• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

चांदीच्या अनोख्या दागिन्यांची निर्मिती

- सायली मराठे (मार्ग माझा वेगळा)

सुधीर साबळे by सुधीर साबळे
March 10, 2022
in मार्ग माझा वेगळा
0

२०१३मध्ये मी फेसबुकच्या माध्यमातून कानातले, गळ्यातले अलंकार विकायला सुरुवात केली आणि त्यातून फक्त चांदीचे दागिने तयार करणार्‍या ‘आद्या’ या ब्रॅण्डचाचा जन्म झाला. अवघ्या नऊ वर्षांच्या काळात आद्याने चांदीच्या अनोख्या दागिन्यांची निर्मिती करून मराठी, हिंदी सिनेसृष्टीमधील कलाकारांबरोबरच इतरही अनेक सेलिब्रिटींच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आद्यामध्ये तयार होणार्‍या खास चांदीच्या दागिन्यांची प्रसिद्धी विदेशात होऊ लागली असून तिथली मंडळी याच्या प्रेमात पडू लागली आहेत.
– – –

सोन्या-चांदीचे दागिने तयार करण्याचा व्यवसाय खूप कठीण. अनेकजण पिढीजात हा व्यवसाय करत असतात. तशी अनेक उदाहरणे आपल्याकडे पाहायला मिळतील. दागिने तयार करायचे म्हणजे त्याचे डिझाईन चांगले हवे, ग्राहकांना ते आवडायला हवे, अशा अनेक गोष्टी त्याच्याशी निगडित असतात. माझी आणि दागिन्यांची मैत्री जमेल, आपण वेगळ्या धाटणीचे, सोन्याचे नाही तर चांदीचे दागिने तयार करू शकू, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.
कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून काम करत असतानाची गोष्ट असेल… २०१०-२०११मधली… तेव्हा मी युरोपमध्ये नोकरी करत होते. तेव्हा ऑफिस लवकर सुटायचे, त्यामुळे दुपारी चार-साडेचार वाजता मी घरात असायचे. हातात भरपूर वेळ असायचा. त्या वेळात काय करायचे असा प्रश्न माझ्यासमोर उभा असतानाच मी किट्स बिडसच्या माध्यमातून कानातले, गळ्यातले अलंकार तयार करण्यास सुरवात केली, त्यासाठी यूट्यूबचा आधार घेतला. काही दिवसांत माझा त्यावर चांगला हात बसला, नोकरी करत असताना एक हौस म्हणून हे काम सुरू झाले, मी तयार केलेले ते अलंकार सुरुवातीला मैत्रिणींना दाखवले, त्यांनी त्याचे तोंड भरून कौतुक केले आणि तिथूनच सुरू झाला हा व्यवसाय.
दिवस जात होते, तसतशा नवीन संकल्पना आकाराला येत होत्या, त्यामधून २०१३मध्ये मी फेसबुकच्या माध्यमातून कानातले, गळ्यातले अलंकार विकायला सुरुवात केली आणि त्यातून फक्त चांदीचे दागिने तयार करणार्‍या ‘आद्या’ या ब्रॅण्डचाचा जन्म झाला. अवघ्या नऊ वर्षांच्या काळात आद्याने चांदीच्या अनोख्या दागिन्यांची निर्मिती करून मराठी, हिंदी सिनेसृष्टीमधील कलाकारांबरोबरच इतरही अनेक सेलिब्रिटींच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आद्यामध्ये तयार होणार्‍या खास चांदीच्या दागिन्यांची प्रसिद्धी विदेशात होऊ लागली असून तिथली मंडळी याच्या प्रेमात पडू लागली आहेत.

