• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

भारतीय टेनिसचा चौथा कोन!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
February 1, 2024
in फ्री हिट
0

टेनिसचे कोर्ट हे जरी आयताकृती असले तरी भारतीय टेनिसची भूमिती ही लिएण्डर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या चौकोनात सामावलेली आहे. या तिघांपैकी थोडा उशिराने प्रकाशात आलेला हा चौथा कोन म्हणजे बोपण्णा. नुकतेच त्याने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम जिंकले आणि जागतिक क्रमवारीतील दुहेरीतील अग्रस्थानही पटकावले. कारकीर्द अस्ताकडे वाटचाल करीत असताना तो एकेक शिखरे सर करून लक्ष वेधतो आहे.
– – –

साठ-सत्तरच्या दशकांत रामनाथन कृष्णन, विजय अमृतराज यांनी टेनिसमध्ये आशेचे किरण दाखवल्यानंतर नव्वदच्या दशकात लिएण्डर पेस आणि महेश भूपती या दुहेरीच्या जोडीने भारतीय टेनिसला सोनेरी दिवस दाखवले. पेसचे वैयक्तिक ऑलिम्पिक कांस्यपदक हेसुद्धा तितकेच प्रेरणादायी. महिलांमध्ये सानिया मिर्झाच्या कामगिरीमुळे टेनिसची लाट अधिक देशाभिमुख झाली. कालांतराने पेस-भूपती यांच्यातील संघर्ष जेव्हा टोकाची भूमिका घेऊ लागला, तेव्हा त्याची धग संपूर्ण टेनिसला जाणवू लागली. यात सानिया हा तिसरा कोन तर रोहन बोपण्णा हा चौथा कोन निर्माण झाला. गेल्या तीन दशकांतील टेनिसक्रांतीमध्ये या त्रिकुटाइतका मोठा होऊ न शकलेला हा टेनिसपटू इमानेइतबारे मैदाने गाजवत होता. तो उतला नाही, मातला नाही आणि घेतला वसा टाकला नाही. पेस-भूपती काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले. गतवर्षी सानियानेही टेनिसविश्वाला अलविदा केला. पण तो मात्र टिकून आहे. जागतिक टेनिस क्रमवारीतील दुहेरीचे अग्रस्थान काबीज करणारा हा लढवय्या शिलेदार म्हणजे रोहन बोपण्णा.
वयाच्या ४३व्या वर्षी रोहनने ही किमया साधली आणि ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपदही त्याने १७व्या प्रयत्नात खिशात घातले. पेस-भूपती-सानिया यांच्या टेनिसलौकिकामुळे झाकोळला गेलेला हा अवलिया आत्ता कुठे प्रकाशात येऊ लागला आहे. पण एव्हाना तोही निवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. रोहनच्या या ऐतिहासिक यशाप्रसंगीची टेनिसपटू सोमदेव देवबर्मनची प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. ‘‘पाच वर्षांपूर्वी, मग चार वर्षांपूर्वी आणि त्यानंतर तीन वर्षांपूर्वी बॉप्सने निवृत्ती घेईन असे माझ्याकडे म्हटले होते… पण या कथेचे तात्पर्य हे की… कसलीच चिंता नाही… तो आता पहिल्या क्रमांकावर आहे! भारतीय टेनिसमधील हे सर्वोत्तम कथानक आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे.’’
रोहनच्या कथेला प्रारंभ झाला, तो ४ मार्च १९८० या दिवशी बंगळुरूत. म्हणजेच महिन्याभरात तो ४४ वर्षांचा होईल. त्याचे बालपण कूर्गच्या नयनरम्य टेकड्यांवर गेले, जिथे त्याच्या कुटुंबाचे कॉफीचे मळे होते. खेळाची विलक्षण आवड रोहनमध्ये बालपणीपासूनच होती. आधी हॉकी आणि फुटबॉल या सांघिक खेळांत तो रमला. त्या तुलनेत उशिराने म्हणजेच ११व्या वर्षी तो टेनिसकडे वळला. नंतर अपेक्षेप्रमाणे यश मिळू लागल्याने १९व्या वर्षी त्याने टेनिसमध्येच कारकीर्द घडवण्याचा निर्धार केला. पण रोहनची टेनिसक्षेत्राने दखल घ्यायला सुरूवात केली, ती २००७पासून. या पठ्ठ्याने सानियाच्या साथीने हॉपमन चषक टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे उपविजेतेपद पटकावले. यावेळी स्पेनने जेतेपद मिळवले होते.

इंडो-पाक एक्स्प्रेस!

