• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

तळघर

- प्रसाद ताम्हनकर (पंचनामा)

प्रसाद ताम्हनकर by प्रसाद ताम्हनकर
February 10, 2022
in पंचनामा
0

ऑ? सारंग डोळे फडफडून बघायला लागला. समोर मोकळी बाग त्याला वाकुल्या दाखवत हसत होती. एक कारंजे सोडले, तर लपायला दुसरी जागा देखील नव्हती. काय होईल ते होईल असा विचार करत सारंग थेट कारंजाच्या दिशेने धावला, मात्र तिथेही कोणी नव्हते. सारंगची बुद्धी काम करणेच बंद व्हायला लागली होती… अरे, ही काय भुताटकी आहे! निराशेने तो मागे वळला आणि त्याच्या बूट एकदम चिखलात रुतला. कारंज्यांचे पाणी येवढ्या लांब कसे काय उडले? त्याने वैतागून कारंज्याकडे पाहिले आणि एकदम त्याची ट्यूब पेटली.
– – –

समोर बसलेला माणूस कपाळाला आठ्या आणि चेहर्‍यावरती एक विलक्षण भाव आणून सारंगचे निरीक्षण करत होता. वरपरीक्षेला आल्यासारखे वाटून सारंगला स्वत:च्याच घराच्या हॉलमध्ये अवघडल्यासारखे वाटत होते. शेवटी कंटाळून त्याने देखील त्या माणसाचे निरीक्षण करायला सुरुवात केली. साठीच्या आसपास वय, बारीक शरीरयष्टी आणि धूर्त डोळे, पांढरे स्वच्छ धोतर यावरून माणूस व्यवहारात चांगलाच मुरलेला आणि हिकमती दिसत होता. जणू हिंदी चित्रपटातला असरानी. शेवटी त्याच्या तशा निरीक्षणाला कंटाळून सारंगच बोलता झाला, ‘तुम्हाला सारंग दर्यावर्दी म्हणजे ५०-५५ वयाची, भरघोस मिशा, डोक्यावर भली मोठी हॅट अशा अवतारातली कोणी व्यक्ती असावी असे वाटले होते का?’
सारंगच्या प्रश्नाने समोरची व्यक्ती जरा चमकली. सारंगने जणू त्याच्या मनातले विचार खडा न् खडा वाचले होते.
‘अगदीच तसे नाही, पण… गुप्तहेर म्हणजे डोळ्यासमोर…’ सारंग खदखदून हसला आणि समोरचा माणूस देखील लाजत लाजत हसला.
‘मी सुखवानी, शेठ दलचंदकडे मी मुनीम आहे.’
‘शेठ दलचंद म्हणजे दलचंद कनोजिया? ते अब्जाधीश?’ सारंग आता जरा सावरून बसला.
‘अगदी बरोबर! माझे तुमच्याकडे एक अत्यंत खाजगी काम आहे. काम स्वीकारलेत तर काही अडचणच नाही, पण नाकारलेत तर आपल्यात झालेले बोलणे तुम्ही पूर्णपणे विसरून जावे हेच तुमच्या हिताचे राहील!’ सुखवानीचा स्वर आता एखाद्या मुरलेल्या बदमाशासारखा झाला होता. सारंगला मनोमन कौतुक वाटले, शेठ दलचंदने माणूस अगदी योग्य निवडला होता.
‘सुखवानी, कोणती गोष्ट कधी विसरायची हे सारंग दर्यावर्दीला अतिशय चांगले समजते. आणि एखादी गोष्ट विसरायची नाही असे मी ठरवले तर ब्रह्मदेव आला तरी ती विसरणे अशक्य!’ सारंगने त्याच्यापेक्षा देखील थंडगार सूर लावला आणि सुखवानी जरासा वरमला.