असा सुरू झाला प्रवास

२००५मध्ये मी पुण्यातल्या कमिन्स कॉलेजमधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले, त्यावेळी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मला झटकन आयबीएम या कंपनीत सॅपमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर टप्याटप्याने चांगल्या संधी मिळत गेल्या तसतसे ‘डेल्टोइट्स’, ‘सिमेन्स’, ‘अ‍ॅटोस’ या कंपन्यांमध्ये नोकरी करत गेले. भारतात बेंगलोर, हैद्राबाद, चेन्नई अशा ठिकाणी तर विदेशात युरोप, दुबई, सिंगापूर या ठिकाणी भरपूर फिरायला लागायचे. नोकरीत माझे मन चांगले रमले होते, इथे भरपूर शिकायला मिळत होते, नवीन अनुभव मिळत होते. नोकरीत पगारपाणी देखील चांगले होते. वयाच्या २३व्या वर्षी मी घर घेतले आणि त्यासाठी काढलेलं कर्ज वयाच्या २५व्या वर्षी पूर्ण फेडले. २०१०-११मध्ये कामाच्या निमित्ताने युरोपात असताना मला फावल्या वेळात किट्स बीड्सपासून कानातले, गळ्यातले करण्याचा छंद लागला. २०१४ मध्ये माझी ‘अ‍ॅटोस’मध्ये नोकरी सुरु होती, ते काम आणि हा छंद हे दोन्ही जमणे कठीण झाले त्यामुळे मी नोकरी सोडून पूर्णवेळ हेच करण्याचा निर्णय घेतला. नोकरीचा कंटाळा आला म्हणून व्यवसाय करण्यासाठी ती अजिबात सोडली नाही तर या छंदाला वेळ देता यावा म्हणून मी बाहेर पडले. तेव्हा सुरु केलेल्या या कामाचा लौकिक एवढा वाढेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. माझे यजमान जयदीप हिंगणे यांची व्यवसाय करायची खूप इच्छा होती, त्यामुळे आता नोकरी सोडलीच आहे तर आपण हा व्यवसाय एक वर्ष करून पाहू म्हणून २०१४मध्ये त्याची सुरवात झाली.

जयपूरच्या व्हिजिट आणि प्रदर्शने…

नोकरीमध्ये असताना मी कानातले आणि गळ्यातले अलंकार तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे सेमी प्रेशस खडे आणि तत्सम गोष्टींचे संशोधन करण्यासाठी शनिवार-रविवारच्या सुटीच्या दिवशी जयपूरला भेट द्यायचे. दागिने, अलंकार बनवून शहराच्या वेगवेगळ्या भागात त्यांची प्रदर्शने भरवायची, त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळायचा. २०१३मध्ये मी फेसबुकच्या माध्यमातून याची विक्री करण्यास सुरुवात केली. तेव्हा लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे २०१४मध्ये म्हणजे अवघ्या एका वर्षात फेसबुकवरील फॉलोअरची संख्या अडीच लाखापर्यंत जाऊन पोहोचली होती. व्यवसाय सुरु झाल्यानंतर त्यात फायदा म्हणून मिळणार्‍या पैशांमधून आम्ही व्यवसाय वाढवत गेलो. पहिल्या दिवसापासून व्यवसायातल्या प्रत्येक पैशाचा हिशेब ठेवण्याची सवय लावली. २०१४मध्ये आम्ही यात ५० हजार रुपयांचे भागभांडवल गुंतवले, त्यामधून दर महिन्याला पाच हजार रुपये पगार घेऊन व्यवसाय करण्याचा निश्चय केला. व्यवसायासाठी खर्च होणार्‍या प्रत्येक पैशाचा हिशेब आम्ही सुरुवातीपासून ठेवतच होतो, त्यामुळे व्यवसायातला पैसा हा तिथेच रोल होत होता. सुरवातीपासून शिस्त लावल्यामुळे व्यवसाय चांगल्या प्रकारे आकार घेत गेला. लोकांच्या कडून येणार्‍या दागिन्यांच्या ऑर्डर आम्ही त्यांना पोहचवायचो. आवश्यकता पडेल तिथे कुरिअर करायचो. तेव्हा आमचे ऑफिस कुठे नव्हते.

