• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

‘दरड-साक्षर’ बनू या, नाहीतर कपाळमोक्ष अटळ!

- डॉ. सतीश ठिगळे

टीम मार्मिक by टीम मार्मिक
August 4, 2021
in भाष्य
0
‘दरड-साक्षर’ बनू या, नाहीतर कपाळमोक्ष अटळ!

अभेद्य भासणार्‍या महाराष्ट्रातल्या डोंगरांना काय झालंय? याच प्रश्नाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राची डोंगरराजी ठिसूळ करण्यात माणूस आणि निसर्ग हे जोमाने कामाला लागलेले दिसतायत, हे आपलं दुर्दैव. अर्थात, निसर्गाचा फेरा फिरण्यालाही पुन्हा माणूसच जबाबदार आहे, कसा ते या लेखात पाहू.
—-

तारीख : २९ जून १९८३…
ठिकाण : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, देवरूख, संगमेश्वर, चिपळूण हा परिसर…
२८ जूनपासून या भागात धो धो पाऊस कोसळत होता… आकाश फाटून अविरत बरसणार्‍या पावसामुळे या भागात ५८ ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना झाल्या होत्या. त्यामुळे या भागात मोठा हाहाकार माजला होता. झाडे उन्मळून पडली होती, डोंगरावरून माती-मुरुमाचे थरच्या थर वाहून खाली आले होते. त्यामुळे नाल्यांची प्रवाहाची दिशा बदलली होती, वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले होते… हे सारे कशामुळे घडले होते? हे एका रात्रीत झाले होते का? या प्रश्नांचे उत्तर आहे, ‘नाही’!… १९६७मध्ये कोयना परिसरात भूकंप झाला तेव्हा या भागातील डोंगरांना तडे गेले होते… त्यानंतर १९८३मध्ये दरडी कोसळल्या त्या नेमक्या त्याच जागी जेथे डोंगराला आधी तडे गेले होते. या भागातील डोंगरउताराचा समतोल ढळला होता, हा भाग अस्थिर झाला होता. त्यात इथे मोठी पर्जन्यवृष्टी झाली होती, त्यामुळे इथे दरड कोसळण्याची घटना झाली…
अलीकडच्या काळात महाराष्ट्रात दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा अशी महाराष्ट्राची ओळख. कभिन्न काळा कठीण फत्तर कोरून काढलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा इथे आहेत. हिमालय हा नगाधिराज असला तरी तो ठिसूळ आहे, वयाने लहान आहे, नुसताच उंचीने वाढलेला आहे, अजून त्याची हाडं मजबूत नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तिथे दरडी कोसळण्याच्या घटना घडणं आश्चर्यकारक नाही. पण, अभेद्य भासणार्‍या महाराष्ट्रातल्या डोंगरांना काय झालंय? याच प्रश्नाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राची डोंगरराजी ठिसूळ करण्यात माणूस आणि निसर्ग हे जोमाने कामाला लागलेले दिसतायत, हे आपलं दुर्दैव. अर्थात, निसर्गाचा फेरा फिरण्यालाही पुन्हा माणूसच जबाबदार आहे, कसा ते पुढे पाहू.

दरड अचानक कोसळत नाही…
कुणी म्हणेल दरडी अचानक कोसळतात… तर तसं अजिबात नाही. दरड कोसळण्याची वाटचाल संथपणे होत असते. सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये पावसाचे प्रमाण खूप आहे. इथल्या बेसाल्ट या खडकप्रकारात कुहरी आणि भरीत कुहरी हे प्रकार आढळतात. काही ठिकाणी खडकाला तडे गेलेले असतात. त्या भागातून वाहणारे पाणी, झरे, पावसाचे पाणी त्यात शिरते. पाऊस जमिनीत मुरल्यामुळे डोंगर उताराच्या सच्छिद्र थराच्या वजनात वाढ होत असते. बर्‍याचदा त्यामुळेही डोंगरउतारांना तडे जातात आणि ते खचण्याची प्रक्रिया सुरू होते. काही ठिकाणी अधून मधून कमीअधिक स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसत असतात. त्यातून निर्माण होणार्‍या लहरींमुळे तडे जातात, त्यात पाणी मुरून नवीन झरे निर्माण होतात. त्यामुळे देखील दरड कोसळण्याचे प्रकार होतात. डोंगराला कोणत्या भागात तडे गेलेले आहेत, हे आपल्याला माहिती नसते.
घाटमाथा आणि कोकण यांना जोडणार्‍या महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटना होतात. कारण हा भाग तीव्र डोंगरउताराचा आहे. शहरातील लहानमोठ्या टेकड्यांवर मानवी वस्ती वाढली नसती तर तिथे दरड पडण्याचे प्रकार झाले असते का?