२००७मध्येच रोहनची पाकिस्तानच्या एहसान उल हक कुरेशीसोबत पुरूष दुहेरीत जोडी जुळली. या वर्षभरात बोपण्णाने लक्षवेधी कामगिरी केली. पण २००८मध्ये बोपण्णाने एरिक ब्युटोरॅचच्या साथीने लॉस एंजेलिस येथे पुरूष दुहेरीचे पहिले एटीपी जेतेपद प्राप्त केले, तर २००९मध्ये त्याने जार्को नीमिनेनच्या साथीने सॅप खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. २०१० हे वर्ष बोपण्णा-कुरेशी जोडीसाठी महत्त्वाचे ठरले. या जोडीने एसए टेनिस स्पर्धा सुपर-टायब्रेकमध्ये जिंकली. याशिवाय ग्रां प्री हसन या मोरोक्कोच्या स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवले. ब्राझीलच्या जोडीने त्यांना नामोहरम केले. मग त्वेषाने कामगिरी बजावत विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत वाटचाल केली. एकीकडे भारत-पाकिस्तानमधील राजनैतिक संबंध कधीही अनुकूल नसताना बोपण्णा-कुरेशी जोडीने मात्र ‘इंडो-पाक एक्स्प्रेस’चा नजराणा पेश करीत चक्क अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. परंतु बॉब आणि माइक ब्रायन जोडीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. तरीही या जोडीने दबदबा निर्माण केला. टेनिस कोर्टवरील या यशस्वी जोडीने एकत्रित खेळून भारत-पाकिस्तान मैत्रीसाठी आवाहनही केले. ‘युद्ध थांबवा, टेनिस खेळा’ हे त्यांचे अभियान गाजले. ‘एटीपी’ म्हणजेच असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स या पुरूष टेनिसमधील शिखर संघटनेने या जोडीला प्रतिष्ठेचा आर्थर अ‍ॅुश मानवतावादी वार्षिक पुरस्कार देऊन गौरवले होते. याशिवाय क्रीडारसिकांचा कौल घेऊन दिला जाणारा पीस अँड स्पोर्ट्स इमेज हा वार्षिक पुरस्कारही या जोडीने पटकावला होता. २०१४पर्यंत ही जोडी एकत्रितपणे खेळली. मग त्यांनी स्वतंत्रपणे खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरची काही वर्षे ही बोपण्णासाठी झगडायला लावणारी ठरली.
२०१३मध्ये रोहनने दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमाकावर मुसंडी मारत सर्वांचे लक्ष वेधले. रोहनला पहिले ग्रँडस्लॅम
२०१७मध्ये मिळवता आले, त्यावेळी तो ३७ वर्षांचा होता. कॅनडाच्या गॅब्रिएला दाब्रोवस्कीच्या साथीने त्याने अ‍ॅयना-लेना ग्रोनेफेल्ड आणि रॉबर्ट फराह जोडीला नमवून मिश्र दुहेरीत हे यश मिळवले. ग्रँडस्लॅम यश मिळवणारा तो पेस, भूपती आणि सानियानंतरचा चौथा भारतीय टेनिसपटू ठरला. २०१८मध्ये बोपण्णाने हंगेरीच्या टिमीआ बाबोसच्या साथीने मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली. पण त्याची आधीची साथीदार गॅब्रिएला आणि मॅट पॅव्हिच जोडीने त्यांना पराभूत केले. २०२३च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी मात्र त्याने सानियासमवेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. जो यशस्वी ठरला. या जोडीने मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीपर्यंत वाटचाल केली. परंतु ब्राझीलच्या लुसिया स्टेफानी आणि राफेल मातोस जोडीकडून पराभूत झाल्याने उपविजेतेपद मिळवता आले. याच वर्षी ऑस्ट्रेलियाच्याच मॅथ्यू एबडेनच्या साथीने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची त्याने अंतिम फेरी गाठली. परंतु राजीव राम आणि जो सॅलिसबर्ग जोडीकडून पराभूत झाल्यामुळे उपविजेतेपद वाट्याला आले. यंदाच्या वर्षीच्या पहिल्याच ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरूष दुहेरीत त्याने एबडेनसोबत दिमाखात कामगिरी बजावत अंतिम सामन्यात इटलीच्या सिमॉन बोलेली आणि आंद्रे वावासोरी जोडीवर रोमहर्षक विजय संपादन केला. कारकीर्दीतील दुसरे आणि दुहेरीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद प्राप्त केल्यानंतर रोहनचा स्वप्नपूर्तीचा जल्लोष पाहण्याजोगा होता. गेल्या वर्षभरात तिसर्‍यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम त्याने दाखवला आहे. ‘निवृत्तीचा विचार अनेकदा मनात आला. पण खेळाचा आनंद लुटत राहिलो. अथक प्रयत्नांनंतर यशप्राप्ती झाली. आता जोवर हा प्रवास आनंददायी असेल, तोवर खेळत राहणार’ अशी प्रतिक्रिया रोहनने ऑस्ट्रेलियन विजेतेपद मिळवल्यावर व्यक्त केली.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बोपण्णाने आपल्या आवडत्या डेव्हिस चषक स्पर्धेचा हृद्य निरोप घेतला. या स्पर्धेत तो ३३ लढतींमध्ये ५० सामने खेळला. यातील जिंकलेल्या २३ सामन्यांपैकी १३ विजय हे दुहेरीतले होते. हेच त्याचे वैशिष्ट्य होते. भारतीय संघाने मोरोक्कोविरूद्धची लढत ३-१ अशी जिंकत त्याला आगळी भेट दिली.

