• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

सीरियात आता काय होणार?

- निळू दामले (तळ नितळ)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 19, 2024
in भाष्य
0

महत्वाचे शब्द आणि नावं…
हयात तहरीर अल शाम. अल शाम म्हणजे बृहन सीरिया. लेबनॉन, इसरायल, जॉर्डन, पॅलेस्टाईन, सायप्रस आणि तुर्कियेचा दक्षिण भाग. तहरीर- स्वातंत्र्य.
अबु महंमद अल जोलानी. बंडाचे नेते.
महंमद अल बशीर. हंगामी पंतप्रधान.
८ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे बशर अल असद विमानात बसून मॉस्कोला पळाले. रशियानं त्यांना राजकीय आश्रय दिला. असद २००० सालापासून सीरियाचे लष्करी हुकूमशहा अध्यक्ष होते. ते सीरियात पुन्हा परततील? सांगता येत नाही. शक्यता अगदीच कमी आहे.
२०११ साली सीरियाच्या जनतेनं असद यांच्या राजवटीविरोधात बंड केलं होतं. आखाती प्रदेशात झालेल्या अरब स्प्रिंग या उत्स्फूर्त राजकीय उठावाच्या लाटेत सीरिया सापडला होता. राजकीय संघटनांशी संबंधित नसलेल्या तरुणांनी बंडात पुढाकार घेतला होता. इस्लामी गट आणि परदेशानं चिथावलेल्या संघटनांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. सीरियात यादवी सुरू झाली. असद यांनी अत्यंत क्रूरपणे ते बंड चिरडलं. लक्षावधी माणसं मारली. लक्षावधी माणसं तुरुंगात घातली, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. बंड चिरडण्यात इराण आणि रशियानं असद यांना मदत केली.
बंडखोर टिकू शकले नाहीत. लाखो सीरियन परागंदा झाले, युरोपात स्थलांतरित झाले. बंड विरलं. गेली पाचेक वर्षं सीरियातून बातम्या येत नव्हत्या. अचानक नोव्हेंबर २०२४च्या शेवटच्या आठवड्यात बंडखोर फौजांनी सीरियन शहरं काबीज केल्याच्या बातम्या येऊ लागल्या. अलेप्पो पडलं, इडलिब पडलं, हामा पडलं. असं करत करत बंडखोरांनी दमास्कस हे राजधानीचं शहर ताब्यात घेतल्याची बातमी आली.
शनिवारी संध्याकाळी सरकारी रेडियोनं सांगितलं की बंडखोरांच्या किरकोळ हालचाली सैन्यानं चिरडल्या आहेत, सारं काही ठीक आहे. रविवारी रेडियोनं घोषणा केली की सीरिया स्वतंत्र झाला आहे.
सीरिया पारतंत्र्यात होता?
सीरियावर सीरियातल्याच एका माणसाचं, सीरियन सैन्याचं राज्य होतं. मग सीरिया स्वतंत्र झाला याचा अर्थ काय?
– – –
अबु महंमद अल जोलानी या इस्लामी माणसानं बंडाचं नेतृत्व केलं. सुमारे दोन हजार सैनिक त्याच्यासोबत होते. शस्त्र आणि रणगाडे त्याच्याजवळ होते. रणगाडे शहरात घुसत. सीरियन पोलिस आणि सैनिक कोणताही प्रतिकार करत नसत. सैनिकांनी आपले गणवेष काढून रस्त्यावर फेकले, मुलकी कपडे घातले, नाहीसे झाले, जनतेत मिसळले. पोलिस ठाण्यात एकही पोलीस नाही. लोण्यावर सुरी फिरावी तसं जोलानीचं छोटंसं सैन्य सरकत सरकत दमास्कसमध्ये पोचलं.
लग्नाची वरात आल्यावर जसं वर्‍हाड्यांचं स्वागत होतं तसं दमास्कसच्या जनतेनं बंडखोरांचं स्वागत केलं.
अल जोलानी मुळात अल कायदा या संघटनेत होता. तिथून फुटून तो हयात तहरीर अल शाम या संघटनेचा नेता झाला आहे. अल शाम म्हणजे काय ते आपण सुरुवातीला पाहिलंच. पहिल्या महायुद्धाच्या आधी या प्रदेशाला अल शाम म्हणत असत. पहिल्या महायुद्धानंतर या विभागाचे तुकडे होत होत त्यातून सीरिया, लेबनॉन, इसरायल, जॉर्डन, पॅलेस्टाईन, तुर्किये हे देश निर्माण झाले.
