• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

बावलाच्या खुनाचं त्रांगडं

- सचिन परब (प्रबोधन-१००)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 19, 2024
in प्रबोधन १००
0

प्रबोधनकारांना कोर्टबाजीत अडकवण्यासाठी दिवसरात्र एक करणार्‍या कारस्थानी ब्राह्मणी वकीलांचा कंपूचे प्रयत्न फोल ठरले. कारण त्यांना प्रबोधनकारांच्या लिखाणात काहीच कायद्याच्या दृष्टीने प्रक्षोभक आढळलं नाही. परंतु एका वेगळ्याच प्रकरणातल्या लिखाणामुळे प्रबोधनकारांना बदनामीच्या खटल्यात अडकावं लागलं. ते प्रकरण होतं, बावला खून प्रकरण.
– – –

या घटनेला पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी २०२५च्या १२ जानेवारीला बरोबर शंभर वर्ष होतील. आजच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या वेबसीरिजसाठीचा सगळा मसाला असणारी ही घटना होती. तिने पूर्ण देशात खळबळ उडवली. सर्व वर्तमानपत्रांचे मथळेच रंगले नाहीत, तर त्यावर मोठे वादविवाद घडले. शंभर वर्षांपूर्वीची अनेक मोठी माणसं या घटनेशी जोडली गेली. त्यात प्रबोधनकारही होती. आज हे प्रकरण आपल्याला अत्यंत तपशीलवार कळतं, याला कारण आहे पत्रकार इतिहासकार धवल कुलकर्णी यांचं `द बावला मर्डर केस` हे इंग्रजी पुस्तक. त्यात या प्रकरणाची पुराव्यानिशी सविस्तर मांडणी केली आहे. त्याआधारेच आपल्याला आज हे प्रकरण समजून घेता येतं.
मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान देणारे उद्योजक हाजी साबू सिद्दीक यांचा नातू अब्दुल कादर बावला हा स्वत: मोठा उद्योजक होताच. भारतातल्या सर्वात श्रीमंत माणसांपैकी तो एक होता. शिवाय मुंबई महानगरपालिकेचा सर्वात तरुण नगरसेवकही होता. अवघ्या पंचविसाव्या वर्षी त्याचा वडिलोपार्जित व्यापार होताच, मोठा जमीनजुमला होता आणि स्वत:च्या मालकीची एक कापड गिरणीही होती. मशीद बंदरच्या त्याच्या ऑफिसात आणि नंतर महापालिकेच्या मुख्यालयात दिवसभर काम करून तो थकला होता. त्याच्या काळ्या रंगाच्या देखण्या स्टडबेकर कारमधून तो गिरगाव चौपाटीजवळच्या समुद्रासमोरच्या घरी परतला. त्या काळात मुंबईतही गाड्यांची संख्या कमी होती. पण बावलाकडे पाच गाड्या होत्या. त्यातही तो सतत नवनव्या मॉडेलच्या गाड्या घेत असे आणि नवीन गाडी आल्यावर आपल्याकडची जुनी गाडी विकत असे. सतत पाच नव्याकोर्‍या गाड्यांचा ताफा बाळगत असे.
कंटाळा आला की तो अगदी मध्यरात्रीही गाडी घेऊन फेरफटका मारायला निघे. आता तर संध्याकाळचे फक्त साडेसहा झाले होते. निळ्या रंगाचा सूट आणि सोबत त्याची देखणी रखेल मुमताज बेगम याच्यामुळे तो स्वत:ही शोभून दिसत होता. त्याचा विश्वासू ड्रायव्हर मोहमद शफी गाडी चालवत होता आणि क्लिनर अहमद मोहमद पुढे बसला होता. चौपाटीवरून ते थेट अपोलो बंदरला आले. तिथे अगदी ताजा ताजा बांधलेला गेटवे ऑफ इंडिया होता. तिथून कुलाब्याला जाऊन ते पुन्हा चौपाटीला परतले. तिथे त्यांनी त्यांचा इस्टेट मॅनेजर कावू मॅथ्यूजला सोबत घेतलं. मग तीन बत्तीला वळसा घेऊन ते मलबार हिलवर हँगिंग गार्डनच्या दिशेने निघाले. संध्याकाळ झाली होती. तेव्हा आताच्या सारखी गजबज नव्हती, हा सगळा भाग निवांत असे. तेव्हा रस्त्यावर गाड्या तर नव्हत्याच पण फारशी माणसंही नव्हती. बावला आणि मुमताज गाडीत बसूनच सूर्यास्त बघत होते. हँगिंग गार्डनमध्ये गुंजणारे पोलिस बँडचे सूरही त्यांच्या कानावर पडत होते.
