• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

आतड्यापासून लिहिणारे अवचट

- पराग फाटक (व्हायरल)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 4, 2022
in व्हायरल
0

परवा पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. महाडजवळच्या बिरवाडी इथल्या प्राथमिक केंद्रात कार्यरत राहून विंचूदंशासंदर्भात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या डॉ. हिंमतराव बावस्कर यांचं नाव पुरस्कारार्थींच्या यादीत होतं. अनेक वर्षांपूर्वी शाळेत असताना डॉ. बावस्करांविषयी पहिल्यांदा वाचलं होतं.ते लिहिलं होतं अनिल अवचटांनी.
डॉक्टरांच्या कार्याची महती कळण्याचं ते वय नव्हतं. पण हे काहीतरी महत्त्वाचं करत आहेत आणि प्रसिद्धीच्या-पैशाच्या सोसाविना करत आहेत हे जाणवलं. नि:स्वार्थीपणे काम करणार्‍या वेड्या माणसांना अवचटांनी त्यांच्या लेखणीतून जगासमोर आणलं.
ज्यांचं साहित्यात, पॉप्युलर कल्चरमध्ये काहीही डॉक्युमेंटेशन झालेलं नाही असा एक मोठा वर्ग समाजात आहे. अवचटांनी ती सगळं माणसं, त्यांचं भावविश्व आपल्यासमोर उलगडलं. पत्रकारितेत फिल्डवर जाणारे रिपोर्टर अशी एक संकल्पना असते. खरं तर सगळ्याच पत्रकारांनी लोकांमध्ये जावं अशी अपेक्षा आहे पण हल्ली तसं नसतं. अवचट हे सदैव फिल्डवर असणारे होते. बोजड-शब्दबंबाळ लिखाण म्हणजे भारी ही व्यवस्थाच त्यांनी भेदली. सहज साधं पण थेट भिडणारं लिहिलं. अवचटांनी पत्रकारिता शिकवणारी संस्था काढली नाही पण त्यांचं सगळं लिखाण हे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तुपाठ राहील.
आपण, आपले घरचे, मित्र, नातेवाईक या गोतावळ्यात मश्गुल असतो. आपले चित्रपट, मालिका इश्क-प्रेम-मोहब्बत याभोवती रेंगाळतात. आपले नायक-नायिकाही परीटघडीचे असतात. तिसरी घंटा व्हावी आणि नाटकाचा पडदा उघडावा तसं अवचटांनी लिखाणातून भवताल दाखवला. मीपणाच्या कोशातून बाहेर या, आजूबाजूला बघायची शिकवण दिली आणि तीही कृतीतून. हजारो-लाखो खर्चून सगळं ठरवून कँडिड गोष्टी सादर केल्या जातात. अवचटांनी पायात चप्पल चढवून, उन्हाळा-पावसाळा याचा विचार न करता माणसं, परिसर, गावं, वस्त्या पिंजून काढलं. वंचित, उपेक्षित हे शब्द आपण ऐकलेले असतात पण म्हणजे नेमकी कोण माणसं तिथे अवचटांनी नेलं. जनगणनेत लोकसंख्या किती, पुरुष-स्त्रिया किती हे कळतं, पण त्यांचं जगणं कळत नाही. अवचट या दृष्टीने बखरकार होते.
पुणे स्टेशनवरच्या कष्टकर्‍यांचं जग मांडलं. सिमेंटची पोती मालगाडीत भरणार्‍या कामगारांचं विश्व सादर केलं. वाघ्यामुरळी समाजाचं चित्रण केलं. काहीही आर्थिक फायदा नाही, कमर्शियल कारण नाही, सरकारी मोजदाद वगैरेचा भाग नाही तरी अवचट अनोळखी लोकांमध्ये जात राहिले, त्यांना बोलतं करत राहिले. जे अनुभवलं तसं लिहित राहिले. स्वत:च्या न्यूनगंडाबद्दल, फजितींबद्दल, त्रुटींबद्दलही लिहिलं.
