेतला की आख्या दिवसालाच काढ्याचा वास यायचा. त्यात आणि ताप आला तर नुसती चैनच असायची. मुख्य म्हणजे आई पण एक दिवस शाळेतून सुट्टी घ्यायची. अभ्यास केला नाही तरी बाबा रागवायचे नाहीत. इतकं छान वाटायचं… आईचं घरी असणं आणि आपण तापाच्या गुंगीत दिवसभर पिसासारखं तरंगत हेलकावे खात असणं! कुठलीतरी कुंडलिनी जागृत व्हायची बहुतेक..! कसलीही तपश्चर्या न करता अध्यात्माचा असा दिव्य अनुभव देणारं हे जीवन महाग्रेट आहे.
प्रत्येक पाऊस हा आपल्याला अनुभवसंपन्न करतो म्हणून वय किंवा आयुष्य पावसाळ्यात मोजायची प्रथा आहे. चार पावसाळे जास्त काढलेत मी तुझ्यापेक्षा असं आपण लहानांना सुनावू शकतो.
मला आपलं वाटतं आपल्याला वयानुसार पाऊस दिसतो. लहानपणी अवखळ, तरुणपणात उधाणलेला उत्साही आणि प्रौढपणी परिपक्व. मनापासून खूप आवडणारा असा हा लाडका पाऊस एक एक जिवाभावाची माणसं जायला लागली की हळवा होवून मनातल्या मनात मुसमुसायला लागतो.

Previous Post

मूर्ख माणसाला शिकवण

Next Post

राळे : काळे राळे गोरे राळे

Related Posts

मी बाई विचारवंतीण

सारवासारवीचे दिवस

September 29, 2022
मी बाई विचारवंतीण

कोरस

September 16, 2022
मी बाई विचारवंतीण

गणपती इले…

September 1, 2022
मी बाई विचारवंतीण

दगडांच्या देशा…

August 4, 2022
Next Post

राळे : काळे राळे गोरे राळे

`चोरी’च्या उलट्या बोंबा

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.