या रोमँटिक वातावरणात मागून येणार्‍या कारच्या कर्कश्श हॉर्नने व्यत्यय आणला. मागची गाडी वेगाने येतेय हे बघून बावलाच्या ड्रायवरने त्याची गाडी सावकाश बाजूला घेतली. पण मागून येणार्‍या गाडीचा इरादा ठीक नव्हता. ती गाडी बावलाच्या गाडीवर उजव्या बाजूने दाणकन आदळली. बावलाच्या गाडीचा मडगार्ड आणि लाईट तुटले. गाडी बावलाच्या गाडीच्या समोरच येऊन उभी राहिली. गाडीतल्या लोकांनी बावलाला शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यातला एक जोरात ओरडत होता, बाई को उतारो. गाडीतून उतरलेले आठ दांडग्या जणांनी बावलाच्या गाडीला घेराव घातला. एकाने बावलाच्या दिशेने गोळीही मारली. एकाने मुमताजला खेचण्याचा प्रयत्न केला. ती किंचाळू लागली.
तेवढ्यातच ब्रिटिश सैन्यातले चार युरोपियन अधिकारी त्याच रस्त्याने जात होते. लेफ्टनंट जॉन मॅकलन सीगर्ट आणि त्याचे तीन मित्र रेसकोर्सवरून ताज महल हॉटेलकडे चालले होते. पण त्यांना मुंबईचे रस्ते नीट माहीत नव्हते. सरळ दक्षिणेकडे जाण्याच्या ऐवजी ते केम्प्स कॉर्नरवरून चुकून डावीकडे वळले आणि ही झटापट सुरू असलेल्या ठिकाणी पोचले. हा केवळ योगायोग होता. ते रस्ता चुकले नसते तर पुढचा इतिहास वेगळा असता. मुमताजच्या किंकाळ्या ऐकून सीगर्टने गाडी थांबवली. पण त्यांच्याकडे ना शस्त्रं होती, ना ते लष्करी गणवेशात होते. त्यांनी बघितलं, काही हल्लेखोर एका गाडीला घेरून उभे होते. त्यातले काहीजण चाकू घेऊन मुमताजला गाडीतून बाहेर खेचत होते. तिचा चेहरा आधीच रक्तबंबाळ झाला होता.
सीगर्टने मुमताजला वाचवण्यासाठी उडी घेतली. त्याच्यावरही चाकूहल्ला झाला. गोळ्याही झाडल्या गेल्या. पण तो मागे हटला नाही. त्याचा मित्र लेफ्टनंट बॅटलीने गोल्फ स्टिकने पिस्तूलवाल्यावर प्रतिहल्ला केला. कर्नल विकरीने हल्लेखोराकडची पिस्तुल हिसकावून घेतली आणि त्याला पकडूनही ठेवलं. या अधिकार्‍यांनी आधी मुमताजची सुटका केली. अधिकारी भारी पडू लागलेले बघताच हल्लेखोरांनी पळून जाण्याची तयारी केली. आरडाओरडा ऐकून लोकही जमा होऊ लागल्याचं बघून त्यांचं अवसान गळाले आण्िा ते आपल्या गाडीने पळाले. तेवढ्यात पोलिसही आले. त्यांनी बावला आणि त्याच्या ड्रायव्हरला जखमी अवस्थेत बघितलं. गाडीत घालून जेजे हॉस्पिटलला आणलं. त्याच्यावर लगेच सर्जरी करण्यात आली. पण गोळी फुफ्फुस आणि आतड्यात घुसलेली असल्यामुळे त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला. युरोपियनांसाठी राखीव असणार्‍या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये लेफ्टनंट सीगर्टला मात्र गोळी वर्मी लागलेली नसल्याने वाचला.