सोशल मीडिया आणि स्मार्टफोनमुळे आपण सतत डोकं खुपसून डिव्हाईससमोर असतो. अनेकांच्या कानाला मोठाले हेडफोनही असतात आणि त्यात मोठ्या आवाजात काहीतरी सुरूही असतं. यामुळे बाजूने डायनासोर गेला तरी कळणार नाही अशी स्थिती आहे. अवचटांनी घर, सोसायटी, जात-धर्म-पंथ यांची वेस ओलांडली. गावोगावी जात राहिले. कोणी भेटेल याची शाश्वती नव्हती, कोणी बोलेल असंही काही ठोस नव्हतं. काही वेळेला तर जीव मुठीत घेऊन पळावंही लागलं आहे. सार्वजनिक वाहतूक यंत्रणेतून प्रवास, कम्युनिकेशनची साधनं जवळपास नाहीतच अशा काळात अवचटांनी भ्रमंती केली. लिहिलेलं छापलं जाईल, त्याला मोप पैसे मिळतील असंही काही नव्हतं. पोस्ट टाकली, ७०० लाईक, १३२९ कमेंट असंही काही नव्हतं. काहीही टाका, लाईक करणार असा अनुयायी वर्ग नव्हता. काय प्रेरणा असेल त्यांच्या भटकण्यामागे. जे बघतो, जे डोक्यात येतं तसं कागदावर उतरणं हे खूप कठीण आहे. अस्वस्थ करणारं, विषण्ण करणारं जग पाहिल्यावर पुन्हा आपल्या जगात येऊन नंतर त्यावर लिहिणं किती कठीण आहे. जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेत ‘तो आतड्यापासून बोलत होता’ असं वाक्य असतं. अवचटांंनी आतड्यापासून लिहिलं आणि म्हणूनच ते आपल्या मनात, मेंदूत ठाशीव राहिलं.
वर्णन करणं, गोष्ट सांगणं हे पत्रकाराचं काम. अवचट जे लिहित गेले, त्याचं आता रिपोर्ताज असं नामकरण झालंय. आपण जिथे जातोय तिथल्या माणसांचं, प्राण्यांचं, निसर्गाचं, आवाजांचं, न दिसणार्‍या पण जाणवणार्‍या गोष्टी बारीकसारीक तपशीलांसह लिहिणं याला आता प्रमाण मान्यता मिळाली आहे. अवचटांनी जेव्हा असं लिहिलं असेल तेव्हा कदाचित प्रस्थापितांनी थट्टाही केली असेल. कोल्हापूरात जायचं म्हणजे मंदिरात जायचं, पांढरा-तांबडा रस्सा, कोल्हापुरी चप्पल, कुस्तीचे आखाडे असं आपल्या डोक्यात येतं. अवचटांनी कोल्हापुरात जाऊन पंचगंगेच्या प्रदूषणाचा माग काढला. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर जे सेट केलेलं दृश्य आहे त्याला बाजूला ठेऊन खर्‍या प्रश्नांना भिडायचं काम त्यांनी केलं. पत्रकाराने सर्व बाजू मांडाव्यात असं म्हणतात. अवचट एखाद्या मुद्यावर असं सम्यक लिहायचे. प्रो, अँटी, न्यूट्रल सगळ्या मंडळींना भेटायचे. घटनेकडे वेगवेगळ्या चष्म्यातून बघायचं असतं हे शिकवलं.
सोशोलॉजी नावाच्या विषयात समाजातले प्रश्न असा एक चॅप्टर असतो. अवचटांचं लिखाण वाचलं तर ते सोशोलॉजिस्ट होते असं वाटतं. ते अनेक प्रश्नांच्या मुळाशी गेले. तो सगळा विषय आतून-बाहेरून समजून घेऊन लिहिला. त्या विषयावर काम करणार्‍या माणसांना जगासमोर आणलं. काही प्रश्नांसंदर्भात त्यांनी स्वत: योगदान दिलं. अवचटांनी पायपीट केली नसती तर कदाचित कचरा गाडीवर काम करणार्‍या माणसांचं आयुष्य आपल्याला कळलं नसतं. निसर्गाला तुडवत कारखाने उभारणार्‍या मोठ्या उद्योगसमूहांविरोधात काम करणार्‍या कार्यकर्त्यांविषयी कळलं नसतं. भवतालातल्या माणसांच्या आयुष्याचं दस्तावेजीकरणाचं खंडप्राय काम अवचटांनी केलं. ते पेशाने डॉक्टर होते. ठरवलं असतं तर पुण्यात भव्य हॉस्पिटल असतं त्यांचं. पण या डॉक्टरांनी माणसं वाचली. त्यांच्या आजारांवर उपचार करण्यापेक्षा त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करत त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी कमी करण्यासाठी काम केलं. माणसं, कार्यरत आणि प्रश्न आणि प्रश्न या पुस्तकांचं मराठी कळणार्‍या प्रत्येकाने पारायण करायला हवं.