अल कायदा स्थापन झालं तेव्हा पूर्ण जगात इस्लाम आणण्याचं स्वप्न बिन लादेननं पाहिलं होतं. पुढं अल कायदात फूट झाली. आखाती प्रदेश आणि पश्चिम आशियातले इतर मुस्लीम प्रदेश यांचे प्रादेशिक फुटवे अल कायदातून निर्माण झाले. त्यापैकी अल शाम हा फुटवा. त्यांना जगभर इस्लाम पसरवायचा नाहीये. त्यांना अल शाममधे इस्लाम स्थापन करायचा आहे.
इस्लाम. अल शामपुरताच मर्यादित.
जोलानी हा आता अल शामचा अमीर आहे. त्यानं महंमद अल बशीर याला सीरियाचा हंगामी प्रधानमंत्री नेमलंय.
सीरियाचं राज्य कसं असेल? कोणती संघटना त्यात प्रमुख असेल? सीरियाच्या नव्या राज्यघटनेचं स्वरूप काय असेल? ते कळायला वेळ लागेल. सध्या सारं काही अस्थिर आणि घडणावळीत आहे.
– – –
केवळ १२ दिवसात सीरियात सत्तापरिवर्तन झालंय. सत्ता आणि बंडखोर यांच्यात लढाई होऊन रक्त सांडलेलं नाही.
– – –
असद २५ वर्षं सत्तेत होते. त्यांची सत्तेवर पक्की पकड होती. त्यांनी बंडं चिरडली होती. मग केवळ दोन तीन हजार सैनिक हाताशी असलेल्या एका विस्कळीत सैन्यानं सत्ता कशी काबीज केली?
असद यांची पकड ठिसूळ होती असं म्हणायचं?
असदच्या वडिलांनी १९८२मध्ये इस्लामी जिहादींना चिरडलं. तेव्हापासून सीरियातले सुन्नी नसलेले मुस्लीम, ख्रिस्ती, अलावी मुस्लीम, ज्यू आणि लिबरल गट असद यांच्या सत्तेसोबत राहिले. हफेझ आणि बशर, दोघांनीही लोकशाही नाहीशी केली, सत्ता अमानुष रीतीनं वापरली. लोकांनी ते सहन केलं, त्यांना वाटलं की सीरियामध्ये जिहादी मुस्लीम राज्य येणार नाही. जिहादी गट सुन्नी होते. इराणच्या शिया राजवटीनं असद राजवटीला मदत केली. या दोन आधारांवर असद पितापुत्रांनी राज्य केलं.
लष्कर, इराणचा पाठिंबा आणि समाजातल्या प्रबळ गटांचा पाठिंबा हा आधार एवढा मजबूत होता की असदांना जनतेचं कल्याण वगैरे करण्याची जरूरच भासली नाही. पितापुत्रांनी समाजातले वरच्या थरातले लोक स्वतःभोवती गोळा केले. सत्तेचे सर्व फायदे त्या लोकांमध्येच जिरले. बाकीची तमाम जनता भीक मागत राहिली. सीरियाचा विकास झाला नाही, जो काही झाला त्याची फळं समाजातल्या मूठभर वर्गाला मिळाली.
दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे ९० टक्के जनता गरीब राहिली, त्यांचा बशरवर राग होता. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचा फायदा झाला त्या मूठभरांना फक्त सत्तेचे फायदे हवे होते. त्यांना जिहादींपासून सुरक्षित राहायचं होतं. बस. त्यापलीकडे त्यांना काहीही नको होतं; ना लोकशाहीची चिंता होती, ना देशातल्या बहुसंख्य लोकांची.
अल शामवाल्यांनी स्वारी केल्यावर बहुसंख्य जनता शांत राहिली, नव्हे, आनंदीच झाली. मूठभर लोकांना असदशी देणंघेणं नव्हतं. असद गेला तर गेला, नवी सत्ता कशी असेल, ती आपल्याला सुखी करेल की नाही एवढीच चिंता त्यांना होती. ते शांत राहिले.
