अब्दुल : काका नळ रीपेर करने का था
काका : नहीं वो नहीं करने का
अब्दुल : कायको? काकू बोली आओ करके.
काका : वो बोली होंगी, लेकिन नहीं करने का
अब्दुल : कायको?
काका : ऐसे ही
अब्दुल : मतलब?
काका : मतलब तुमसे नहीं करने का
अब्दुल : कायको?
काका : वह तुम लोग ने ठीक नहीं किया
अब्दुल : हमने क्या किया किधर
काका : उधर काश्मीर में.
अब्दुल : छोटा काश्मीर?
काका : छोटा काश्मीर नाही रे गधड्या. मूर्ख. उधर काश्मीर में, जम्मू काश्मीर.
अब्दुल : जम्मू काश्मीर? मतलब वह बरफवाला काश्मीर. लेकिन हम उधर गयाच नही. उधर तो तुम गये थे ना काकू को ैलेके चार साल पहले.
काका : आमच्या देशाचा भाग आहे तो आम्ही कधीही जाऊ तिथे तू कोण जाब विचारणार मला. आम्ही पुन्हा जाऊ, पुन्हा पुन्हा जाऊ तो आमचा प्रश्न आहे. आसेतू हिमाचल हा भारत देश एक आहे आणि आमचा आहे.
अब्दुल : हां फिर
काका: फिर क्या फिर. कळत नाही मी बोललो ते अडाण्या.
अब्दुल : लेकिन काका, काकू बोली नळ गळता है टपक टपक, जल्दी आओ, काका भूनभून कर रहे हैं बोली सुबह से
काका : तो आमचा अंतर्गत मामला आहे आम्ही बघून घेऊ. तू त्यात हस्तक्षेप करू नको.
(अब्दुल हसतो)
काका : हसतो काय
अब्दुल : आप बोले ना हसने का कुछ.
काका : हस्तक्षेप म्हटलं मी हस्तक्षेप हसने का कुछ नाही.
अब्दुल : काका देखो हमको जाने दो अंदर.
काका : तू नळाला हात लावायचा नाही.
अब्दुल : साब हमको अंदर जाने दो काकू गुस्सा होगी हम पर
(अब्दुल खिशातला पाना काढून आत निघतो.)
काका : खबरदार आत पाऊल टाकशील तर. मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढेन. शस्त्राची भीती कोणाला दाखवतो तू.
अब्दुल : काका ये पाना है नळ टाईट करने का. काकू देखो ना काका क्या बोल रहेला है.
काकू : काय झालं हो?
अब्दुल : ये बोल रहे हैं मैंने काश्मीर में इनको तकलीफ दिया. अब मैं उधर गयाच नाही ना काकू. शबाना बोल रही है महाबळेश्वर जाने का वहां भी नहीं गया मैं. काश्मीर किधर जाऊ. हमारा उधर कोई है च नहीं तो तकलीफ क्या देगा हम, हमारा अम्मी भी तुम्हारे घरको कपडा बर्तन करता था. हमारी बहीण वहिदा के शादी में तुम भी आयी थी ना दुवा देने. तुम्हारा पेंटर भाग गया बीच में घर का काम छोड़के तो मेरा भाई शकील ने तुम्हारा काम किया. काका तुम्हारा संडास हमारे मोहम्मद भाई ने लगाया. हम कायको तकलीफ देगा तुमको, वो भी काश्मीर में.
काका : हे बघ अब्दुल तुला कळणार नाही तू अडाणी आहेस. तुझा या संदर्भातला अभ्यास नसेल पण माझा आहे. मला आता सगळं कळलं आहे तुमच्याबद्दल. त्यामुळे तुम्ही आम्हाला त्रास देऊ शकत नाही आता. आज इतक्या वर्षांनी आमचे डोळे उघडले आहेत. अरे किती शतकं त्रास देणार तुम्ही आम्हाला.
अब्दुल : शतकं बोले तो.
काका : ह्याला काहीच कसे कळत नाही मुर्खाला.
काकू : अहो त्याला काय कळणार आहे यातलं. जे करतात त्यांना बोला जाऊन.
काका : अगं तुला कळत नाही ह्या लोकांनी…
काकू: गप्प बसा. अब्दुल काम करून घे मी चहा ठेवते तुझा.
आणि तुम्ही हो. तो चहा पीत असेल तेव्हा त्याला समजवा शतक म्हणजे काय आणि काय इतिहास कळला आहे तुम्हाला तो. आत्ता त्रास देऊ नका त्याला. आत्ता नळ दुरुस्त होऊ दे, पाणी वाया चालले आहे. पुन्हा टाकीतले पाणी संपले तर अंघोळ राहील तुमची. चल अब्दुल आत.
(काकू आणि अब्दुल आत जातात.)
काका : हा देश नाही सुधारणार, कधीच नाही सुधारणार.