ब्रँडेड गाडी, ५ प्रायोजकांचं पाठबळ, १ स्टँडी, ३ कॅमेरे असा सेटअप घेऊन हल्ली मंडळी निवडणुकीच्या कव्हरेजला जातात. अवचटांकडे यातलं काही नव्हतं. पण म्हणूनच त्यांच्यासमोर गोष्टी जशा आहेत तशा येत. बिहारवर त्यांनी पूर्णिया पुस्तकात लिहिलंय. ते वाचताना भीषण वाटतं. पण ते खरं आहे. आजही बिहार लार्जली तसाच आहे. धागे उभे आडवे वाचताना असं लक्षात येतं की हे जग आपल्याला माहितीच नाही. यांना कसं दिसलं? अवचट अमेरिकेत गेले. त्यांच्या नजरेतून वेगळीच अमेरिका कळली. ‘रिपोर्टिंगचे दिवस’मध्ये त्यांनी पत्रकाराने बातमी कशी टिपावी, मिळवावी याबाबत मार्गदर्शक ठरेल असं लिहिलंय. काही वर्षांपूर्वी त्यांनी सुमित्रा भावेंवर लिहिलं. तो एक लेख वाचला तर तुम्हाला सुमित्रा भावे, त्यांचं आयुष्य, कार्यपद्धती, चित्रपटांमागचा विचार हे सगळं कळतं. मॅक्रो ते मायक्रो हे त्यांच्या लिखाणातल्या स्थित्यंतर अनोखं होतं. त्यांनी स्वत:च्या छंदांविषयी लिहिलं. लहान मुलांसाठी लिहिलं. गेली अनेक वर्षे दिवाळी अंकातले अवचटांचे लेख वाचणं हे दरवर्षीचं आन्हिक आहे.
अवचटांचा जनसंग्रह अफाट आहे. पण अवचटांना कधीही न भेटलेली पण तरीही त्यांना जाणणारी हजारो माणसं आहेत. आपलं काम बोललं पाहिजे हे त्यांच्या लेखणीने सतत ठसवलं. हिंडा-फिरा-बघा-शोधा-उकरा-लिहा हा त्यांनी दिलेला अलिखित मंत्र मोलाचा आहे.
काही गावी गेलं किंवा एखाद्या वास्तूत शिरलं की मनशांती मिळते. तसं अवचटांचं वाचलं की तुमचे कान, नाक, डोळे सदैव उघडे राहतात. तुमची झापडं सुटतात, तुम्ही कोशात जात नाही. तुमची जिज्ञासा-कुतुहूल जागृत होत राहते. अवचट वाचल्यानंतर भारलेपण येतं. नकळत तुमच्यावर त्यांच्या शैलीचा प्रभाव होतो. अवचट वाचल्यानंतर समाजातले कथित नायक महाभंपक वाटू लागतात. त्यांच्या लिखाणामुळे आपल्याला जे भारी वाटतात त्यांचंं खुजेपण लक्षात येतं आणि खरी मोठी माणसं कोण हे समजतं. पायी चालणं, बेसिक शर्टपँट आणि झोळी हा पोशाख, सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणं, अनोळखी माणसात जाणं, लिहिणं हे सगळंच आता दुर्दैवाने कालबाह्य गणलं जाऊ लागलंय आणि असं वागणार्‍यांची थट्टी-खिल्ली उडवलीही जाते. अवचटांनी टीकाकारांचा मत्सर केला नाही. त्यांनी तत्व-जीवनशैली सोडली नाही. वेगवान आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेतही त्यांचं असणं उमेद, ऊर्जा आणि प्रेरणा देणारं होतं. ‘माणसां’ची साथ सोडण्याची अवचट गुरुजींची ही पहिली आणि शेवटची वेळ असावी…

– पराग फाटक

Previous Post

नया है वह…

Next Post

शोषित, वंचित, संघर्षमय जीवन दाखवणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व

Related Posts

व्हायरल

बाबा… सोबत आहेत… राहतील

June 22, 2023
व्हायरल

हाफ प्लेट

June 22, 2023
बिनलशीचा चॅम्पियन
व्हायरल

बिनलशीचा चॅम्पियन

June 22, 2023
व्हायरल

आगरकर आणि नेहरू लायब्ररी

June 22, 2023
Next Post

शोषित, वंचित, संघर्षमय जीवन दाखवणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व

अनिल गेला आणि मित्रत्वाचे आणखी एक पर्व संपले!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.