‘सारंग साहेब, लक्ष्मीपूजन झाले की दरवर्षी कनोजिया कुटुंब त्यांच्या पिढीजात हवेलीत चार दिवस मुक्कामासाठी जाते. गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आहे. सोबत आम्हा सगळ्या नोकरांचा लवाजमा असतो. अगदी आमचे खासगी वकील आणि शेठजींचे डॉक्टर देखील सोबत असतात. यावेळी देखील आम्ही सगळे लक्ष्मीपूजन उरकून शेठजींच्या हवेलीकडे रवाना झालो. मात्र आम्ही तिथे पोहोचलो आणि त्याच रात्री शेठजी गायब झाले.’
‘काय? गायब?’
‘हो. रात्री झोपायला म्हणून आपल्या खोलीत गेले, ते तिथून नाहीसेच झाले. सकाळी नोकर चहा घेऊन गेला, तेव्हा खोली रिकामी होती. बाहेर फिरायला गेले असतील असे सगळ्यांना वाटले, पण दुपार झाली तरी त्यांचा काही पत्ता नाही. मोबाईल देखील खोलीतच सोडून गेले होते.’
‘पोलिसात तक्रार दिलीत?’
‘तिथेच तर खरी गोम आहे. सध्या शेठजींचा व्यवसाय जरा अडचणीत आहे. अशावेळी शेठजी नाहीसे झाल्याची बातमी पसरली, तर पूर्ण धंदाच कोलमडेल. प्रचंड नुकसान होईल.’
‘व्यवसायातील अडचणींमुळे तर शेठजी…’
‘शक्यच नाही! अनेकदा शून्यातून सुरुवात करून पुन्हा वर आलेत ते. मी साक्षीदार आहे त्याचा. यावेळी देखील शेठजींनी सुरतच्या तीनही जमीन विकून या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधलेला होता.’
‘माझ्याकडून तुम्हाला काय मदत हवी आहे?’
‘तुम्ही स्वत: हवेलीत येऊन या प्रकरणात लक्ष घातलेत तर आम्हाला खूप मदत होईल.’
‘ठीक आहे, पण काम मी माझ्या पद्धतीने करेन. मला कुठलीही आडकाठी चालणार नाही!’
‘तसेच होईल. बाकी माहिती मी तुम्हाला प्रवासात देतोच..’
बेन्झचा प्रवास सुरू झाला आणि सुखवानीने माहिती देणे सुरू झाले. ‘शेठ दलचंदना तीन मुले- दोन मुले एक मुलगी. सुखचंद, केवलचंद आणि शुभ्रा. सुखचंद हा पहिल्या बायकोपासून झालेला, तर केवलचंद आणि शुभ्रा दुसर्‍या बायकोपासून. शेठच्या दोन्ही बायका आता हयात नाहीत. शुभ्रा सोडली, तर इतर कोणतंही अपत्य आज्ञेत नाही. केवलचंदने तर एकही व्यसन करायचं सोडलेलं नाही. सुरतमध्ये त्याने एक बाई ठेवल्याचे देखील ऐकिवात आहे. आईच्या नावावरची सगळी संपत्ती उडवून झाली आहे, आता बहीण आणि बापाच्या संपत्तीवर डोळा आहे. सुखचंदला देखील जुगाराचा प्रचंड नाद आहे. अर्थात त्याने अजून कुठलेही प्रकरण घरापर्यंत येऊन दिलेले नाही. बापाला उलटे बोलत नाही, पण स्वत:च्या मनाचे करायचे सोडत नाही.’
त्या भव्य हवेलीच्या बाहेर उभा राहून सारंग काही वेळ तिचे निरीक्षण करण्यात दंग झाला होता. हवेलीचा पसारा चांगलाच प्रचंड होता. आजूबाजूला जंगल म्हणता येईल अशी झाडे पसरलेली होती. समोरच एक मोठी बाग होती, कारंजे होते आणि चक्क एक छोटासा तलाव देखील होता. त्यातली बदके सारंगची दखलही न घेता विहारात मग्न होती. कारंजाची ती रचना मात्र सारंगला खूप अनोख्ाी वाटली. एखादी सुरई असावी तशी ती रचना होती. कमळाच्या चार पाकळ्या एकत्र जोडून तिला कारंजाचा आकार देण्यात आला होता. नोकराने धावत येऊन त्याचे सामान उचलले आणि ते आत निघाले. आत जात असतानाच मखमली झब्बा कुडता घातलेला आणि तोंडावरूनच रंगेल दिसणारा एक तरुण समोरून चालत आला. त्याच्या उग्र वासाच्या अत्तरानेच सारंगच्या डोक्यात एक तीव्र सणक उठली.