जोडीचा मामला!

पेस आणि भूपती यांच्यात मतभेद निर्माण झाल्यापासून ऑलिम्पिक स्पर्धा तोंडावर आली की भारताची कोणती जोडी दुहेरीत आणि मिश्र दुहेरीत खेळणार हा वाद नेहमीच ज्वलंत व्हायचा. २०१२मध्ये बोपण्णा भूपतीच्या साथीने दुहेरीत खेळला. या जोडीने ऑस्ट्रेलियन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली, तर दुबई टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकसाठी भारताच्या दोन पुरूष दुहेरीच्या जोड्या सहभागी होणार होत्या. यावेळी बोपण्णाने अनुभवी पेसच्या साथीने खेळण्यास नकार दिला. त्यामुळे बोपण्णा भूपतीसोबत खेळला, तर पेस हा विष्णू वर्धनच्या साथीने खेळला. या वर्षभरात त्याने भूपतीच्या साथीने अनेक स्पर्धांमध्ये ठसा उमटवला.
२०१६च्या जानेवारीतच पेसने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दावेदारी स्पष्ट करताना पुरूष दुहेरीत बोपण्णाच्या साथीने आणि मिश्र दुहेरीत सानियाच्या साथीने खेळण्याची घोषणा केली. यावेळी पेसने काही वादग्रस्त प्रतिक्रिया व्यक्त करून वातावरण आणखी चिघळवले. मे महिन्यात बोपण्णाने साकेत मायनेनीच्या साथीने खेळण्याची संधी द्यावी, अशी विनंती अखिल भारतीय टेनिस संघटनेला केली. पण २०१५मधील मिश्र दुहेरीतील तीन ग्रँडस्लॅम जेतेपदे आणि अनुभव पेसच्या पथ्यावर पडला. टेनिस संघटनेने पेसच्या बाजूने कौल दिला. यावेळी बोपण्णाला नाईलाजास्तव पेसच्या साथीने पुरूष दुहेरीत खेळावे लागले. अनिच्छेने सहभागी झालेल्या या जोडीच्या अनेक बातम्या चर्चेत आल्या. ही जोडी अपेक्षेप्रमाणेच अपयशी ठरली. पण बोपण्णाने सानियाच्या साथीने मिश्र दुहेरीत कांस्यपदकाच्या लढतीपर्यंत मजल मारली. पण हे पदक थोडक्यात निसटले. अन्यथा दोघांच्याही खात्यावर ऐतिहासिक ऑलिम्पिक पदक जमा झाले असते.
२०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी मात्र बोपण्णाला पात्रतेचा टप्पा गाठता आला नाही. २०१८ची ऑलिम्पिक सुवर्णपदक जोडी बोपण्णा आणि दिविज शरण ही भारताची प्रथम पसंतीची जोडी असेल, हे यावेळी टेनिस संघटनेने जाहीर केले होते. पण बोपण्णा (३८) आणि शरण (७५) या दोघांच्या जागतिक क्रमवारीची बेरीज ११३ झाल्याने ते ऑलिम्पिक पात्रता निकष पूर्ण करू शकले नाहीत.
आता पॅरिस ऑलिम्पिक काही महिन्यांवर येऊन ठेपले असताना ऐन बहरात असलेल्या बोपण्णाकडून भारताला टेनिसमधील पदकाच्या आशा ठेवता येतील. सध्या बोपण्णा वगळता युकी भांब्री, एन. श्रीराम बालाजी, विजय सुंदर प्रशांत, अनिरूद्ध चंद्रशेखर आणि अर्जुन कढे हे अन्य पाच टेनिसपटू दुहेरीच्या जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल १०० क्रमांकांमध्ये समाविष्ट आहेत. या सर्वांमध्ये सरस असलेल्या बोपण्णाला दुहेरीत जोडीदार निवडण्याची संधी असेल. मिश्र दुहेरीत सानियाच्या निवृत्तीमुळे भारताकडे समर्थ जोडीचा अभाव जाणवेल. त्यामुळे बोपण्णा पुरूष दुहेरीतील ऑलिम्पिक पदकासह समाधानाने निवृत्ती पत्करतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

[email protected]

Previous Post

लष्करी अधिकारी व जवानांची गायन स्पर्धा

Next Post

परमेशदूत साखरफुटाणे

Related Posts

फ्री हिट

संधीचा चेंडू त्यांच्या दिशेने वळलाच नाही…

March 16, 2025
फ्री हिट

मिश्कील, उमदा, खेळकर सुनील!

July 19, 2024
फ्री हिट

त्यांचं काय चुकलं?

May 10, 2024
फ्री हिट

‘ते’ सध्या काय करतायत?

February 16, 2024
Next Post

परमेशदूत साखरफुटाणे

हायटेक कॉपीने करियर बरबाद केले...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.