मानवनिर्मित कारणे…
खास करून शहरात, डोंगरी भागात असणार्‍या गावठाणे, वाड्या यांचा विस्तार करत असताना डोंगराच्या पायथ्यापासून ते अगदी माथ्यापर्यंत जमिनीचे सपाटीकरण केले जाते. त्यात वृक्षतोड, नवे रस्ते तयार करणे, खाणकामासाठी सुरुंग लावणे, असे प्रकार होतात. डोंगरी भागात मानवी अतिक्रमणामुळे झरे रुंदावणे, नाले अरूंद होणे, घाटरस्त्यावर जमिनीला छेद गेल्यामुळे नवीन झरे निर्माण होणे, जमिनीचे उत्खनन करणे, चर खणणे अशा अनेक कारणामुळे भूस्खलन होण्याच्या घटना वाढतात. सह्याद्री पर्वत परिसरात महाबळेश्वर, पाचगणी, भीमाशंकर, ठोसेघर हा भाग जांभा खडकाने व्यापलेला आहे. तिथे काही भागात सुटू लागलेले सुळके आढळतात. कोकण आणि पठाराला जोडणार्‍या परिसरात काटकोनात खोदलेल्या घाट परिसरात संधियुक्त बेसाल्टचे ढिले झालेले सुळके दिसतात. त्यामुळे दरड कोसळण्याचे प्रकार या ठिकाणी होऊ शकतात. याखेरीज दरड घसरणे, घरंगळणे असे प्रकारही खूपदा होतात.
२३ जुलै १९८९मध्ये भाजे परिसरात दरड कोसळण्याची घटना झाली होती. त्यामध्ये ३८ माणसे गाडली गेली होती. हे कशामुळे झाले होते तर १९८७मध्ये म्हणजे दोन वर्ष अगोदर पावसाचे पाणी आपल्या गावात येऊ नये म्हणून लगत असणार्‍या डोंगराच्या वरच्या भागात गावातील लोकांनी पाणी अडवण्यासाठी चर खोदला होता. पावसाळ्यात मातीचा चर ढिला होऊन तो घसरत खाली येत होता. दरम्यान, त्याठिकाणी होणार्‍या मोठ्या पावसामुळे पायथ्याशी असलेले झरे रुंद होऊन ते एकमेकांना जोडले गेले होते. तिथे खणलेला चर मानवनिर्मित होता, त्यामुळे माणसाच्या चुकीने ही दुर्घटना झाली असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये…
यंदा मुंबईतल्या भारतनगरसारख्या डोंगरी भागात दरडी कोसळल्याची घटना झाली. त्यामागचे कारण म्हणजे मानवनिर्मित हस्तक्षेप परिसीमा असे म्हणता येईल. याखेरीज रत्नागिरीमधल्या खेड तालुक्यातील पोखरे गाव, महाडमधील तळीये, सातार्‍याच्या पाटण तालुक्यातील आंबेघर, चिपळूण परिसर या भागात दरड कोसळण्याच्या घटना झाल्या आहेत. त्या घटनांमागेही याच प्रकारची कारणे सापडल्यास आश्चर्य वाटणार नाही.

काय करायला हवे…
पुन्हा सांगतो, दरड अचानक कोसळत नाही. एखाद्या भागात दरड कोसळणार असेल तर त्याची पूर्वचिन्हे स्पष्टपणे दिसत असतात. बर्‍याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तसे न करता त्याकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. दरड कोसळल्यानंतर अनेकजणांची ‘आम्ही इथे पिढ्यानपिढ्या राहतो आहे, इथून गेलो तर पुढे काय, हे सोडून कुठे जाऊ,’ अशी मानसिकता होते. त्यामध्ये अडकून न पडता प्रत्येकाने सुरक्षेला महत्व देण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यात जिथे दरड कोसळू शकते अशा धोकादायक ठिकाणांचा सर्वे सरकारी यंत्रणांकडून होणे अपेक्षित आहे. गावातच सुरक्षित जागा पाहून त्याठिकाणी लोकांची तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