‘शेठ गेले.. पळाले… लावला सगळ्यांना चुना.. आता कधी सापडायचे ते? पळाले असतील परदेशात…’ खदखदा हसत तो म्हणाला आणि केस उडवत बागेकडे निघून गेला.
‘केवलचंद…’ पुसटशा आवाजात सुखवानी म्हणाले आणि सारंगने मान डोलवली.
हवेलीच्या दुसर्‍या मजल्यावर सारंगच्या उतरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. खोली एकदम कडेला असल्याने सारंगसाठी एका प्रकारे सोयीची होती. प्रâेश होऊन सारंग खोलीतून बाहेर पडला आणि खाली हॉलकडे निघाला. जाताना एक दरवाजा उघडा असलेल्या रूमकडे त्याचे लक्ष गेले आणि तो थबकला. अत्यंत सुंदर रंगकाम केलेल्या ते खोलीमध्ये एक जुनाट टेबल, पाय मोडायला आलेली खुर्ची, एक जुना टाइपरायटर असे जुने सामान व्यवस्थित सजवून ठेवण्यात आले होते. टाइपरायटर शेजारीच काही टाइप केलेल्या कागदांची चळत होती. टाइपरायटर जुना असला, तरी अजून काम करत असावा. अर्थात त्याची ‘र’, ‘स’सारखी काही अक्षरे जरा मोडकळीला आलेली दिसत होती, अस्पष्ट उमटली होती. ‘पपांच्या वस्तू आहेत या सगळ्या…’ अनपेक्षितपणे मागून आवाज आला आणि सारंग दचकला. त्याने मागे वळून पाहिले आणि तो अनिमिष नेत्रांनी पाहातच राहिला. पांढरी साडी, पांढरा ब्लाऊज, गळ्यात नाजूकसा मोत्यांचा हार आणि अस्सल खानदानी सौंदर्यातली एक अप्सरा समोर उभी होती. त्याची ती अवस्था बघून ती खळखळून हसली आणि तो भानावर आला.
‘पप्पांनी व्यवसायाची सुरुवात केली तेव्हाच्या या सगळ्या वस्तू आहेत. पप्पांनी खूप प्रेमाने जतन करून ठेवल्यात. तशा निरुपयोगी आहेत, पण त्यातला टाइपरायटर मी कधीतरी वापरत असते, तोच माझा जिवाभावाचा सखा बनलाय.’ बोलता बोलता तिच्या चेहर्‍यावर एकदम वैषम्य दाटून आले आणि डोळ्यातले पाणी लपवत ती बाहेर पळाली. ती बाहेर पडली आणि तिच्या जाण्याची जणू वाट बघत असलेले सुखवानी आत शिरले.
‘ही शुभ्रा ना?’
‘बरोबर ओळखलेत.’
‘शेठजींच्या टाइपरायटरविषयी जरा हळव्या दिसतात..’
‘ती एक वेगळीच कहाणी आहे..’
‘म्हणजे?’
‘शुभ्रादेवींचे सगळे शिक्षण हवेलीतच झाले. पुढे त्यांना कविता करण्याचा छंद जडला. त्यामुळे मग त्यांना टायपिंग शिकवण्यासाठी आमचे अकाउंटंट केवलप्रसाद यांचा भाचा जिग्नेश हवेलीवर यायला लागला. दोघेही तारुण्यात पदार्पण करत होते. दोघेही मनाने जवळ आले. शेठजींना मात्र हे स्थळ मान्य नव्हते. ज्या दिवशी हे प्रकरण शेठजींना कळले, त्याच दिवशी केवलप्रसाद आणि जिग्नेश दोघेही नाहीसे झाले ते पुन्हा कोणालाच दिसले नाहीत. जिग्नेशला मुंबईला मोठी नोकरी मिळाली म्हणे… ते सगळे तिकडेच गेले कायमचे.’
