(नई कौमी मजलिसच्या आवारात दोन मनसबदार लुंगीत फिरताय. एक घाण बहारची पुडी काढतो, शेम शौरुक कम ढेंगनच्या स्टाईलीत तोंडात ओततो. दुसरा खुणेनं त्याच्याकडे एक स्वत:साठी मागतो.)
मनसबदार पहिला : अरे भई, एक ही मुश्किल से मिली हय। कल पक्का तेरे लिए दो लाऊँगा, और इससे बड़ी लाऊँगा। माँ कसम!
दुसरा : साले खाकर तूने इधर ही फेकी रे पुडी। बघितलं उद्या कोणी तर…?
पहिला : तूने दरबार हॉल का कोना देखा क्या कभी?
दुसरा : काय संबंध?
पहिला : लालेलाल हैं कि नहीं? मैं कंट्रोल नही झालं की थूंकता वहाँ।
दुसरा : अरे शिशिटीव्ही हाय रे तिथं!!!
पहिला : ये देख. चहापन्हा नौरंगजेब के क़ानून के मुताबिक उनका कोई सरदार कभी गलत नहीं हो सकता।
दुसरा : म्हंजे फुल्ल माफ़ी?
पहिला : ये कंट्री, ये प्रॉपर्टी हमरी हैं। यहाँ हम थूके या मूते…
दुसरा : अनपार्लमेंट्री शब्द आहे हा…!
पहिला : उस पर भी हम…! समझ जा। हमने दख्खन में और यहाँ दिल्ली में भी कुच बंदे रखें हैं। जो अनपार्लमेंट्री डिक्शनरी को पार्लमेंट्री बनाने में जुटे हैं।
दुसरा : पण कारेक्रमाला तू ब्यादश्याला काय घेणारेस?
पहिला : पहले तू बता!
दुसरा : मी दोन जर्मनच्या पेट्या, एक कोठी. एक आल्युमिनियमचं भगुणं नि ताट-वाटी देईन म्हणतो. पण कपडे करावा का? सफारी नाहीतर कोट-बिट?
पहिला : साले पागल हैं तू! सिर्फ तुझे बताता मैं, मी चारेक टहनियाँ तोड़ के दोरी नि बांधून कमर पे लटका दूँगा, चहापन्हा के। वो पागल हैं, उसे मैं बोलूँगा, ये आदिवासियों का पेहराव है। लगेच पेहनता वो, देख।
दुसरा : तू चहापन्हा नौरंगजेब को पागल बोला?
पहिला : तू दिल पे मत ले। पूरा दरबार उसे बेवकूफ मानता है, ये तुझे भी पता है। लेकिन क्या करे? मुगल दोबारा दिल्ली पर आए इसकी वजह से। म्हणून रिस्पेक्ट देतो मी जरा।
पहिला : तू भोत टेंशन लेता। क्या उसने हमें पचास खोका दिया क्या कभी? जितना वो पब्लिक का खून चूसता, उतना हमारा दिमाग।
दुसरा : हा रे! मागल्या येळी ‘मौन की बास!’ कारेक्रम ऐकायला बसलेलो, फेफरं आले रे ऐकता ऐकता!
पहिला : मैं कान में रुई ठूस के बैठता। या पीछे होगा तो हेडफोन लगाके गाने सुनता।
दुसरा : पण का रे ह्या बिल्डिंगला किती खर्च आला आसंल रे?
पहिला : ज्यादा नहीं। कूच एक आधा लाख लोगोंका खून लगा होगा।
दुसरा : पण ह्या बिल्डिंगची खरंच गरज होती का?
पहिला : तो आनेवाली नस्ले उन्हें याद कैसे रख पाएगी?
दुसरा : काही ठोस कामं करावीत की?
पहिला : किये थे। पहिली टर्म में छापे हुए सब कॉइन वापस मार्केट से निकालकर इष्टील के कुच कॉइन लाये थे मार्केट में।
दुसरा : हा चहापन्हा नेमका मुगल वंशी आहे की तुघलक वंशी हेच कळत नाही, काहीवेळा!
पहिला : वो शेर है देख, उसे थोड़ा बदल दे। ‘सबका खून सामिल हैं। इस ज़ाहिल में।…
दुसरा : पण ते कॉइन व्यवहारात फार टिकलेच नाही म्हणे? परत घ्यावे लागलेत?
पहिला : लेकिन उसकी वजह से दूसरी टर्म में जीत मिली थी न?
दुसरा : पण ह्या वेळी बंगळूर प्रांत हरल्यावर नि इंदूर प्रांत युद्धाच्या उंबरठ्यावर असताना कॉइन बंद केलेत की (तेवढ्यात पहिला मनसबदार एक कोपर्यात थुंकतो) अरे ऐ! अजून उद्घाटन व्हायचं बाकी आहे रे!
पहिला : ये कौमी मजलिस हैं। आणि ह्या आजाद कौममध्ये मी कुठेही थुंकू शकतो.
दुसरा : तू काय ऐकायचा नाहीस. पण का रे, ह्या बिल्डिंगमागे कुणाची प्रेरणा असेल?
पहिला : शाहजहाँ की!
दुसरा : कशी काय? मुगल आहे म्हणून?
पहिला : त्यानं पण दख्खनमध्ये दुष्काळ असताना पब्लिकला लुटून ताजमहल बांधला होता…
दुसरा : हो! याने महामारीच्या साथीत औषधपाण्याविना लोकं मरत असताना बांधकामावर खजिना रिता केला, पण लोकांना काही दिलं नाही…
पहिला : ये रिवाज़ है, मुगलों का!
दुसरा : पण का रे? ह्या बिल्डिंगमधी सगळ्या सोयी असतील का?
पहिला : बोले तो सब। आखीर इत्ता खर्चा किस लिए किया है?
दुसरा : म्हणजे शेपरेट मेकअप रूम सुद्धा राहील ना? ते मेन!