तरुणांना ‘दरड-साक्षर’ करा…
अलीकडच्या काळात वाढलेल्या दरड कोसळण्याच्या घटनांचा विचार करता, आजच्या तरुण पिढीला ‘दरड-साक्षर’ करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यातल्या डोंगरदर्‍यांच्या भागात फिरून तिथे निरीक्षणे कधी करायची, कुठे नवीन झरे निर्माण झाले आहेत का, याचा शोध घ्यायचा, एखाद्या परिसरात बहुपर्यावरणीय बदल होत आहेत का, हे तपासायचे, ही कामं तरुणाई करू शकते. त्याचबरोबर, दरड कोसळण्याची घटना झाल्यानंतर तिथल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी कसे हलवायचे, गावात सूचना कशी द्यायची, याच्या शिक्षणाकडेही सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याकडे दरड कोसळली की काही दिवस त्या विषयावर चर्चा होते, त्यानंतर तो विषय मागे पडतो. निसर्गात मानवी हस्तक्षेप चालूच राहतो. भविष्याचा विचार करता, आपण या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांच्या मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता आहे. ‘दरड-साक्षर’ तरुणांची तर फौज निर्माण व्हायला हवी.

चीनचा आदर्श घेण्यासारखा…
चीनचे नाव घेतले की आपल्या कपाळावरची शीर तडतडायला लागते. पण काही बाबतीत चीनकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. सात जुलै २००७ रोजी चीनमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळेस त्यांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात काम करणारा एक तरुण स्वयंसेवक एका गावाच्या परिसरात निरीक्षणे करत फिरत होता. पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला होता. त्या भागातील डोंगराचा भाग खचू लागल्याचे त्या तरुणाच्या लक्षात आले. त्याने क्षणाचा विलंब न करता मध्यवर्ती यंत्रणेला ही माहिती कळवली. त्यानंतर काही क्षणात त्या गावाच्या मध्यभागी बसवलेली घंटा जोरात वाजू लागली… धोक्याची सूचना गेल्यानंतर काही क्षणात २००० लोकांचे गाव खाली झाले, अवघ्या अर्ध्या तासात त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी मोठी दरड कोसळली. आदर्श आपत्ती व्यवस्थापनाचा हा उत्तम नमुना म्हणता येईल.
आपल्याकडे वाढत असणारे दरडींचे संकट थोपवण्यासाठी आपल्याला चीनचा आदर्श घ्यायला लागेल. बहुपेडी उपाययोजना करायला लागेल. विकास म्हणजे निसर्गाला ओरबाडणे, त्याच्या व्यवस्थांमध्ये हस्तक्षेप करणे ही कल्पना बदलून, आपली मानसिकता बदलून फक्त आणि फक्त पर्यावरणपूरक विकास करणेच गरजेचे आहे. अर्थात यासाठी आवश्यक धोरणबदलाला वेळ लागेल. त्यामुळे त्याआधी दरडी कोसळू शकतात, अशा ठिकाणांचा दरवर्षी सर्वे करून, त्याठिकाणी सुरक्षित उपाय योजना करणे यावर भर दिला गेला पाहिजे. यापुढे महाराष्ट्रात पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या आधी एखाद्या गावात धोक्याचा इशारा देऊन वेळेत सगळ्या गावाचे सुरक्षित स्थलांतर झाले, तरच आपण माळीण आणि तळीयेसारख्या दुर्घटनांमधून काही शिकलो असे म्हणता येईल.

– डॉ. सतीश ठिगळे

(लेखक भूपर्यावरणाचे अभ्यासक आहेत)

शब्दांकन – सुधीर साबळे

Previous Post

मूर्तिमंत साधे गणपतराव

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025
भाष्य

टिंग टिंग भास्कर

May 22, 2025
भाष्य

चायवाला का डरला?

May 22, 2025
भाष्य

महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

May 22, 2025
Next Post

टपल्या आणि टिचक्या

देश म्हणजे देशातली माणसं… वुई, दि पीपल!

देश म्हणजे देशातली माणसं... वुई, दि पीपल!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.