‘सुखवानी, तुम्ही सांगत होतात की शेठजींचे वकील आणि डॉक्टर देखील इथेच आहेत. मला त्यांना भेटायचे आहे.’
‘डॉक्टरसाहेब आणि सुखचंद यावेळी फिरायला गेले असतील. वकीलसाहेब मात्र स्टडीमध्ये सापडतील. चला, मी रस्ता दाखवतो.’
‘आत येऊ का वकीलसाहेब?’ सुखवानींनी अदबीने विचारले. स्वरात अदब होती, पण का कोणास ठाऊक एखाद्या जुन्या मित्राला हाक मारावी, तसा तो स्वर सारंगला जाणवला.
‘या या मुनीमजी… पाहुणे कोण?’
‘हेच ते सुप्रसिद्ध गुप्तहेर सारंग दर्यावर्दी..’
वकिलसाहेब मिश्किल चेहरा करून सारंगचे निरीक्षण करत होते. अर्थात सारंग काय चीज आहे, ते त्यांना लवकरच समजणार होते.
‘ग्लॅट टू मीट यू यंग मॅन! आय अ‍ॅम सॉलिसिटर मनचंदानी.’
सारंगने एकदा सुखवानीकडे पाहिले आणि तो शहाण्यासारखा त्यांची रजा घेऊन चालता झाला. सुखवानी निघून गेल्याचे दाखवत असला, तरी तो दाराबाहेरच उभा आहे, हे सारंगच्या अनुभवी नजरेने टिपले होते.
‘मनचंदानी, शेठ दलचंद यांनी मृत्युपत्र बनवले आहे का?’
‘नाही! मात्र ते तसा विचार करत होते हे नक्की. पोरं ही अशी दुर्गुणी निघाल्यावर अजून काय होणार?’
‘काय करणार होते ते प्रॉपर्टीचे?’
‘वेल… आमचे सविस्तर बोलणे झाले नव्हते, पण ही हवेली शुभ्राच्या नावावर करून, इतर सर्व मालमत्तेचा ट्रस्ट करण्याचा त्यांचा विचार होता.’
‘शुभ्रा किंवा इतर मुलांना याची कल्पना?’
‘टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज.. कोणालाच कल्पना नव्हती. शुभ्राला कल्पना असती, तरी काही फरक पडला नसता!’
‘असे का?’
‘हवेली शुभ्राच्या नावावर होणार होती, पण ती विकण्याचा वा भाड्याने देण्याचा अधिकार तिला नसणार होता.’
‘ओह! आणि तुमचे काय?’
‘म.. म्म… माझे काय?’ मिरचंदानी एकदम गांगरले.
‘अहो, म्हणजे तुमचा यावर काय सल्ला होता?’ हसू दाबत सारंग म्हणाला.
‘वेल… शेठजींनी अजून थोडा विचार करावा आणि दोन्ही मुलांना एक संधी द्यावी असे माझे मत होते.’
‘आणि शेठजींचे?’
‘त्यांचा ठाम नकार होता.’
सारंग स्टडीमधून बाहेर पडला आणि डाव्या बाजूच्या व्हरांड्यात कोणीतरी पळत गेले. सुखवानीवरचा सारंगचा संशय अधिक तीव्र व्हायला लागला होता. हो न हो, या प्रकरणात सुखवानीला काही ना काही माहिती नक्की होती. आता शांतपणे झोपायचे आणि रात्री कामगिरीला सुरुवात करायची असे मनाशी पक्के ठरवत सारंग खोलीकडे निघाला. जेवणानंतर सगळीकडे सामसूम पसरली आणि रात्री एकच्या सुमाराला सारंग शांतपणे रूममधून बाहेर पडला आणि त्याने थेट सुखवानीच्या रूमकडे मोर्चा वळवला. त्याचे लक जोरावर असावे. सुखवानीच्या रूममधून हलक्या पावलाने एक आकृती बाहेर पडत होती. सारंगने तिचा पाठलाग सुरू केला. ती आकृती हॉल पार करून सरळ बागेकडे गेली आणि सारंग चमकला. दबक्या पावलाने तो जिना उतरत त्या आकृतीमागे धावला मात्र तोवर ती चक्क अदृश्य झाली होती.