वेबसाइटची सुरवात

२०१४मध्ये आम्ही वेबसाइटची सुरुवात केली, तेव्हा त्यावर दागिन्यांचे ५० प्रकार होते. लोकांना येऊन चांदीचे दागिने पाहता यावेत म्हणून आम्ही केतकर रस्त्याजवळ १८० स्क्वेअर फुटाच्या जागेत स्टुडिओ सुरु केला. त्याठिकाणी लोक दागिने पाहण्यासाठी येऊ लागले, दरवर्षी आम्ही जून ते ऑगस्ट यादरम्यान इअररिंग फेस्टिव्हल घेण्यास सुरुवात केली, त्याला पहिल्या वर्षापासूनच चांगला प्रतिसाद मिळत गेला. पुढे पुढे आम्हाला ही जागा कमी पडू लागली, म्हणून मार्च २०१८मध्ये आम्ही कमला नेहरू पार्कच्या परिसरात थोडी मोठी जागा भाड्याने घेतली आणि तिथे स्टुडिओ सुरु केला. मोठी जागा असल्यामुळे तिथे येणार्‍या लोकांची संख्या वाढत गेली.

चित्रकला चांगली नसूनही…

शाळेत असताना माझी चित्रकला एवढी चांगली नव्हती, पण माझ्याकडून चांगल्या प्रकारची डिझाईन तयार होत गेली. सुरुवातीपासून मला निसर्गाच्या सानिध्यात राहायची, वाचनाची सवय, या गोष्टीचा मला डिझाइन तयार करताना चांगला फायदा होत गेला. आजही एखादे नवीन डिझाइन तयार करताना मी ते वेगळे आणि युनिक कसे होईल, याचाच विचार करत असते. माझ्या मनात सुरु असते ते डिझाइन करताना कागदावर उतरवते, लोकांच्या पसंतीला पडेल, असे रूप देऊन ते तयार करते.
२०१६ची गोष्ट असेल, काही कामाच्या निमित्ताने मी कोल्हापूरला गेले होते. तेव्हा तिथे मला २० ते २१ वर्षांचे सोन्याचे काम करणार्‍या दोन कारागीरांची भेट झाली. ते म्हणाले, आम्ही पिढीजात सराफी काम करतो, पण आम्हाला चांदीमध्येच काम करायचे आहे. सोन्यात काम करणे आम्हाला आवडत नाही. त्याच्याकडून आम्ही कुडी, ठुशी, नथ हे तीन महाराष्ट्रीयन दागिने चांदीमध्ये करून घेतले. त्यांनी हे दागिने इतके अप्रतिम बनवले की तिथूनच ते आमच्याबरोबर जोडले गेले. २०१६मध्ये आम्ही ४०० ते ५०० वर्षं जुन्या शैलीचे महाराष्ट्रीयन डिझाइनचे दागिने करून चांदीमध्ये तयार करण्याची सुरुवात केली ती इतिहास कलेक्शन या नावाने. लोकांनी या अनोख्या डिझाइनचे भरभरून स्वागत केले आणि तिथूनच आमचे नशीब बदलण्यास सुरुवात झाली. या दोन मुलांनी आद्यासाठी सुरु केलेले काम आम्हाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे ठरले आहे.

चांदीचा गजरा सव्वा वर्ष फेल झाला…

आपण तयार करतो त्या कलेक्शनमध्ये चांदीचा गजरा असायला हवा, म्हणून आम्ही प्रयत्न सुरु केले. सुरवातीला हा गजरा केला तेव्हा त्याच्या पाकळ्या तुटल्या. दुसर्‍यांदा केला तेव्हादेखील अशाच प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. सुमारे सव्वा वर्ष हा गजरा तयार करताना अडचणी येत होत्या. या कालावधीत तो सात ते आठ वेळा तुटला असेल. गजरा करताना काय त्रुटी राहतात, याचा अभ्यास केला तेव्हा कुठे सव्वा वर्षानंतर हा गजरा तयार करण्यात आम्हाला यश मिळाले. त्यानंतर अभिनेत्री विद्या बालन, प्रियांका चोप्रा यांनी हा गजरा घातला आहे.
आम्ही तयार केलेले विडा पात्रदेखील खूप युनिक आहे, ते तुम्हाला फोल्डबेल पाकिटामध्ये ठेवता येते. मराठीमधील जवळपास सगळे कलाकार, हिंदीमधील माधुरी दीक्षित, श्रद्धा कपूर, आलिया भट अशी बरीच नावे सांगता येतील, ते आद्याच्या दागिन्यांच्या प्रेमात आहेत. अक्षर नावाच्या कॅलिग्राफीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नावाच्या आकर्षक अंगठ्या तयार करतो. ती डिझाइन्स देखील लोकांना खूप आवडतात.