कर्नल विकरीने पकडलेल्या पिस्तूल चालवणार्‍या हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तिथे या प्रकरणाचं इंदूर कनेक्शन उघड झालं. या हल्लेखोराचं नाव शफी अहमद नबी अहमद होतं आणि तपासात उघड झालं की तो इंदूर संस्थानात रिसालदार होता. पेट्रिक केली नावाचे आयरिश अधिकारी तेव्हा मुंबईचे पोलिस आयुक्त होते. अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा होता. ज्यांच्या कर्तृत्वामुळे मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी होऊ लागली, त्यात केली यांचा कार्यकाळही होता. त्यांना या बहुचर्चित प्रकरणाचे इंदूरच्या राजवाड्याशी जोडलेले धागेदोरे उलगडायला वेळ लागला नाही.
मुमताज बेगम ही अगदी किशोरवयापासूनच इंदूरचे संस्थानिक महाराज तुकोजीराव होळकर तिसरे यांची रखेल होती. ती मूळ अमृतसरची. तिची आजी महाराजा रणजितसिंह यांची रखेल होती. तेच वारसाहक्काने तिच्याही प्राक्तनी लिहिलेलं होतं. ती देखणी होतीच. शिवाय गाण्याबजावण्यातही तरबेज होती. ती महाराजांची लाडकी होती. ते तिला लंडनलाही घेऊन गेले. तिथे तिला दिवस गेले. तिला इंदूरला पाठवण्यात आलं. तिने एका मुलीला जन्म दिला आणि थोड्याच वेळात तिला सांगण्यात आलं की ती मुलगी मेली आहे. त्यामुळे तिला धक्का बसला आणि तिने इंदूरहून पळून जाण्याचा निश्चय केला. दोघांच्या नात्यात तेव्हापासून कटुता निर्माण झाली. उदास राहणार्‍या मुमताजला महाराजांनी मसुरीला फिरण्यासाठी पाठवलं. पण वाटेतच ती दिल्लीत उतरली आणि पोलिसांच्या मदतीने इंदुरी सैनिकांच्या ताब्यातून सटकली. तिथून पुढे अमृतसर आणि नागपूरमार्गे मुंबईला पोहोचली.
मुंबईत ती नाचगाण्याचे कार्यक्रम करू लागली. तिथे अब्दुल कादर बावला हा श्रीमंत तरुण नेहमी येऊ लागला. तिच्यावर पैसे उधळू लागला. थोड्या दिवसांनी बावलाने तिला स्वत:च्या घरातच आणलं. तिलाही तिच्या आई आणि सावत्र बापापासून सुटका हवीच होती. पण आपल्या तावडीतून सुटलेल्या मुमताजमुळे तुकोजीराव महाराजांचा अहंकार दुखावला होता. मुमताजच्या म्हणण्यानुसार महाराजांनी तिला उचलून इंदूरला नेण्याचे प्रयत्न आधीही केले होते. बावलाला धमक्या देऊनही बघितल्या होत्या. पण काही जमेना तेव्हा आपले अधिकारी पाठवून तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यात बावला मारला गेला. या हल्ल्यात इंदूर संस्थानचा एक अधिकारीच पकडला गेल्यामुळे पोलिसांकडेही पुरावे गोळा होऊ लागले. पण महाराज काही छोटी असामी नव्हते. त्यांना ब्रिटिश साम्राज्यात मोठा मान होता. त्यांच्यावर आरोप करणं पोलिस आयुक्त पेट्रिक केली यांना कठीण होतं. पण सगळ्या दबावांना झिडकारत त्यांनी कायद्याचे लंबे हात इंदूरच्या राजवाड्यापर्यंत पोचवलेच.
एवढ्या मोठ्या राजावर आरोप होताच, तो देशभर चर्चेचा विषय बनला. पत्रकारांनी महाराजांवर आरोपांचा भडिमार केला. पण प्रबोधनकार मात्र महाराज तुकोजीराव होळकरांच्या बाजूने उभे राहिले.

– सचिन परब

Previous Post

बुद्धी आणि बळात महाराष्ट्र कुठे आहे?

Next Post

अदानी वि. सोरोस

Related Posts

प्रबोधन १००

`प्रबोधन’मधील श्रीधरपंत टिळक

May 8, 2025
प्रबोधन १००

खरा लोकमान्य

May 5, 2025
प्रबोधन १००

सहभोजनाची क्रांती

April 25, 2025
प्रबोधन १००

लोकमान्यांच्या वाड्यावर अस्पृश्यांची स्वारी

April 11, 2025
Next Post

अदानी वि. सोरोस

एक देश, एक निवडणूक विरोधकांची अडवणूक

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.