ऑ? सारंग डोळे फडफडून बघायला लागला. समोर मोकळी बाग त्याला वाकुल्या दाखवत हसत होती. एक कारंजे सोडले, तर लपायला दुसरी जागा देखील नव्हती. काय होईल ते होईल असा विचार करत सारंग थेट कारंजाच्या दिशेने धावला, मात्र तिथेही कोणी नव्हते. सारंगची बुद्धी काम करणेच बंद व्हायला लागली होती… अरे, ही काय भुताटकी आहे! निराशेने तो मागे वळला आणि त्याच्या बूट एकदम चिखलात रुतला. कारंज्यांचे पाणी येवढ्या लांब कसे काय उडले? त्याने वैतागून कारंज्याकडे पाहिले आणि एकदम त्याची ट्यूब पेटली. पळालेली आकृती कारंज्यांमागे नाही, तर कारंज्यात शिरली असावी. त्याने सरळ पँट मुडपली आणि तो कारंज्यात उतरला. गुप्त कळ शोधण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न करायला सुरुवात केली. शेवटी पंधराव्या मिनिटाला त्याला यश आले. गुप्त कळ वगैरे काही नाही, कारंजाच्या कमळाची एक संपूर्ण पाकळीच आत दाबली जात होती आणि तिच्या समोरची पाकळी उघडली जाऊन रस्ता तयार होत होता.
हातातला छोटा टॉर्च पेटवत सारंग सरळ त्या भुयारी पायर्‍यांवरून खाली उतरला. खाली एक मोठे तळघर होते आणि त्याला चार रस्ते फुटत होते. तळघराच्या मध्यभागी एक मोठा शिशमचा बेड होता आणि त्यावर शेठ दलचंद शांतपणे झोपले होते आणि तळघरात अत्तराचा उग्र वास पसरला होता. अवाक झालेल्या सारंगने स्वत:ला सावरले आणि सरळ समोरचा रस्ता धरला. काही वेळातच समोरचा रस्ता पूर्ण बंद झाला होता. पुन्हा एकदा चाचपणी करत त्याने एक खिट्टी शोधून काढली. समोर एक लहानसा चौकोन तयार झाला आणि त्यातून त्याला त्याचीच मोकळी रूम दिसायला लागली. डोक्याला हात मारत तो मागे आला आणि आता त्याने उजवा रस्ता पकडला. इथे मात्र समोरची चौकट एका लहानशा खोलीत उघडली होती. अंदाज घेत तो आतमध्ये शिरला. खोलीत कोणीच नव्हते. एक तिजोरी मात्र जणू त्याची वाट बघत असल्याप्रमाणे भिंतीमधून त्याला खुणावत होती. सारंग घाईघाईने तिच्याकडे वळला. अशा तिजोरी उघडणे त्याच्या डाव्या हाताचा मळ होता. पाचच मिनिटात तिजोरीने शरणागती पत्करली आणि आतमधला एकमेव कागद वार्‍याने फडफडला. सारंगने घाईघाईने तो कागद काढला आणि वाचला.
‘बुडीत धंद्याचा हा ताण आता मी सहन करू शकत नाही! मी कायमचा जगाचा निरोप घेतो आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नये. सुखवानींकडे मी मृत्युपत्र दिले आहे, सर्वांनी त्याचे पालन करावे! – शेठ दलचंद कनोजिया’’