मनस्तापाचेही काही प्रसंग

दागिने तयार करताना अनेकदा डिझाइनची कॉपी झाल्याचे समजायचे. त्यानंतर भयंकर मनस्ताप व्हायचा. कधी कधी कोर्टाकडून नोटीस पाठवण्यापर्यंत विषय जायचा. त्यामुळे मन अस्वस्थ होऊन जायचे. पण एका क्षणी आपण पेटंटची नोंदणी करायचे असे ठरवले आणि लगेच त्याची सुरुवात देखील केली. त्यासाठी पैसे खर्च होतात. पण आता मनस्ताप होत नाही, हे चांगले आहे.

घरात कुणीच व्यावसायिक नसताना…

माझ्या घरात कुणीच व्यावसायिक नाही. माझे बाबा अर्थशास्त्रांचे प्राध्यापक, आई महापालिकेमध्ये नोकरी करायची, मी पण नोकरी करत होते. त्यामुळे व्यवसाय काय असतो, तो कसा करतात, याची मला तर अजिबातच माहिती नव्हती. व्यवसाय करायचे असे काही मी ठरवले नव्हते, नोकरीत माझे अगदी उत्तम चालले होते, पण ते सगळे योग जुळत गेले आणि हा उद्योग उभा राहत गेला. सुरुवातीला माझ्याकडे मी आणि माझा नवरा असे दोघेच जण हा व्यवसाय करायचो. आता आमच्याकडे २२ जणांची टीम झाली आहे. व्यवसाय सुरु केला तेव्हा तो अयशस्वी झाला तर प्लान-बी म्हणून आमच्याकडे काहीच नव्हते. व्यवसाय सुरु केला त्याच्या पहिल्या दिवसापासून रोज उठायचे आणि कष्ट करायचे हे धोरण ठेवले. अगदी सुटीला कुठे गोवा किंवा अन्य कुठे गेलो तरी आपल्याला नवीन काय करता येईल, याचाच विचार अहोरात्र डोक्यात सुरु असायचा. सतत सुरु असणारे आमचे कष्ट हे ‘आद्या’च्या यशाचे खार गमक आहे.

दीड-दोन वर्षात विस्तार करणार…

खास चांदीच्याच युनिक दागिन्यासाठी प्रसिद्ध असणार्‍या या ब्रॅण्डचा विस्तार करण्याची योजना आम्ही आखली आहे. येत्या वर्षात बंगळुरूमध्ये याचे शोरूम सुरु होईल. याबरोबरच अमेरिका आणि युरोपमध्ये देखील त्याचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्रात ज्या प्रकारे जुन्या डिझाइनचे दागिने प्रसिद्ध आहेत, तसे दागिने देशातल्या अनेक भागात असतील. येणार्‍या काळात देशाच्या विविध भागातील ४०० ते ५०० वर्षं जुन्या युनिक दागिन्यांच्या डिझाइनचा शोध घेऊन ती कलेक्शन चांदीमध्ये आणण्याचा विचार सुरु आहे, त्यादृष्टीने आमचा अभ्यास देखील सुरु आहे. आद्या या ब्रॅण्डचा युनिकनेस कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहोत.

शब्दांकन – सुधीर साबळे

Previous Post

शेन वॉर्न : जंटलमन्स गेमचा बंडखोर अवलिया

Next Post

ठाणे शहरात अनोखी मत्स्यशेती!

Related Posts

मार्ग माझा वेगळा

बदनाम सही, नाम तो हुआ

October 6, 2022
मार्ग माझा वेगळा

अपयशातून यशाकडे झेप

September 22, 2022
मार्ग माझा वेगळा

माझे विश्व…

July 28, 2022
मार्ग माझा वेगळा

सेंद्रिय शेतीतील मार्केटिंग

July 1, 2022
Next Post

ठाणे शहरात अनोखी मत्स्यशेती!

बाळासाहेबांचे फटकारे...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.