राहता राहिला लष्कराचा प्रश्न. लष्करही पोटावर जगत होतं. लष्करातले वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट होते, त्यांना खिसे भरण्यापलीकडे असद यांच्यात रस नव्हता. असद गेले यात त्यांना वाईट वाटण्यासारखं काहीच नव्हतं. लष्करही शांत राहिलं.
असदला इराणचा पाठिंबा होता. इराणी गनीम, शस्त्रं आणि पैसा असदना मदत करत असे. इसरायलनं इराणला एवढं ठेचलंय की इराण पार गळाठला आहे. इराणनं असदला सागितलं की आता तुझं तू पाहून घे, आमचीच स्थिती नाजूक आहे.
रशियाचा असदला पाठिंबा होता. रशियन सैनिक, विमानं सीरियात होती. रशियानं अल शामच्या सैनिक तुकड्यांवर हवाई हल्ले केले. पण ते अगदीच क्षीण होते, नावापुरते होते. मोठी लढाई झाली तर रशिया मदत करू शकणार नव्हतं, कारण युक्रेनमध्ये रशियाची फार माणसं मेलीत, फार नुकसान झालंय. युक्रेनमध्ये लढण्यासाठी उत्तर कोरियातून भाडोत्री सैनिक आणायची पाळी रशियावर आलीय. रशिया कुठून मदत करणार?
एकूणात असद एकटा पडला.
– – –
असद यांच्या राजवटीला विरोध करणारे अनेक गट सीरियात होते. त्यात आयसिस होतं, कुर्दांची संघटना होती. तुर्कियेनं पाठिंबा दिलेले गट होते. इराणच्या पैशावर जगणारे हिझबुल होते. अमिराती-सौदींच्या पाठिंब्यावर जिवंत असलेले अरब गट होते. अल शाम हा डझनभर गटांपैकी एक होता. अल शामला सर्वांचा पाठिंबा आहे असंही नाही. अल शामनं संधी घेतली, मुसंडी मारली एवढंच.
– – –
सीरिया एकटा पडलाय. शेजारचे सर्व देश सीरियाकडं संशयानं पहात आहेत. सीरियाची धूळधाण झालीय, अर्थव्यवस्था पार कोसळलीय. अमेरिकेनं आर्थिक नाकेबंदी केलीय. गंमत म्हणजे खुद्द अल जोलानीला जिवंत सुपूर्द करणार्‍याला किवा त्याचं शिर सुपुर्द करणार्‍याला एक कोटी डॉलरचं बक्षीस अमेरिकेनं ठेवलेलं आहे, ते अजून शिल्लक आहे.
तुर्की, इसरायल, अमिराती, सौदी, इजिप्त, इराक या सर्व देशांना सीरिया शांत असायला हवाय, त्यांच्या पंखाखाली हवाय. सर्व देश आणि त्यांच्या पाठीमागं राहून अमेरिका-चीन-रशिया, सीरियाला मदत करायला तयार आहेत.
अल शामचं धोरण काय आहे? त्यांना जिहाद करायचा आहे की सीरिया हा देश पुन्हा उभा करायचा आहे? त्यांना विध्वंसक इस्लाम हवाय की पिंजर्‍यात पाळलेला इस्लाम हवाय?
अल जोलानी आता मवाळ झालाय, माणसाळला आहे असं काही लोकं म्हणतात. काहींचं म्हणणं आहे की तो सध्या मवाळ दिसतोय, केव्हा फणा काढेल ते सांगता येत नाही. अफगाणिस्ताननंतरचा सीरिया हा दुसरा देश, त्यावर इस्लामी जिहादी राजवटीची सत्ता स्थापन झालीय. तालिबान स्त्रियांना बुरख्यात ठेवून अन्य बाबतीत देश श्रीमंत करण्याच्या खटपटीत आहेत. अमेरिका-चीन अशा कोणाशीही जुळवून घ्यायला तालिबान तयार आहे. तालिबानचे प्रतिनिधी अगदी गोडगोड बोलत असतात. अल जोलानी त्याच टाईपचा माणूस असावा असं सध्या वाटतंय.
सौदी, अमिराती, बहारीन, तुर्किये इत्यादी राजवटी इस्लामीच आहेत, त्या बाजाराशी जुळवून घेतात.
सीरियातली नवी राजवट काय करेल? पाहूया.

– निळू दामले

Previous Post

केवढाभाऊंचे खुर्चीचढण!

Next Post

केकदाता सुखी भव!

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

केकदाता सुखी भव!

बाळासाहेबांचे फटकारे...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.