ते पत्र वाचले आणि सारंगच्या चेहर्‍यावर एक स्मित हास्य झळकले. ही केस उद्या सकाळीच सुटणार होती. आता फक्त उरलेले बोगद्यातले दोन रस्ते चेक करायचे होते बस. ते दोन्ही रस्ते कुठे जातात हे शोधत असताना देखील शेठजींच्या टाइप केलेल्या चिठ्ठीतले अर्धवट उमटलेले ’र’ आणि ’स’ त्याला अस्वस्थ करत होते.
– – –
संपूर्ण कनोजिया कुटुंब, डॉक्टर, वकील आणि सुखवानी त्या भव्य हॉलमध्ये सारंगची वाट बघत बसले होते. ‘कोण कुठला फडतूस गुप्तहेर आम्हाला हुकूम सोडतो म्हणजे काय? असे धुसफुसत केवलचंद मात्र रागारागाने फेर्‍या घालत होता. काही क्षणात सारंगच्या खोलीचे दार उघडले आणि शेठ दलचंदच्या हाताला धरून सारंग बाहेर पडला आणि हॉलमधला प्रत्येकजण ताडकन् उभा राहिला. सगळ्यांकडे मिश्किल नजरेने पाहत सारंगने शेठजींना कोचावर बसवले आणि स्वत: देखील त्यांच्या शेजारी बसला.
‘सुखवानी, नोकरांना सांगा की बाहेर जा आणि दारे लावून घ्या. इथून एकही माणूस बाहेर पडता कामा नये.’
‘हा सगळा प्रकार तरी काय आहे सारंग?’ वकील साहेब विचारते झाले.
‘हव्यास.. हव्यास म्हणतात याला. शेठजींनी धंद्याचे हिस्से करावे असे दोन्ही मुलांना वाटत होते, पण शेठजी त्याला तयार नव्हते. त्यातच बुडीत धंद्यासाठी शेठजी जमीन विकायला निघाले आणि दोन्ही पोरांची डोकी फिरली. त्यातच बोलता बोलता शेठजींनी मृत्युपत्राविषयी डॉक्टरांना माहिती दिली आणि ती त्यांची सगळ्यात मोठी चूक होती. सुखचंद आणि डॉक्टर हे अगदी जिवाभावाचे मित्र बनलेले होते.
डॉक्टरने ही माहिती सुखचंदला दिली आणि त्याच्या डोक्यातला सैतान जागा झाला. कसे माहिती नाही, पण सुखचंदला या तळघराची आधीपासून माहिती होती. त्याने डॉक्टरच्या मदतीने प्लॅन रचला आणि इथे पोहोचताच त्याच रात्री झोपेत असतानाच शेठजींचे त्यांच्या रूममधून अपहरण केले आणि सरळ तळघरात नेले.
शेठजींना मारायचे धाडस मात्र त्यांना झाले नाही. त्यातच माझे इथे आगमन झाले आणि सगळे चित्र बदलले. आता आपल्या मार्गातील शुभ्रा आणि केवलचंद यांचा काटा कायद्यानेच काढण्याचा डाव सुखचंदने रचला आणि त्याने स्वत:च मला काळी आकृती बनून तळघराचा रस्ता दाखवला. आतमध्ये त्याने केवलचंद वापरतो ते अत्तर शिंपडले होतेच. वरती तिजोरीत खोटा कागद ठेवून शुभ्रा आणि सुखवानीला अडकवायचे देखील कारस्थान रचले होते. पण सुखचंद या सगळ्यात एक गोष्ट विसरला आणि ती म्हणजे ’शेठजींना टायपिंग येत नाही!’

Previous Post

झाँबी चावला…

Next Post

वात्रटायन

Related Posts

पंचनामा

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
पंचनामा

डिसीप्लिन

May 8, 2025
पंचनामा

टेक सपोर्ट नव्हे, लुटालूट!

May 5, 2025
पंचनामा

कर भला, तो हो भला!

April 25, 2025
Next Post

वात्रटायन

१२ फेब्रुवारी भविष्यवाणी

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.